मित्रांनो माणूस जन्माला आल्यापासून अतोनात मेहनत करु लागतो ते म्हणजे जेवणाच्या काही घासांसाठी. पोटात अन्न असले तर कोणती ही मेहनत परिश्रम आपण सहाजतेने करु शकतो. अन्न आपल्याला जगण्यासाठी ताकद देते. अन्न ग्रहण केल्यास तुम्हाला अनेक जीवनसत्व, प्रथिने, कर्बोदके मिळतात या मुळे तुमचे शरीर मजबूत होते व रोगांशी लढण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती देखील आपल्याला प्राप्त होते.
अन्नाचे प्रत्येक सजीवाच्या आयुष्यात मोठे महत्व आहे. मात्र तुम्ही रोज जे अन्न ग्रहण करता ते ताजे व पोषक असले पाहिजे तरच त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो. मात्र आज कालच्या धावत्या जगात आपल्याला कडे आपल्या आरोग्यावर आपल्या आहारावर लक्ष देण्यासाठी अजिबात वेळ नसतो. आपल्याला बाहेरचे जलद तयार होणारे व घरच्या जेवणापेक्षा चवीला रुचकर लागणारे फास्ट फूड जास्त आवडते.
रोज-रोज असले अरबट-सरबट अन्न ग्रहण केल्यास तुम्हाला पोटाच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पोटदुखी तसेच जुलाब, उलट्या या बारीक काही व्याद्या आहेत. परंतू पोटात जंत अथवा कृमी होणे ही एक मोठी समस्या असू शकते. ही समस्या प्रतोदकृमी टेपवर्म, कृमी, थ्रेडवर्म आणि गोलाकार कृमी यांच्यामुळे होऊ शकतो. हे परोपजीवी मानवी शरीरात, विशेषतः आतड्यांमध्ये आपले करतात.
पोटात जंत झाल्यास आपल्याला अत्यंत थकवा जाणवू लागतो. वजन झपाट्याने कमी होवू लागते. वारंवर ताप येणे, मळमळणे, पोट फुगणे व दुखणे या व्याध्या दिसून येतात. कावीळ होते तसेच लहानमुले असतील तर त्यांना रात्री झोप लागत नाही व त्यांचा चिडचिडपणा वाढतो. तसेच गुदद्वा’राला खाज देखील येवू लागते. बाजारात अनेक प्रकारच्या गोळ्या व औषधे मिळतात ज्या जंत नष्ट करण्याचा दावा करतात.
मात्र यांमुळे थोड्या काळासाठी आराम तर मिळतो. पण ही समस्या पुन्हा-पुन्हा उद्भवू शकते. परंतू आता तुम्ही निर्धास्त होवू शकता आज आम्ही तुमच्यासाठी असा एक आयुर्वेदीक व घरगुती उपाय घेवून आलो आहोत. ज्याच्या फक्त तीन वेळच्या वापराने तुम्ही पोटातील जंत व कृमी कायमचे नष्ट करु शकता. हा उपाय तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरातील काही सामग्री घेवून बनवू शकता म्हणूनच हा जास्त खर्चीक नाही व निर्धोक ही आहे.
हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे म्हणूनच आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम आवश्यकता असेल ती काळ्या मीठाची. होय काळ्या मीठात अनेक पोषक घटक आहेत जे आपल्या शरीरासाठी लाभदायक आहेत. म्हणून एक चमचा काळे मीठ या उपायासाठी घ्यायचे आहे. दुसरा घटक म्हणजे भाजलेले जीरे.
जीरे आपल्या पोटाला आराम देते. पोटदुखी असेल तर जीरे खाल्यास आराम मिळतो. आपल्याला एक चमचा जीरे देखील घ्यायचे आहे. या नंतरचा घटक म्हणजे काळी मिरी होय. काळी मिरी गरम असल्याने ही पोटातील जंत मा’रण्यास सक्षम आहे. तुम्हाला फक्त अर्धा चमचा एवढी काळी मिरी पावडर या उपायासाठी घ्यायची आहे. जास्त घेतल्यास याचा आपल्या पचन संस्थेवर वाईट प्रभाव पडू शकतो. हिंग पोटाला आराम देते.
उलटी होत असल्यास अथवा अपचन, पोटदुखी असेल तर हिंग खाल्यास त्वरित आराम मिळतो म्हणून आपणास एक चमचा हिंग पावडर देखील घ्यायची आहे. पाचवा व शेवटचा घटक म्हणजे दही. दही हे एक प्रोबायोटिक आहे. आपल्या पचनतंत्रासाठी दही ग्रहण करणे अत्यंत लाभदायक आहे. म्हणूनच 300 ग्राम दही देखील आपल्याला या उपायात लागेल. आता काळे मीठ, भाजलेले जीरे, काळी मिरीची पावडर, हिंग व दही यांना एका भांड्यात योग्य प्रकारे मिक्स करुन घ्या.
हे मिश्रण खाण्याच्या पाच मिनिटां आधी एक चमचा साखर खायला विसरु नका. काळी मिरी व हिंग पोटाला गरमीची बाधा आणू शकतात म्हणूनच लहानमुले असतील एक चमचा व वयस्क असतील त्र अर्धा चमचा साखर खाण्यास द्या. हा उपाय रोज रात्री झोपण्या आधी तीन दिवस नियमित करा. तुमच्या पोटातील कृमी व जंत गायब होवून जातील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.