पातळ पडलेल्या भुवया बनवा एकदम दाट.! हे मिश्रण फक्त एकदा लावून ठेवा आणि बघा जादू.!

आरोग्य

आपल्या सर्वाँना चांगले आणि आकर्षक आयब्रोज हवे असते. पण काही कारणांमुळे आपल्याला ते मिळत नाही. आपल्याला घनदाट आणि जाड आयब्रोज हवे असतात म्हणून आपण अनेक प्रकारचे ट्रीटमेंट देखील करून घेत असतो. अनेक पैसे खर्च करत असतो. पण आज आपण असा घरगुती उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आपल्याला जास्त पैसे खर्च करण्याची गरज भासणार नाही.

त्यासाठी आपल्याला इथे एक कांदा घ्यायचा आहे. कांदा आपण आपल्या घरामध्ये आपल्या रोजच्या जेवणात वापरतो. पण याचा फायदा आपल्या आयब्रो साठी देखील होऊ शकतो, हा विचार कोणीच केला नसेल. तर आज आपण जाणून घेणार आहोत की कांदा च्या मदतीने आपण आपले आयब्रोज कसे घनदाट आणि जाड बनवू शकतो.

कांद्याच्या मदतीने आपण आपल्या शरीरातील अनेक समस्या लगेच दूर करू शकतो. केस गळण्या सारखे आजार देखील आपण यामुळे टाळू शकतो. केस तुटणे, केस गळणे, आपल्या आयब्रो चे केस अनेकदा तुटत असतात किंवा ते गळत पण असतात आणि आपण त्यासाठी काहीच करू शकत नाही. त्यामुळे कांद्याचा रस आपल्याला आयब्रो वाढवण्यासाठी किंवा त्याची गळती थांबवण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतो.

हे वाचा:   रात्री खा फक्त दोन विलायची, शरीरात होतील असे बदल, प्रत्येकाने वाचावे.!

कांद्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म उपलब्ध असतात त्याचबरोबर आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेले पोषक तत्वे देखील कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. कांद्यामध्ये जास्त प्रमाणात सल्फर उपलब्ध असते. सल्फर हे आपल्या केसांच्या वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. जर तुमचे केस गळत असतील केसांमध्ये कोंडा झाला असेल तर या सगळ्या समस्या दूर करण्याचे कार्य देखील कांदा करत असतो.

कांद्याच्या रसामध्ये अँटी बॅक्टेरियलगुणधर्म असल्यामुळे आपल्या केसांना मजबूत आणि पोषण देण्याचे काम कांद्याचा रस करतो. आता हे रस आपल्या आयब्रो साठी कसा उपयोगी त्यासाठी तो किती प्रमाणात आणि कसा वापरायचा हे आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम एका कांद्याला मिक्सर मध्ये वाटून त्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर सर्वप्रथम एका वाटीमध्ये एक ते दोन चमचे कांद्याचा रस घ्यायचा आहे.

त्यानंतर त्यामध्ये चिमुटभर हळदी पावडर टाकायची आहे. त्यानंतर या दोघांना देखील मिक्स करून आपल्या आयब्रो वर लावून ठेवायचे आहे. हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीन ते चार दिवस देखील करू शकता. हे मिश्रण आयब्रो वर अर्धा ते एक तास तुम्ही ठेवू शकता. कांद्याच्या रसाने फक्त आयब्रो चे केस वाढतच नाही तर ते मजबूत आणि चमकदार देखील होतात.

हे वाचा:   या कारणामुळे पोट आणखी फुगत जाते.! त्यामागचे खरे कारण तुम्हाला कोणीही सांगणार नाही.! असा लावावा लागेल तपास.!

या घरगुती उपाय याचा वापर केल्यानंतर तुम्ही याला कोणत्याही प्रकारच्या फेस वॉश ने धूवून टाकू शकता. त्याचबरोबर तुम्हाला हा उपाय तुमच्या आयब्रो वर लावताना तुम्ही ईयर बर्ड सहाय्याने देखील लावू शकता. यामुळे तुमच्या आयब्रो वर हा उपाय व्यवस्थित रित्या लागण्यास मदत होईल. आपण इथे कांद्याच्या रसामध्ये हळद यासाठी वापरली आहे कारण ती अँटी बॅक्टरियल असल्यामुळे आपल्या आयब्रो मध्ये असलेले फंगल इन्फेक्शन निघून जाईल.

यामध्ये तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कॅस्ट्रॉल चा वापर देखील करू शकता. जोपर्यंत तुमचे आयब्रो जाड आणि घनदाट होत नाही तोपर्यंत तुम्ही या उपायाचा वापर करत राहू शकता जेव्हा तुम्हाला वाटेल की आता तुमचे आयब्रो जाड किंवा घनदाट झाले आहेत तेव्हा तुम्ही हा वापर करणे बंद करू शकता अशाप्रकारे आपण घरच्या घरी अगदी सहजरीत्या आयब्रो वाढवू शकतो.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *