चमचाभर रांगोळी अशी वापरली.! पितळाचे देव सोन्यासारखे चमकू लागले.! एकदा नक्की ट्राय करा.!

आरोग्य

अनेकदा आपल्या घरातील देवांच्या मुर्त्या या थोड्याशा काळपट होतात. पितळ्याच्या मुर्त्या असल्यामुळे पितळ हे लवकर काळे पडत असते त्यासाठी आपण बाहेरच्या दुकानांमध्ये जाऊन यामुळे त्या साफ करून आणतो पण आज आपण घर बसल्या या मुर्त्या कशा साफ करायचे आहेत हे जाणून घेणार आहोत आणि हे करण्यासाठी आपल्याला काही मोजक्या गोष्टी लागणार आहे.

चला तर मग जाणून घेऊया आपण कशाप्रकारे घरातील म्हणजेच देवघरातील मुर्त्या कशा साफ करायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्याला घरातील कोण कोणती सामग्री लागणार आहे. आणि साफ करण्यासाठी आपल्याला कोणती प्रक्रिया करायची आहे. तर सर्वात पहिले आपल्याला एका टब मध्ये किंवा कोणत्याही एका पात्रामध्ये. कोमट पाणी घ्यायचे आहे.हे पाणी कोमट असले पाहिजे गरम पाणी घेण्याची काहीही गरज नाहीये.

त्यामुळे आपल्याला थोडा प्रमाणामध्ये गरम पाणी घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये चिंच टाकायचे आहे. आता आपल्या घरामध्ये दही असले नसले तरी चालेल. चिंच मात्र सगळ्यांच्याच घरांमध्ये असते. प्रत्येकाच्या घरामध्ये चिंच सहजरीत्या सापडते त्यामुळे आपल्याला छोटासा एक चिंचेचा गोळा या पाण्यामध्ये टाकायचा आहे. चींचेच्या मदतीने आपल्याला देवांच्या मुर्त्या साफ करण्यास मदत होणार आहे.

चिंचेचा वापर मुळे मूर्त्यां वर एक चमक यायला मदत होणार आहे आणि मुर्त्यांवर जमा झालेला काळा थर लवकर निघून जाणार आहे त्यानंतर या पात्रांमध्ये आपल्याला दोन चमचे रांगोळी देखील टाकायची आहे. रांगोळी ही इथे स्क्रब सारखे काम करणार आहे. त्यामुळे दोन चमचे रांगोळीचा वापर आपल्याला करायचा आहे. त्यानंतर शेवटची गोष्ट आपल्याला इथे टाकायची आहे ती म्हणजे एक चमचा बेसन पीठ.

हे वाचा:   घरातल्या माशा, उंदिर, मच्छर घरातून पळून जातील.! एकही कीटक घरात दिसला तर बोला.! असा धूर घरात फक्त दहा मिनिटे ठेवा.!

आता तुम्ही म्हणाल बेसनपीठ हे मूर्ती साफ करण्यासाठी का वापरले जाते कारण बेसन पिठामध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात, जे वस्तू अधिक उजळ बनविण्यासाठी कामी येतात त्यामुळे आपल्याला एक चमचा बेसन यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आता मुर्त्या टाकायचा आहेत. या सर्व मुर्त्या या पात्रामध्ये टाकल्यानंतर एकेक मूर्ती घेऊन आपल्याला चिंचेच्या सहाय्याने मूर्तीला हळूवारपणे घासायला सुरुवात करायची आहे.

अगदी हळूवारपणे आपल्याला या मुर्त्या घासून घ्यायचे आहे हे जसे तुम्ही यामुळे त्यांना हळुवारपणे घासायला सुरुवात कराल तसे त्यावरील काळपटपणा कमी होईल. आणि रांगोळी मुळे मूर्तीवर असलेल्या छोट्या छोट्या छीद्रंमधील देखील काळपटपणा निघून जाईल. रांगोळी ही एक स्क्रब सारखी काम करणार आहे त्यामुळे मुर्त्या लवकर स्वच्छ होण्यास मदत होणार आहे आहे आणि अजून आकर्षित दिसायला देखील मदत होईल.

हे वाचा:   पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला ची साथ का येते.? प्रत्येकाच्या घरात का आहे सर्दी पडसे चा रुग्ण.! अत्यंत महत्त्वाची माहिती.!

त्यानंतर आपल्याला एक ब्रश घ्यायचे आहे.हे हे ब्रश कोणत्याही प्रकारचे असू शकते आणि एकदा का चींचेने देवांना एका ब्रशच्या सहाय्याने याने मुर्त्यांना घासून घ्यायचे आहे,थोडा वेळ घासल्यानंतर तुम्हाला स्वतःला एक फरक जाणून येईल आणि मुर्त्या मध्ये झालेला फरक तुम्हाला दिसून येईल. मुर्त्या पूर्वीसारख्या नवीन असल्यासारखा चमकू लागतील त्यावर एक चमक येईल आणि मुर्त्या नवीनच दिसू लागतील आणि हा उपाय केल्यामुळे परत मुर्त्या लवकर काळया पडणार नाहीत.

याचा वापर आपण दररोज देखील करू शकतो किंवा महिन्यातून एकदा दोनदा देखील करू शकतो आणि मुर्त्या साफ करण्यासाठी आपल्याला जास्त खर्च देखील होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.