उन्हाळा एकदम आरामात घालवायचा असेल तर या दोन वस्तू अशा वापरा.! कधीच चक्कर, मळमळ, उलटी होणार नाही.!

आरोग्य

आपल्या सर्वांना माहिती आहे हल्ली मे चा महिना चालू आहे. या दिवसांमध्ये सूर्याचा जणूकाही आपल्यावर प्रकोप होत आहे, असा भास आपल्याला होत आहे.वातावरणामध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता पसरलेली आहे.सगळीकडे प्रचंड प्रमाणात वातावरण तापले गेलेले आहे.सगळ्यांना उष्णतेचा त्रास देखील होत आहेत आणि अनेकांना दिवसभर बाहेर फीरस्तीवर काम करावे लागते.

उन्हा मध्ये काही काळ बाहेर राहून काम केल्याने शरीरांमध्ये अनेक बदल जाणवू लागतात.शरीराचे तापमान देखील वाढते आणि अनेकांना उष्णता, ऊन लागणे, लघवीची समस्या, उलटी होणे असे विविध त्रास सतावत असतात.हे त्रास दूर करण्यासाठी आज आपण एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला ऊन लागले असेल किंवा उलटी होत असेल या त्रासापासून आराम मिळेल.

आता आपल्याला जो उपाय करायचा आहे तो अतिशय साधा सोपा व तितकाच प्रभावी आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कांदा आणि पुदिना घ्यायचे आहे. हे दोन्ही पदार्थ आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध होतात. पुदिना मध्ये आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्याची क्षमता असते व कांद्या मधील आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे शक्ती असते.

हे वाचा:   आता घरात झुरळ, मच्छर, किडा, उंदीर, पाल दिसणार नाही.! घरात ठेवा ही एक गोळी.! सर्व पंधरा मिनिटात गायब.!

म्हणूनच अशा वेळी जवा उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शरीरातील उष्णता जास्त प्रमाणात वाढते व पाण्याचे प्रमाण कमी होते आणि यामुळे देखील आपल्याला उलटी होते, अशावेळी आपल्याला ा उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कांदा आणि पुदिना यांचा रस बनवायचा आहे की दोन्ही पदार्थ आपल्याला मिक्‍सरच्या साह्याने बारीक वाटून घ्यायचे आहे.

त्यानंतर कपड्याच्या किंवा त्याच्या सहाय्याने रस गाळायचा आहे आणि हा रस आपल्याला अर्धा अर्धा तासाच्या अंतराने दोन ते तीन चमचा सेवन करायचे आहे, अशाप्रकारे आपण हा उपाय केला तर काही तासातच तुमचे उलटी थांबून जाईल व तुम्हाला ऊन लागले असेल ते सुद्धा कमी होऊन जाईल. जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये उलट्या होत असतील तर तुम्ही अजून एक उपाय करू शकता त्यासाठी आपल्याला बर्फाचे खडे लागणार आहेत.

उन्हाळ्याच्या दिवसात आपण थंड पाणी पीत असतो आणि म्हणूनच अनेक जण आपल्या फ्रीजर मध्ये बर्फाचे खडे देखील जमा करून ठेवतात,अशावेळी जर तुम्हाला वारंवार जुलाब होत असेल तर आपल्याला आईस्क्रीम प्रमाणे चोखून खायचे आहेत, असे केल्याने तुमची उलटी त्वरित थांबून जाईल. जर तुम्हाला उन्हामध्ये फिरल्याने ऊन लागले असेल तर अशावेळी तुम्ही चंदनाचा वापर करू शकता.

हे वाचा:   या तेलाच्या अशा वापराने केस रात्रीतून इंच इंच वाढू लागते.! या तेलाला साधारण समजू नका.! महिलांना होईल खूप फायदा.!

चंदन सगळ्यांच्या घरी उपलब्ध असते असे नाही परंतु बाजारामध्ये उपलब्ध होऊन जाते अशा वेळी आपल्याला चंदनाचा वापर करायचा आहे. हे आपल्या सर्वांना माहितीच आहे की चंदन हे शीत प्रवृत्तीचे असते. चंदना मध्ये आपल्या शरीराला गारवा प्रदान करणाऱ्या अनेक औषधी गुणधर्म उपलब्ध असतात म्हणूनच आपल्याला चिमूटभर चंदन घ्यायचे आहे आणि त्यामध्ये मध किंवा आवळ्याचा रस मिक्स करायचा आहे.

हे पदार्थ मिक्स केल्यानंतर एकजीव झाल्यावर आपल्याला सेवन करायचे आहे अशाप्रकारे सांगितलेले उपाय व्यवस्थित पद्धतीने केले तर तुमच्या शरीरातील उष्णता कमी होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला सुरू झालेली उलटी देखील बंद होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *