आपल्यापैकी अनेक जणांना आपली त्वचा सर्वात सुंदर सर्वात मुलायम आणि सर्वात उजळ हवी असते त्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो, जसे की बाजारात उपलब्ध असणारे महाग प्रोडक्स त्याचबरोबर असे काही घरगुती उपाय ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक ग्लो येईल एक चमक येईल. पण काही कारणास्तव कधी कधी आपल्या सोबत तसे होत नाही.
आपण अनेक प्रयत्न करून देखील आपल्याला हवे ते बदल आपल्या चेहऱ्यामध्ये आपण करू शकत नाही. त्यासाठी आजचा हा आपला घरगुती उपाय असणार आहे. या घरगुती उपायामुळे आपल्या चेहर्यावर एक चमक येईल.आपण तरुण दिसू लागू त्याचबरोबर आपला चेहरा मुलायम आणि सुंदर दिसेल. चेहराचा स्किन टोन मध्ये थोडा फरक देखील दिसून येईल. हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला दररोजच्या वापरातील साहित्य लागणार आहे.
चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणते घरगुती गोष्टी लागणार आहेत. सर्वप्रथम आपल्याला इथे एक चमचा तांदूळ घ्यायचा आहे. एका छोट्याशा बरणीमध्ये किंवा छोट्याशा वाटीमध्ये हे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत. हे तांदूळ भिजत ठेवायचे आधी सर्वप्रथम ते तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत. जेणेकरुन त्यावर वापरले गेलेले केमिकल्स किंवा धूळ निघून जाईल आणि चेहऱ्या साठी चांगला उपयोग होईल.
त्याचबरोबर एका वाटीमध्ये हे तांदूळ एक पेला पाण्यात भिजत ठेवायचे आहेत. पूर्ण रात्र तांदूळ भिजवून झाल्यानंतर आपल्याला तांदळाचे पाणी फेकायचे नाही व उरलेले तांदूळ देखील नाही तर त्या भिजलेल्या पाण्याचा म्हणजेच ज्या पाण्यामध्ये तांदळाचे सर्व गुणधर्म आलेले असतील त्या पाण्याचा उपयोग करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एका दुसऱ्या वाटीमध्ये किंवा पात्रांमध्ये हे पाणी गाळून घ्यायचे आहे.
आता गाळून घेतलेल्या पाण्यामध्ये एक चमचा दुधाची पावडर टाकून ती पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला एक चमचा कॉर्नस्ट्राच म्हणजेच मक्याचे पीठ टाकायचे आहे. आता तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट आपल्याला बाजारपेठेत उपलब्ध असणारा कोणताही दररोजच्या वापरातील साबण आपल्याला वापरायचा आहे. त्वचेसाठी साबण वापरणे हे पहिल्या पासून चालत आलेली गोष्ट आहे.
पण या उपायांमध्ये साबणाचा वापर करणे म्हणजेच चेहऱ्यावर चमक यायला अजून जास्त प्रमाणात मदत होते. तुमच्या रोजच्या वापरातील किंवा तुम्हाला आवडत असलेल्या बाहेरील कोणताही साबण तुम्ही वापरू शकता मग तो कोणत्याही ब्रँड असला तरीदेखील कही हरकत नाही. आता या साबणाचा वापर आपल्याला किसून करायचा आहे. व्यवस्थित रित्या किसून घेतल्यानंतर एक चमचा टाकून हे मिश्रण एकत्रित होईपर्यंत त्याला मिक्स करायचे आहे.
आणि आता हे संपूर्ण तयार झालेले मिश्रण गॅसवर ठेवून मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे. शिजवत असताना वेळोवेळी या मिश्रणाला हलवत राहणे अत्यंत गरजेचे आहे. कारण हे मिश्रण त्या भांड्याला लागण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे ती काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता गॅस बंद करून झाल्यानंतर आपल्याला एक क्रीम स्वरूपात झालेले मिश्रण मिळेल हे मिश्रण थंड झाल्यावर आपल्याला याचा वापर करायचा आहे.
त्याचा वापर चेहऱ्यावर लावून गोलाकार पद्धतीने मसाज करून 10 ते 15 मिनिटे चेहर्यावर ठेवायचे आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे. हा उपाय आठवड्या मधून दोन ते तीन वेळा आपण करू शकतो. त्यासाठी आपल्याला बनवून घेतलेले मिश्रण एका रिकामी कंटेनरमध्ये ठेवून फ्रिज मध्ये स्टोअर करायचे आहे. बनवलेल्या घरगुती उपायांमध्ये वापरलेले सर्व गोष्टी आपल्या रोजच्या वापरातील असल्यामुळे त्याचा आपल्या त्वचेवर कोणताही वाईट किंवा हानिकारक परिणाम होणार नाही.
याचा वापर तुम्ही जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा करू शकता. त्याचप्रमाणे या मिश्रणाचा वापर केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील रिंकल्स, पिंपल्स, डाग निघून जातील आणि चेहऱ्यावर चमक यायला मदत होईल त्याचप्रमाणे चेहरा उजळ व्हायला मदत होईल. तुमची त्वचा मुलायम देखील होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.