अशा प्रकारचे लक्षणे दिसू लागले की समजून जा आपल्या शरीरात शुगर ची मात्रा खूपच जास्त आहे.!

आरोग्य

जगात दिवसेंदिवस साखरेची समस्या वाढत असल्याने बहुतेक लोक या समस्येवर खूप नाराज आहेत, योग्य काळजी न घेतल्याने मानवी शरीराला विविध आजारांना तोंड द्यावे लागते. या आजारांमध्ये मधुमेहाचा क्रमांक सर्वात आधी लागतो. म्हणून आजच्या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला अशी काही लक्षणे सांगणार आहोत जी साखरेची समस्या असल्याचा दावा करतात, तर मग जाणून घ्या ही लक्षणे तुम्हाला आहेत का.?

मधुमेहाचे दोन प्रकार असतात. टाईप १ आणि टाईप २ मधुमेह. पहिल्या प्रकारचा मधुमेह बालवयात किंवा प्रौढावस्थेमध्ये होतो. दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहास प्रौढावस्थेमधील, वयोमानानुसार होणारा मधुमेह म्हणतात. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढणे हे आरोग्यासाठी चांगले नसते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्यावर मधुमेह होतो. मधुमेहात व्यक्तीच्या रक्तातील ग्लुकोजचे (रक्तातील साखर) प्रमाण नेहमीपेक्षा वाढते.

मधुमेहवर नियंत्रण ठेवण्याआधी, उच्च साखरेच्या पातळीची लक्षणे लवकरात लवकर ओळखणे गरजेचे आहे. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा जेव्हा शरीरात साखरेचे प्रमाण वाढते, तेव्हा शरीराचे वजन वेगाने कमी होऊ लागते, जर आपले वजन देखील वेगाने कमी होत असेल तर आपण ताबडतोब एक चांगले डॉक्टर बघितला पाहिजे त्यामुळे आपली साखर कायम नियंत्रित राहील. आणि मधुमेह होण्यापासून दूर राहाल.

हे वाचा:   हाडांमधून येत आहे कटकट असा आवाज, तर मग आजपासूनच खाण्यास सुरुवात करा ही एक गोष्ट, तुमचे लाखो रुपये वाचतील.!

जर तुम्हाला अचानक धूसर दिसत असेल तर तुम्हाला सावध राहावे लागेल. तुम्ही तुमच्या साखरेची पातळी तपासत राहिले पाहिजे. त्यासह, जर आपल्याला काम न करताही थकल्यासारखे वाटत असेल तर आपल्याला साखरेची समस्या होण्याची शक्यता जास्त आहे. चिडचिडेपणा आणि मूड खराब होण्याचे प्रकार वारंवार घडणे हेही मधुमेहाचे लक्षण आहे. शरीरातील रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे मधुमेहाचे रूग्ण अधिक चिडचिडे बनतात.

अचानक अशक्तपना जाणवने. तीव्र भूक लागने ही सुद्धा मधुमेहाचीच लक्षणे आहेत. मधुमेह असलेल्या व्यक्तीला  अचानकपणे अशक्तपणा येतो. वारंवार पाणी प्यायल्यानंतरही जर तहान लागत असेल तर तुमच्या शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असू शकते. पायाला सतत मुंग्या येणे. पायाला सतत मुंग्या येत असतील अधुनमधून पाय बधीर होत असेल तरीही डॉक्टरांचा सल्ला त्वरीत घ्या.

सततचे डिप्रेशन, घराबाहेरप पडण्याची ईच्छा न होणे, कामात लक्ष न लागने हेसुद्धा मधुमेहाचे लक्षण मानले जाते. त्यासह, आपल्या शरीरातील जखमा बऱ्याचदा आपोआप भरून जातात. जर काही लोकांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली असेल, आणि ती जखम लवकर बरी होत नसेल तर आपल्याला साखर समस्या होण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींच्या बाबतीत रक्तातील साखर वाढली तरी मूत्रपिंडे साखर सहसा लघवीत उतरू देत नाहीत.

हे वाचा:   आज मिळणार प्रश्नाचे उत्तर.! सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याने शरीरात नेमके होते तरी काय.?

म्हणून सर्वच रुग्णांच्या बाबतीत रक्तातल्या साखरेची तपासणी करणे आवश्यक असते. मात्र प्राथमिक तपासणी म्हणून लघवीच्या तपासणीचा मोठा उपयोग आहे. यांपैकी कोणतीही लक्षणे तुम्हाला दिसून येऊ शकतात. अशाप्रकारची लक्षणे तुम्हाला आढळून आल्यास. घरातच उपाय करून पहा. आणि योग्य ती काळजी घेऊन डॉक्टरांचा सल्ला घ्या.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *