भाकर थापताना हे एक काम करा.! भाकरी टम्म फुगली जाईल.! तुमच्याकडून कधीही भाकरी चिरणार नाही.!

आरोग्य

आपल्यापैकी काही जणांच्या घरामध्ये भाकरी तर बनतच असेल. भाकरी ही सगळ्यांचीच आवडती असते. कोंबड्याचा रस्सा बरोबर किंवा काहीतरी चमचमीत गोष्टी बरोबर भाकरी खाल्ली जाते किंवा पिठलं भाकर ही तर सर्वांचीच आवडती आहे. आपण बाहेर खातो ती भाकरी आणि आपण जर घरात बनवत असू तर ती भाकरी यामध्ये फरक असतो म्हणजे आपल्यापैकी काही जणांची भाकरी ही चांगली फुगत नाही.

एकदम कडक बनते त्यामुळे खाताना देखील तेवढी चविष्ट वाटत नाही आपण जाणून घेणार आहोत अशी फुगीर भाकरी बनण्यासाठी काय काय प्रक्रिया करावी लागते. चला तर मग जाणून घेऊया आपल्याला फुगीर भाकरी बनविण्यासाठी कोणकोणती प्रक्रिया करावी लागर आहे. सर्वप्रथम तुम्ही जर ज्वारीची भाकरी बनवत असाल, तांदळाची भाकरी बनवत असाल. तुम्हाला कोणतीही भाकरी बनवायची असेल तर एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे.

ज्या भाकरीचे पीठ आपण घेणार आहोत ते पीठ जास्त जुने असू नये कारण त्यामुळे देखील भाकरी फाटण्याची किंवा भाकरी न फुगण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम एका ताटामध्ये पीठ घ्यायचे आहे त्यानंतर त्या पीठामध्ये हळूहळू थोडे थोडे पाणी घालून ते पीठ व्यवस्थितरीत्या मळून घ्यायचे आहे. आपल्याला सर्वात जास्त काळजी पीठ मळताना घ्यायची आहे.

कारण जेव्हा पिठ पण चांगले मळू शकतो तेव्हाच आपली भाकरी चांगली बनू शकते. त्यामुळे पीठ मळायची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला व्यवस्थित रित्या पार पाडणे गरजेचे आहे. म्हणून पिठामध्ये सरळ जास्त पाणी न टाकता हळूहळू थोडे थोडे पाणी टाकत ते व्यवस्थित मळून घ्यायचे आहे . पिठ मळेपर्यंत आपल्याला आपला तवा गॅसवर ठेवून गरम करायचा आहे.

हे वाचा:   आंबे खाऊन कोय फेकून देणाऱ्यांनो, एकदा हे नक्की वाचा, वाचल्यानंतर एकही कोय फेकून देणार नाहीत...!

भाकरी भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम बारीक किंवा मिडीयम ठेवायची आहे जेणेकरून आपली भाकरी भाजेल पण ती जळणार नाही. आपल्याला पीठ व्यवस्थित मळले आहे कि नाही हे यावरून कळते जेव्हा आपण जात ताटामध्ये पीठ मळत आहोत त्यात ताटाला जराही पीठ चिकटून राहता कामा नये. जर पीठ मळल्यानंतर तुमचे ताट स्वच्छ झालेले असेल म्हणजेच साफ झालेले असेल तर तुमचे पीठ व्यवस्थित मळलेले आहे.

ज्या ताटा मध्ये आपण पीठ मळलेले आहे त्याच ताटा मध्ये थोडेसे सुके पीठ घ्यायचे आहे आणि ते व्यवस्थित त्या ताटामध्ये पसरवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर म्हणून घेतलेल्या पीठा मधून एका भाकरी एवढ्या गोळा काढून व्यवस्थित गोल करून दोन्ही हातांच्या मदतीने त्याला मधोमध थोडासा दाबून घ्यायचा आहे. आणि त्या पिठावर ठेवून हळूहळू एका हाताने भाकरी थापायला सुरुवात करायची आहे.

जसजसा तो गोळा थोडा थोडा पसरून गोलाकार होऊ लागेल तसे पण आपल्या दुसर्‍या हाताच्या मदतीने देखील भाकरी थापायला सुरुवात करायची आहे. दोन्ही हाताने भाकरी थापल्या ती सर्व दिशेने गोल आणि एकाच आकाराची बनते. तुम्हाला हव्या असलेल्या आकारांमध्ये भाकरी थापून झाल्यावर हळूवार हलक्या हाताने आपल्याला भाकरी उचलायची आहे आणि मग तव्यावर टाकायचे आहे.

बाकी प्रक्रियेपेक्षा थापून झालेली भाकरी तव्यावर टाकण्याची प्रक्रिया थोडीशी जलद करायची आहे कारण उचलून टाकेपर्यंत ही भाकरी तूटू देखील शकते म्हणून थोडेसे जलद प्रक्रिया कडून आपल्यालाही भाकरी तव्यावर टाकायची आहे. तव्यावर टाकल्यानंतर पाच ते सहा सेकंदानंतर भाकरीच्या वरच्या भागावर थोडेसे पाणी लावून घ्यायचे आहे. पाणी लावताना हलक्या हाताने पाणी लावायचे आहे आणि तो पर्यंत भाकरी भाजून घ्यायची आहे.

हे वाचा:   तुमच्याही घरामधील बाथरूम मध्ये गांडूळ आणि गोम सारखे किडे निघतात का.? हे पाच घरगुती उपाय नक्की करून पहा.!

थोड्या वेळानंतर तुम्ही भाकरी भाजायचा चमच्याने हळुवारपणे कडा उचलून बघायचे आहे की भाकरी भाजली आहे का जसा तुम्ही चमचा भाकरीच्या खाली घालाल जर भाकरी भाजणी असेल तर ती अलगद पणे उचलून येईल जर ती उचलत असेल तर आपल्याला भाकरी पलटायची आहे. भाकरी पलटून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील हा ते पंधरा सेकंदासाठी भाकरी भाजून घ्यायची आहे यामध्ये तुम्ही भाकरी उचलून देखील पाहू शकता की दुसर्‍या बाजूने भाकरी भाजली आहे की नाही.

जर भाजली असेल तर तुम्ही परत एकदा पलटी मारायची आहे जशी तुम्हीही पलटी माराल तर तशी हळूहळू भाकरी फुगायला लागेल आणि तुमची भाकरी फुगून चांगली लुसलुशीत भाकरी भाजून तयार होईल. अशाप्रकारे अशा सोप्या पद्धतीने तुम्ही मऊ आणि लुसलुशीत भाकरी बनवू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *