आपल्यापैकी अनेक जणांना गुडघ्यांचा त्रास अजूनही असतात. कितीही प्रयत्न केले तरी देखील आपल्याला गुडघ्यांच्या त्रासापासून मुक्तता काही मिळत नाही. हे त्रास कमी व्हावे म्हणून आपण भरपूर प्रयत्न करतो जसे की डॉक्टरच्या सल्ल्याने गोळ्या घेणे औषधे घेणे, दररोज कोणते ना कोणते मलम लावणे आणि या सर्वांमध्ये आपले गुडघे तर बरे होतच नाहीत सोबतच आपल्याला अजून कोणतातरी आजार तयार होतो आणि आपले भरपूर पैसे देखील यावर खर्च होतो पण आपल्याला हवा तसा रिझल्ट काही मिळत नाही.
म्हणून आज आपण असा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्या गुडघ्याचे दुखणे देखील कमी होईल सोबतच जॉईंट पेन असेल तर ते देखील निघून जाईल. हाडांचे दुखणे देखील कमी होईल. चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे आणि हा घरगुती उपाय बनविण्याची प्रक्रिया कशी असणार आहे. सर्वप्रथम हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे ते म्हणजे गुळ.
गुळ आपल्या सर्वांच्याच घरामध्ये सहज रित्या उपलब्ध होते. त्यामुळे इथे गुळाचा वापर करायचा आहे पण हे गुळ जुने घ्यायचे आहे. जुन्या गुळामध्ये जास्त औषधी गुणधर्म असतात जर तुमच्याजवळ जुने गूळ असेल तर आपण हे गुळ काही दिवसांसाठी पुना मध्ये ठेवायचे आहे यामध्ये ठेवल्यानंतर यामध्ये सर्व औषधी गुणधर्म येतात. त्यामुळे जुने गूळ नसेल तर नवीन गूळ घेऊन ते अशाप्रकारे उन्हात ठेवून आपल्याला ते जुने करायचे आहे आणि त्यानंतर त्याचा वापर करायचा आहे.
याचा वापर करताना याला किसून घ्यायचे आहे. आणि गुळाचा कीस एका पात्रांमध्ये आपल्याला घ्यायचा आहे. कमीत कमी दोन ते तीन चमचे गुळाचा किस आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला इथे वापरायची आहे ती म्हणजे हळद. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, र’क्त शुद्ध होते, त्वचेचा रंग उजळतो, ही जंतुनाशक आहे. ही वनस्पती बारमाही आहे.
हळद चुर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार, मधुमेह, कर्करोग, मेंदुचे विकार होण्यापासुन प्रतिबंध होतो. पचनक्रिया सुधारते. त्याच बरोबर हळदीचा वापर हाडांसाठी केल्यास हाडे लवकरात लवकर मजबूत व्हायला मदत होते त्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म हाडांना पूर्वीसारखे मजबूत करण्यास मदत करते. त्यामुळे एक चमचा भरून आपल्याला हळदीचा वापर करायचा आहे. तिसरी गोष्ट यामध्ये आपल्याला वापरायची आहे ते म्हणजे चुना.
जर आपल्या घरामध्ये चुना उपलब्ध नसेल तर कोणत्याही पानपट्टीवर सुना आपल्याला सहजपणे उपलब्ध होईल आणि खूप कमी पैशांमध्ये चुना आपल्याला मिळेल आणि पानपट्टीवर असलेला चुना हा शुद्ध चुना असतो त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची देखील गरज नाही. त्यामुळे एक चमचा चुना आपल्याला घ्यायचा आहे. चुन्याचा जास्त वापर देखील आपल्या त्वचेवर करू नये कारण त्यामुळे अनेक जणांना त्वचे वर ऍलर्जी होऊ शकते त्यामुळे थोड्या प्रमाणात चून्याचा वापर करायचा आहे.
आता या मध्ये चुना टाकून झाल्यानंतर आपल्याला या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत. हे मिश्रण तयार झाल्यावर आपल्याला गुडघ्यांवर लावायचा आहे. आणि औषध लावून झाल्यावर हलक्या हाताने यावर मसाज देखील करायचे आहे. मसाज केल्याने त्या जागेवर ची हाडे मोकळी होण्यास मदत होईल. आणि त्यानंतर हे औषध सुखेपर्यंत आपल्याला तसेच ठेवायचे आहे या औषधाला कोणत्याही प्रकारच्या कपड्याने किंवा पट्टीने बांधून ठेवायचे नाही आहे.
सुखल्यानंतर तुम्ही याला झाकून ठेवू शकता. हा उपाय सतत सात दिवस तुम्हाला करायचा आहे. जेणेकरून हळूहळू गुडघ्या मधील दुखणे हाडांचे दुखणे आणि जॉईंट पेन या सर्व गोष्टी हळूहळू निघून जातील आणि परत आपल्याला हा त्रास कधीच होणार नाही. यामध्ये वापरले गेलेले घरगुती गोष्टी जर सांगितलेल्या प्रमाणात वापरल्या तर याचा चांगला प्रभाव तुम्हाला लवकरात लवकर दिसून येईल.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका. Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.