खरबूजाचा नको असलेला हिस्सा तुमचे आरोग्य सुधारेल.! याचे असे फायदे जे तुम्हाला या रखरखत्या उन्हापासून वाचवेल.!

आरोग्य

उन्हाळ्याच्या दिवसात आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळे पदार्थ सेवन करत असतात.अनेकजण वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या रेसिपी करत असतात परंतु उन्हाळ्याच्या दिवसात वातावरण बदल झालेला असतो आणि उष्णता कमी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या फळांचे रस देखील सेवन करत असतो. आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कलिंगड, टरबूज, खरबूज असे अनेक पदार्थ आपण खात असतो.

तसेच फळ नियमितपणे सेवन केल्याने आपल्या शरीराला खूप सारे पोषक तत्व प्राप्त होतात परंतु आपल्यापैकी अनेक जण टरबूज खात असताना टरबूज च्या आत मध्ये जो बियांचा गर असतो,तो मात्र फेकून देतो. जर तुम्ही सुद्धा असे करत असाल तर असे अजिबात करू नका.आज आम्ही तुम्हाला या बियांच्या गरांची एक महत्त्वाची रेसिपी सांगणार आहोत. हि रेसिपी गेल्यावर तुम्ही भविष्यात पुन्हा कराल हे मात्र नक्की.. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल.

टरबूज या फळांमध्ये 90% पेक्षा जास्त पाणी असते. हे फळ आपल्या शरीरातील उष्णता कमी करते तसेच उन्हाळ्याच्या दिवसात आपले शरीर थंड रहावे. आपल्या शरीरामध्ये गारवा निर्माण व्हावा यासाठी हे फळ प्रयत्नशील असते तसेच या फळांमध्ये विटामिन सी जास्त प्रमाणात असते आणि म्हणूनच जर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर अशा वेळी या फळांचा समावेश आपल्या आहारामध्ये अवश्य करायला हवा.

हे वाचा:   असे वरण खूप चवदार बनते.? वरणात ही वस्तू खूपच थोडी टाकावी.! खतरनाक वरण बनेल.!

आता आपल्याला टरबूज मधील गर काढून घ्यायचा आहे. जो मधला बीयांसोबत चा गर असतो तो आपल्याला एका भांड्यामध्ये काढायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुदिनाचे पाने लागणार आहेत. आपल्याला हि पाने बारीक तुकडे करून वाटायचे आहेत त्यानंतर चवीसाठी दोन ते तीन चमचे साखर आपल्या टाकायचे आहेत. तुम्ही गरजेनुसार व चवीनुसार साखरेचे प्रमाण वाढवू शकतात त्यानंतर आपल्याला दोन ते तीन चमचे मिल्क पावडर टाकायची आहे. जर तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर उत्तमच..

जर नसेल तर काही हरकत नाही त्यानंतर आता आपल्याला हॅण्ड ब्लेंडर ने आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे आहे व त्याचबरोबर एक चमचा काळे मीठ देखील चवीसाठी टाकायची आहे. तुम्ही मिक्सरचा देखील वापर करू शकता परंतु मिक्सरचा वापर केल्याने या बिया पूर्णपणे बारीक वाटून जातील आणि याची चव वेगळी लागेल. जर तुमच्याकडे हॅण्ड ब्लेंडर नसेल तर तुम्ही मिक्सर थोड्या थोड्या वेळात चालवून वापर करू शकता.

आता आपल्याला सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर गाळणीच्या सहाय्याने मिश्रण गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून या मिश्रणामध्ये ज्या बिया असतील त्या वेगळ्या होतील गाळणीच्या सहाय्याने त्याने आपल्याला टरबूज रस तयार झालेला पाहायला मिळेल. आता आपल्याला एका काचेच्या ग्लासमध्ये झालेला रस भरून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला सब्जा घ्यायचा आहे. सब्जा हा आधी पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे.

हे वाचा:   काकडी खिरे खाताना ही चूक आजिबात करू नका.! नाहीतर कोणताच इलाज काम करणार नाही.! एकदा नक्की वाचा.!

पाण्यामध्ये भिजवल्याने सब्जा फुलून होऊन जाईल. आपल्यापैकी अनेक जण आईस्क्रीम, फालुदा पदार्थ खाताना सब्जा चा वापर करत असतात आणि म्हणूनच आपल्याला एक ग्लासभर मध्ये थोडेसे सब्जा चवीला घ्यायचे आहे, अशा प्रकारे या दिवशी साधी व सोपी रेसिपी तयार झालेली आहे. उरलेले ज्या बीया आहेत त्या तुम्ही स्वच्छ पाण्याने धुऊन पुन्हा उन्हामध्ये सुकवून त्याचा खाण्यासाठी देखील वापर करू शकता किंवा या बियांचा वापर मातीमध्ये करून या बियाच्या माध्यमातून छान रोप देखील उगवू शकतात, अशा प्रकारे हा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *