टकलावर सुध्दा उगवत असतात केस, त्यासाठी करावा लागतो हा एक छोटासा उपाय.!

आरोग्य

मित्रांनो काय तुम्ही केस गळती च्या समस्येने हैराण आहात? तुमचे केस खूप जास्त प्रमाणात तुटत आहेत काय? केसांची वाढ खुंटली आहे का? असेल तर आजची ही माहिती तुमच्या खूप कामाची आहे. केस गळती सुद्धा थांबेल आणि केसांची वाढ देखील होईल. सोबतच जर केसांना फाटे पुटण्याची समस्या असेल तर तीही दूर होईल. आजकाल तर कमी वयामध्ये केस सफेद होण्याची समस्या दिसत आहे.

हा उपाय तुम्ही काही दिवस केला असता तर केस पिकण्याची समस्या देखील दूर होईल. केसांच्या काळजी साठी सगळ्यात आधी तुम्हाला घ्यायचा आहे लाल सालीचा कांदा. केसांसाठी सफेद कांदा ऐवजी लाल कांदा जास्त फायदेशीर असतो. यामध्ये सल्फर, फॉस्फरस आणि अँटिऑक्सिडंट ची मात्रा भरपूर प्रमाणात असते. जे आपल्या केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे.

कांदा कापताना डोळ्यात पाणी येण्याचे कारण म्हणजे कांदा मधलं सल्फर हे असते. त्यामुळे तुमच्या केसामध्ये घनता येऊन केस गळण्याचे प्रमाण कमी होते. फक्त तेल मालिश मुळे केसांना ते न्यूट्रिशन मिळत नाहीत जे आपण टॉनिक मधून देणार आहोत. केसांना कधीकधी हेअर टॉनिक देणे गरजेचे असते ज्यामुळे केस गळती थांबते आणि केसांची वाढ चांगली होते.

हे वाचा:   कमकुवत शरीर पाहून कोणीच तुम्हाला चिडवणार नाही; जबरदस्त वजन वाढेल, कमी खर्चात भारी उपाय.!

एक बारीक चिरलेला कांदा घेऊन त्यात एक ग्लास पाणी घालून घ्या. धणे किंवा कोथिंबिरीचा रोज आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर असतो. आठवड्यातून एकदा कोथिंबीरीची पाने वाटून त्याचा रस केसांवरती नक्की लावा. त्यामुळे केस पिकण्याची समस्या मुळापासून नष्ट होईल. नैसर्गिक रित्या केसांमध्ये काळे पणा येतो.

धणे हे आपल्या स्किन साठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे केसांची वाढ लवकर होते. धन्यामध्ये विटामिन के, सी आणि बी असते. यामुळे आपल्या केसांच्या मुळांना अत्यंत पोषक तत्त्वे मिळतात. एक ग्लास पाणी, एक बारीक कापलेला लाल कांदा, दोन चमचे धने एकत्र करून मंद आचेवर गॅस वरती 15 मिनिटांसाठी उकळत ठेवा. मधून मधून मिश्रण ढवळत राहा.

हे पाणी नसून हेअर टॉनिक बनेल. हे ऑल इन वन जादुई टॉनिक आहे. त्यामुळे आपले केस मुळांपासून मजबूत होतील. केसांमधील कोंडा च्या तक्रारी दूर होतील. हे मिश्रण गाळून घ्यावे. हलका हिरवट रंग येतो. आठवड्यातून तीन वेळेस याचा तुम्हाला वापर करायचा आहे. केसांच्या मुळाशी लावा, केसांच्या पूर्ण लंबाई वर लावा. बाटलीत भरून स्प्रे सारखा ही याचा उपयोग तुम्ही करू शकता.

हे वाचा:   गुडघेदुखी चा वैताग आलाय काय.? मग आता हा उपाय करा आणि शांत झोपा.! गुडघेदुखी पळून जाईल.!

मिश्रण जास्त प्रमाणावर म्हणजे 15 दिवसांचे बनवून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा साठवू शकता. केसं धुवायच्या आधी दोन तास हे केसांवर लावावे. केस त्या साध्या पाण्याने धुवावेत व दुसऱ्या दिवशी शाम्पूने धुवावेत. टीप : 1)ओबड-धोबड धने वाटून त्यामध्ये मुलतानी माती मिक्स करून चेहर्‍यावर स्क्रबर सारखे वापरू शकता. यामुळे त्वचा तजेलदार होते.

2)खूप उन्हा मध्ये जाताना केस व्यवस्थित झाकावेत. 3)आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या फळे यांचा समावेश जास्त असावा. 4)रात्रीचे जागरण टाळावे.पुरेशी झोप घ्यावी. या काही छोट्या टिप्स मुळे तुमच्या केसांच्या तक्रारी कमी व्हायला मदत होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *