केसांना काळे करणे सोडून द्यावे लागेल.! कारण आता घरचे काही साहित्य वापरून होतील काळेभोर केस.! एकदा नक्की वाचा आभार मानावे लागेल.!

आरोग्य

थोडे वय झाल्यानंतर किंवा त्या अगोदरच आपले केस पांढरे होऊ लागतात आणि केस पांढरे झाले की आपण अनेक प्रकारचे बाजारात उपलब्ध असलेले डाय लावतो. यामुळे काही ठराविक वेळासाठी आपले केस काळे दिसतात. परत थोड्या वेळा नंतर ते पूर्वीसारखे पांढरे दिसू लागतात आणि त्यासाठी आपण परत केमिकल असणारे डाय लावतो आणि त्यामुळे आपल्या केसांना खूप जास्त प्रमाणात डॅमेज होऊ शकतात आणि आपले केस गळू शकतात.

तुटू शकतात अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्या केसासोबत होऊ शकतात म्हणूनच आज आपण एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपण नैसर्गिकरित्या घरगुती उपायाने द्वारे आपले केस काळे करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे. हा उपाय बनविण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे सुकलेला आवळा.

या उपायासाठी आपण आवळा चा वापर करू शकतो सोबतच जर तुमच्याकडे आवळ्याची बनवून घेतलेली पावडर जरी असेल तरी देखील आपण त्या पावडर चा वापर करू शकतो. हा उपाय बनविण्यासाठी आपल्याला सुकलेले आवळे द्यायचे आहेत. जर तुमच्याकडे सुकवून घेतलेल्या आवळे नसतील तर तुम्ही बाजारात उपलब्ध असलेले सुकलेल्या आवळे घेऊ शकता किंवा बाजारात उपलब्ध असलेली आवळ्याची पावडर देखील तुम्ही घेऊ शकता.

जर तुमच्याकडे आवळे आहेत तर आपल्याला सर्वप्रथम एक कढई घेऊन गॅसवर गरम करायला ठेवायचे आहे. अनेकदा कढईमध्ये हे सुकलेले आवळे मंद आचेवर थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. आपण यासाठी भाजत आहोत ज्यामुळे हे आवळे मिक्सरला लावल्यास त्याचे आपल्याला एक बारीक पावडर मिळेल. जर तुमच्याकडे पावडर असेल तरी ती देखील तुम्हाला हलकी भाजून घ्यायची आहे म्हणजे त्याचा वापर केल्यानंतर त्याचे अधिक फायदे आपल्याला मिळतील.

हे वाचा:   पायावर भेगा पडल्या असतील तर एकदाच करा हा उपाय, दोन दिवसाच्या आत पाय मऊ होऊन जातील.!

त्यानंतर यापुढील गोष्ट आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे चहा पावडर. चहा पावडर आपण कोणत्याही कंपनीची तुमच्या घरा मध्ये उपलब्ध असलेली तुमच्या रोजच्या वापरातील देखील तुम्ही घेऊ शकता. ही चहा पावडर आपल्याला दोन ग्लास पाण्यामध्ये टाकून उकळून घ्यायची आहे.थोडक्यात काय तर आपल्याला कोरा चहा ज्याप्रकारे बनवतो तसा एक अर्क आपल्याला बनवून घ्यायचा आहे.

आपल्याला चहा बनविण्यासाठी आपण त्यामध्ये साखर टाकतो पण इथे साखर न टाकता यामध्ये तीन लवंग टाकायची आहेत जेणेकरून आपल्या केसांचा काळा रंग पकडून ठेवण्यास लवंग मदत करते. त्यानंतर लवंग आणि चहा पावडर या पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत जेणेकरून दोन ग्लासाचे पाणी एक ते दीड ग्लासामध्ये येईपर्यंत आपल्याला आहे पाणी उकळून घ्यायचे आहे उकळवून झाल्यानंतर आपल्याला एका वेगळ्या पात्रामध्ये हे पाणी गाळून घ्यायचे आहे आणि थंड होण्यासाठी ठेवायचे आहे.

चहा पावडर मध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन चे प्रमाण असते त्यामुळे ते अधिक जास्त प्रमाणात आपल्या केसांच्या वापरासाठी फायदेशीर ठरते त्यानंतर परत एकदा एका कढईमध्ये आपल्याला आपल्या आजूबाजूला कोणत्याही कंपनीची उपलब्ध असलेली मेहंदी घ्यायची आहे. इथे मेहंदीचे प्रमाण तुमच्या केसांच्या लांबी एवढे तुम्हाला घ्यायचे आहे.

या मेहंदी मध्ये आपल्याला बारीक करून घेतलेली पावडर करून घेतलेली आवळ्याची पावडर टाकायची आहे. ती टाकून झाल्यानंतर तयार करून घेतलेला अर्क देखील यामध्ये हळूहळू टाकून मेहंदी पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे.हे पदार्थ मिक्स करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की, त्यामध्ये छोटे छोटे गोळे बनवून नयेत म्हणून आपल्याला हळूहळू थोडाथोडा अर्क टाकत त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे.

हे वाचा:   शाम्पू मध्ये टाका ही एक वस्तू, केस इतके लांबसडक होतील की विंचरता विंचरता कंटाळा येईल.!

एकदा का ही मेहंदी मिक्स करून होईल त्यानंतर कमीत कमी आठ ते नऊ तासांसाठी ही मेहंदी आपल्याला अशीच झाकून ठेवायची आहे. म्हणून जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी मेहंदी लावायची असेल तर आधीही रात्री तुम्हालाही मेहंदी बनवून झाकून ठेवायची आहे जेणेकरून यामध्ये वापरले गेलेले सर्व घटक या मेहंदी मध्ये उतरतील व आपली मेहंदी अधिक आयुर्वेदिक आणि उपयोगी ठरेल. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर तुम्ही या मेहंदीचा वापर करू शकता.

जेव्हा सकाळी ही मेहंदी तुम्ही बघाल तेव्हा मेहंदी ला काळा रंग आलेला असेल जर तुम्हाला अजून जास्त रंग हवा असेल तर एक ते दोन चमचे आपण यामध्ये कॉफी देखील टाकू शकतो. त्यानंतरही मेहंदी केसांमध्ये लावल्यानंतर दोन ते तीन तास ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही कोमट किंवा थंड पाण्याने केसांना धुऊन घ्यायचे आहे. शक्यतो केसांना शाम्पू शिवाय धुवायचे आहे.

अशाप्रकारे ही बनवून घेतलेली मेहंदी महिन्यातून एक वेळा देखील लावल्यास तुमचे केस महिनाभर काळेभोर राहतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *