गुळाचा चहा पिल्याने शरीरात काय होत असते.? गुळाचा चहा पिणे योग्य की साखरेचा.!

आरोग्य

मित्रांनो जास्त चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक च आहे. दिवसातून जास्तीत जास्त २ कप चहा पिया असा सल्ला आपल्याला तज्ञ् देत असतात. परंतु आपण साखरेचा चहा पिण्याऐवजी आपण जर गुळाचा चहा घेतला तर तो आरोग्यासाठी साखरेच्या चहापेक्षाही फायदे देऊ शकतो. तर आज आपण गुळाचा चहा पिल्याने कोणते फायदे होतात हे जाणून घेणार आहोत.

पहिला फायदा म्हणजे फुफुसांचा संसर्ग दूर होण्यास मदत होते. गुळाचा चहा घेतल्याने गळा आणि फुफुसांचा झालेला संसर्ग दूर होतो. म्हणजेच आपला गळा सुजत नाही, गळ्यामध्ये खरखर होत नाही किंवा गळा आपला चांगला राहतो. फुफुस असतील ते सुद्धा चांगले राहतात. दुसरा फायदा असा होतो कि शरीराचे तापमान. गुळ हा उष्ण असतो, थंडीमध्ये शरीराचे तापमान तो नियंत्रणामध्ये ठेवत असतो.

म्हणून आपल्याला जर आपल्या शरीराचे तापमान व्यवस्थित म्हणजे पाहिजे तेवढे ठेवायचे असेल तर गुळाचा चहा पिणे खूप आवश्यक आहे. तिसरा फायदा म्हणजे बॉडी डिटॉक्स करणं. गुळाचा चहा जर आपण नियमित घेतला तर शरीरातील विषारी घटक नष्ट होतात, म्हणजेच बॉडी डिटॉक्स होते. गुळाच्या चहाने आपल्या शरीरातील जे अनावश्यक कीटक आहेत ते बाहेर पडतील.

हे वाचा:   डोळ्यातून खूप पाणी येते का मग हा उपाय करून बघा; डोळ्यातून पाणी येणे काही दिवसातच बंद होईल, डोळ्यात जळजळ होणे काही क्षणात बंद.!

चौथा फायदा म्हणजे मेटॉबॉलिजम व्यवस्थित राहतं. गुळाचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होते आणि मेटॉबॉलिजम ठीक राहण्यासाठी सुद्धा मदत होते. गूळ जो आहे तो रक्तामध्ये लगेच मिसळत नाही. आणि साखरेच्या तुलनेत गूळ जास्त आरोग्यवर्धक आहे. म्हणून मेटॉबॉलिजम व्यवस्थित ठेवण्यासाठी गूळ खाणं आवश्यक आहे. पुढचा फायदा आहे तो म्हणजे रक्तविकार.

ज्याला रक्तामध्ये दोष आहे, किंवा रक्त चांगला नाहीय त्यांनी गुळाचा चहा आवश्य घ्यावा. त्याने आपला रक्तविकार दूर होऊन आपलं रक्त शुद्ध होईल. अशाप्रकारे हा फायदा आपल्याला गुळाच्या चहापासून मिळू शकतो. पुढचा फायदा म्हणजे रक्तातील साखर. बऱ्याचवेळा आपल्याला थकवा येतो,कमजोरी येते. गूळ लवकर पचत असल्याने आपल्या शरीरातील साखरेचा स्थर आहे तो वाढत नाही आणि नियंत्रित राहतो. त्यामुळे आपली एनर्जी सुद्धा वाढून जाते.

हे वाचा:   थंडीत खरबडलेल्या ओठांना बनवा अगदी मुलायम, या एका उपायाने होईल जादू.!

पुढचा फायदा तो म्हणजे सर्दी किंवा कफ. गूळ हा उष्ण असल्याने त्याचे सेवन आपण जर सर्दीमधे केले तर यामध्ये तो आरामदायी ठरत असतो. सर्दीमुळे आपलं नाक बंद होऊन जाते. आणि त्यावेळेस आपण गुळाचा चहा घेतला तर सर्दी किंवा कफ दूर होऊन जाईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *