आपल्यापैकी अनेकांच्या परसबागेमध्ये किंवा घरामध्ये कुंडीत अनेक प्रकारची वेगवेगळी रूपे लावलेली असतात. मिरचीचे रोप,टॉमेटोचे रोप त्याचप्रमाणे कढीपत्त्याचे रोप देखील हळूहळू मोठे होते. पण कधीकधी या झाडांवर पाने कमी येतात किंवा हे झाड वाढते पण पानांच्या ऐवजी त्यावर काळी फळे येतात म्हणजेच हळूहळू पालवी फुटणे, त्यांना फुले न येणे आणि मग फळे येणे मग ती फळे काळी होतात आणि आपल्याला त्याच्या बिया मिळतात आणि त्याने आपण दुसरी रोपे तयार करू शकतो.
पण जर आपल्याला ही रोपे नको असतील आपल्याला फक्त कढीपत्त्याचे झाड मोठे झालेले हवे असेल, आपल्याला कडीपत्त्याची पाने हवे असतील तर मात्र आपल्याला त्यासाठी काही गोष्टी करायच्या आहेत आणि त्यास आपण येथे जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला कढीपत्त्याच्या झाडाची जिथुन वाढ होते त्या ब्रांचेस आपल्याला काढून टाकायचे आहेत म्हणजेच पालवी फुटते त्या-त्या फांद्यांना आपण काढून टाकणार आहोत.
त्यानंतर आपले झाड हे वाढायला लागेल आणि त्यावर फुले फळे येणार नाहीत.फक्त कढीपत्त्याची पाने येतील पण मग तुम्हाला असे वाटेल की कधी कधी जेव्हा आपण वरील फांद्या कापतो तेव्हा झाड मरतात तेव्हा तुम्हाला वाटेल की आपण फांद्या कापल्या पण आपले झाड का वाढत नाही. झाडाची वाढ का होत नाही? तर झाडाच्या फांद्या फक्त पावसाळ्यात कापायचा आहेत.
बाकी कोणत्याही ऋतूमध्ये आपल्यास आपले झाड वाळू शकते किंवा ते सुखून जाऊ शकते. त्याचबरोबर अनेक जणांना ही समस्या असते की त्यांचे कढीपत्त्याचे झाड हे सरळ वाढते आणि त्यामुळे त्या झाडाला कमी पाणी येतात.जर झाडाच्या फांद्या कापल्या तर ते झाड झुडूपा सारखे वाढू शकते. आणि त्याला पाणी देखील भरपूर येऊ शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर आपल्या कडीपत्त्याचे झाड चांगले वाढले पाहिजे त्याला चांगली पाने आली पाहिजेत तर आपल्याला सुरुवातीपासून काय करायचे आहे.
हे आपण आज जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला एका छोट्याशा कुंडीमध्ये चांगली माती घ्यायची आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याचे बी टाकायचे आहे आता इथे दोन प्रकारचे बी असतात एक काळया रंगाचे असते तर एक सुकलेली बी असते. आपल्याला इथे सुकलेली बी नाही वापरायचे आहे तर जी ओली बी असते जी काळात रंगाची बी असते तिला सोडून आत मधली जीबी असते ती आपल्याला माती मध्ये टाकायचे आहे.
त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कुंडीतील मातीला ओले करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर तर मातीचा खूप आत ती बी न टाकता वरच्यावर टाकायचे आहे. आणि ही कुंडी आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचे आहे जिथे जास्त ऊन नसेल म्हणजे ती माती ओली राहील. अशा ठिकाणी आपल्यालाही कुंडी ठेवायचे आहे जवळपास 12 दिवसांमध्येच कढीपत्त्याचे झाड हळूहळू वाढताना तुम्हाला दिसून येईल.
त्यानंतर हे रोप जेव्हा चार इंचाचे होईल तेव्हा तुम्ही या रोपाला मोठा कुंडीमध्ये लावू शकता म्हणजेच मोठ्या कुंडीमध्ये लावण्यासाठी हे रोप तयार झालेले असेल जर आपण पहिल्यापासून हे बी मोठ्या कुंडीमध्ये लावले तर ते रोपांमध्ये रूपांतर व्हायला वेळ लावते किंवा कधीकधी रूपांतर होत नाही त्यामुळे आपण पहिले छोट्या कुंडीमध्ये ते रोप उगवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतरच ते मोठ्या कुंडीमध्ये लावायचे आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे कढीपत्त्याचे झाड उगविण्यासाठी आपण जी माहिती घेणार आहोत, ती माती अर्धी वाळू असली पाहिजे.
अर्धी माती असली पाहिजे याने काय होते तर कुंडी मध्ये टाकलेले पाणी कुंडली मध्ये गेल्यानंतर ते लगेचच खाली उतरते आणि कढीपत्त्याच्या झाडाला कायम असे पाणी लागते जे जास्त वेळ त्या कुंडीमध्ये असू नये जर जास्त पाणी दिल्यास ते झाड मरून जायची शक्यता जास्त असते. त्यानंतर मोठ्या कुंडीमध्ये मध्यभागी थोडासा खड्डा करून आपण जे छोट्या कुंडलीमध्ये लावून घेतलेले रोड काढून त्या मध्ये ठेवायचे आहे आणि मोठ्या कुंडीमध्ये लावल्यानंतर त्याला जास्त उन्हामध्ये ठेवायचे आहे कारण कढीपत्त्याच्या झाडाला जास्त उन्हाची गरज असते.
त्यामुळे त्याला उन्हामध्ये ठेवणे गरजेचे असते त्यानंतर आपले झाड जास्त वाढण्यासाठी किंवा त्याला जास्त पाणे येण्यासाठी आपण काय करू शकतो कोणत्या प्रकारची काळजी घेऊ शकतो हे जाणून घेणार आहोत. अनेक जण झाडांवर वेगवेगळ्या फर्टीलायझर ची फवारणी करत असतात पण आज आपण असे एक नैसर्गिक फर्टीलायझर जाणून घेणार आहोत जे आपण रोज वापरत असतो मात्र हे एक फर्टीलायझर आहे हे आपल्याला माहित नसतं.
तर जेव्हा आपण जेवणासाठी भात बनवतो तेव्हा तांदूळ धुतल्यानंतर जे पाणी असते ते आपण असेच फेकून देतो पण तसे न करता हे पाणी आपण कढीपत्त्याच्या झाडाला घातले तर आपल्या झाडाची वाढ व्हायला मदत होईल. त्यामुळे सर्वप्रथम तांदूळ धुऊन घ्यायचे आहे आणि त्यामध्ये जरा जास्त पाणी टाकून एक तासासाठी ते तांदूळ तसेच पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत एक तास झाल्यानंतर जे पाणी आहे ते कढीपत्ता लावलेल्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकायचे आहे या उपायामुळे कढीपत्त्याचे झाड खुप लवकर वाढू लागेल आणि त्याला भरपूर पाने येतील.
जेव्हा आपण कोणत्याही झाडाला फर्टीलायझर देतो तेव्हा त्या झाडातील असलेले बाकीचे रान काढून टाकायचे आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.