आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आणि बाहेर खूप गरम होत असल्यामुळे या दिवसांमध्ये आपल्या पोटामध्ये जेवण कमी जात असते. त्यामुळे आपल्याला दर दिवशी अपचनाचा त्रास होत असतो. त्याचबरोबर गॅसची समस्या देखील होत असते आणि त्यासाठी आपण दिवसेंदिवस उपचार करत असतो पण या उपचारांनी किंवा डॉक्टर जवळून आणलेल्या औषधांनी देखील आपल्या पोटामध्ये किंवा पचन क्रिया मध्ये फारसा फरक दिसून येत नाही.
त्यासाठी आज आपण असा घरगुती उपाय पाहणार आहोत, ज्यामुळे तुमचे कित्येक दिवसांचा गॅस आणि अपचनाची समस्या कायमची दूर होईल. चला तर मग जाणुन घेऊया यासाठी आपल्याला कोणकोणती सामग्री लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला इथे पुदिन्याची पाने घ्यायची आहेत. आपल्या घरामध्ये देखील अनेकदा आपण थकलेले असू गरमी तुन घरी आलेले असून तर आपल्या घरातील काही वयस्कर माणसे आपल्याला पाण्यामध्ये पुदिना टाकून प्यायला देत असतात.
याचे कारण म्हणजे आपण उन्हातून आल्यामुळे आपल्याला चक्कर येऊ नये असे अनेक कारण असतात त्यापैकी एक कारण म्हणजे इथे आपण पुदिना चा वापर केल्यामुळे आपल्याला होणारे अपचन आणि गॅस दूर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आपल्याला 20 ते 25 पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. आपल्याला इथे पाणी धूवून वापरायची आहेत कारण ती बाहेरून आणलेली असल्यामुळे त्यावरची धूळ आपल्या पोटात जाऊ नये.
त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला येथे जायचे आहे ती म्हणजे लिंबू. लिंबू देखील पचन क्रिया ला मदत करते वापर केल्यामुळे अन्न पचायला मदत होते. त्यामुळे इथे आपल्याला दोन लिंबांचा वापर करायचा आहे. या लिंबाला गोलाकार पद्धतीने देखील आपण कापून घेऊ शकतो, नाहीतर चार तुकड्यांमध्ये देखील आपण याला कापू शकतो त्यामुळे लिंबाचे चार तुकडे करून घ्यायचे आहे. शेवटची गोष्ट आपल्याला येथे लागणार आहे ती म्हणजे आले.
आता बाजारपेठांमध्ये देखील जेवण पचण्यासाठी म्हणजे जेवणानंतर खाण्याचा गोळ्या देखील उपलब्ध आहेत त्याचा हमखास वापर केला जातो कारण आले आपल्या पचनसंस्थेला व्यवस्थित करण्यास मदत करते.आलेचे सेवन केल्यामुळे आपल्या पोटामध्ये होणारा गॅस देखील नाहीसा होतो. त्यामुळे आल्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आपल्याला जास्त आल्याचा उपयोग करायचा नाही आहे त्यामुळे आल्याचा अर्धा तुकडा घेऊन त्याचे पाच ते सहा छोटे-छोटे तुकडे करून घ्यायचे आहे.
या घरगुती उपायाचा वापर आपण एका ज्यूस मध्ये म्हणजेच एका ड्रिंक मध्ये करणार आहोत त्यामुळे एक ग्लास प्यायचे पाणी आपल्याला घ्यायचे आहे. आता या पाण्यामध्ये पुदिन्याची धुऊन घेतलेली पाने टाकायची आहे. त्यानंतर यामध्ये लिंबाचे तुकडे टाकून घ्यायचे आहे आणि आल्याचे बारीक केलेले तुकडे देखील टाकून घ्यायचे आहे आणि आता या तिन्ही गोष्टींना ग्लासामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स केल्यानंतर लगेचच आपल्याला या ड्रिंक सेवन करायचे नाही आहे.
आता हे बनवून घेतलेले मिश्रण पूर्ण रात्र आपल्याला त्या ग्लास मध्ये झाकून ठेवायचे आहे, जेणेकरून या पाण्यामध्ये या तिन्ही घटकांचे सर्व गुणधर्म एकत्रितपणे उतरतील आणि सकाळी हेच पाणी आपल्याला फायदेशीर ठरेल पण रात्रभर हे पाणी झाकून ठेवायचे आहे.या पाण्यामध्ये कोणतेही कीटक किंवा आजूबाजूच्या कोणताही कचरा पडून खराब होऊ नये. पूर्ण रात्र भर भिजल्यानंतर सकाळी गाळणी च्या मदतीने आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे.
आत मध्ये वापर केलेल्या लिंबांचा देखील आपल्याला पिळून घ्यायचा आहे जेणेकरून हा उपाय आपल्याला लवकरात लवकर फायदे देण्यास सुरुवात करेल. सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी जर या उपायाचे सेवन केले तर ते जास्त फायदेशीर ठरते.दररोज सकाळी या मिश्रणाचे सेवन आपल्याला करायचे आहे. या उपायाचा वापर फक्त एक आठवडा केल्यास अपचन आणि गॅस चा होणारा त्रास कायमचा निघून जाईल.
या उपायामध्ये वापरला गेलेला पुदिना आले आणि लिंबाचा रस आपले दररोजचे खाल्लेले जेवण किंवा बाकी कुठलेही पदार्थ पचण्यास मदत करतील आणि यापुढे देखील आपल्याला अपचनाचा त्रास होणार नाही त्याच बरोबर आपण वापरले गेलेले सर्व घटक नैसर्गिक असल्यामुळे त्याचबरोबर आपल्या रोजच्या वापरातील असल्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर देखील कोणताही वाईट परिणाम होणार नाही.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.