आपल्यापैकी अनेक जणांना खूप महिन्यांपासून खोकला लागत असेल आणि तो दररोज आपल्याला भरपूर त्रास देत असेल, सुका खोकला ज्यामधून खोकताना आवाज देखील येत असेल तर आपण त्यासाठी अनेक डॉक्टर उपचार करून मोकळे झाले असून आणि तरी देखील त्यावर काहीही परिणाम होत नसेल तर आजचा आपला घरगुती उपाय हा तुमच्यासाठी आहे.
आज आपण जो घरगुती उपाय जाणून घेणार आहोत त्यामुळे तुमचा खोकला तुमचा सुका खोकला, कितीही जुना असलेला खोकला कायमचा बरा होण्यास मदत होणार आहे. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला खर्च देखील होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे आणि हा घरगुती उपाय कशा प्रकारे बनवायचा आहे.
त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला पेरू घ्यायचा आहे. काहीसा आंबट, तुरट आणि गोड लागणारा पेरू हा नुसताच चवदार नसून त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत तसेच पेरू पौष्टिक देखील आहे. आयुर्वेदात पेरूचे सेवन करण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. पेरू हा स्त्रियांमध्ये अंगावरचे दूध वाढवणारा, पुरुषांमध्ये शु’क्रा’णू आणि पौ’रु’ष’त्व वाढवणारा आणि मेंदूची ताकद वाढवणारा आहे.
पेरू मुळे तहान शमते, पोटातील कृमि नष्ट होतात, हृ’दयगती सुधारते, उलटी येणे कमी होते, कफ कमी होतो, डोकेदुखी कमी होते. पेरू पोट साफ करण्यास मदत करतो. तोंड येण्यावर, ताप किंवा फेफरे येण्यावर देखील पेरू गुणकारी आहे. आपला कितीही जुना खोकला बरा करण्यासाठी पेरूचे सेवन हे खूपच औषधी आहे. त्यानंतर येथे आपल्याला वापरायचा आहे तो म्हणजे ओवा.
ओव्यामध्ये शरीरातील हानिकारक तत्वे बाहेर टाकण्यास मदत करणारी, तसेच पोटातील जळजळ रोखणारी तत्वे असतात. तसेच छातीमध्ये जमलेला कफ निघून येण्यासाठी देखील ओव्याचा उपयोग होतो. सायनसचा त्रास असणाऱ्या व्यक्तींकरिताही ओवा गुणकारी आहे. पोटाशी संबंधित अनेक विकारांमध्ये ओवा गुणकारी आहे. छाती मध्ये जमलेला कफ ज्याप्रकारे ओवा निघून काढण्याचे काम करतो त्याच प्रमाणे आपला सुखा खोकला देखील याच्या वापराने नाहीसा होणार आहे.
त्यानंतर आपल्याला काळे मीठ वापरायचे आहे काळे मीठ देखील सुका खोकल्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. सर्वप्रथम आपल्याला पेरू घ्यायचा आहे आणि त्याला स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. त्यानंतर पेरूच्या मध्यभागी छोटासा चौकोनाच्या आकारांमध्ये मध्ये खड्डा करून घ्यायचा आहे आणि चौकोनाचा छोटासा तुकडा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे आणि तो तसाच ठेवायचा.
त्यानंतर यामध्ये एक चमचा म्हणजेच तीन ते चार ग्राम ओवा करून घेतलेला खड्ड्यामध्ये त्या पेरू मध्ये टाकायचे आहे. त्याचबरोबर एक चमचा काळे मीठ देखील टाकायचे आहे आणि जेव्हा आपण तुकडा केला होता त्यावर चौकोन आकार तुकडा जो बाहेर काढलेला होता तो त्याला परत लावायचा आहे. घट्ट लावून घेतल्यानंतर. आपल्याला गॅस चालू करून त्यावर एक जाळी ठेवून हा पेरू व्यवस्थितपणे बाहेरून भाजून घ्यायचा आहे फक्त तीन ते चार मिनिटे मंद आचेवर हा पेरू भाजून घ्यायचा आहे.
तीन ते चार मिनिटे भाजून घेतल्या नंतर तो परत खाली उतरवून थंड होऊ द्यायचा आहे. भाजून घेतलेला पेरू थंड झाल्यानंतर तो आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायचा आहे आणि आता त्या मधील पन्नास ते शंभर ग्राम पेरूचा वापर आपल्याला करायचा आहे. जर तुम्हाला भरपूर जुना खोकला असेल तर त्याच्यामधील पन्नास ते शंभर ग्रॅम पेरूचे सेवन तुम्हाला करायचे आहे, असे सलग तीन दिवस केल्यास तुमचा कितीही जुना असलेला खोकला कायमचा बरा होईल.
जर अगदी साधा आणि सध्याच लागलेला खोकला असेल तर पेरू असाच भाजून खाल्ल्यास देखील तेवढाच फायदेशीर ठरेल. आणि जर अजून गुणकारी हवा असेल तर जसा या प्रकारे आपण भाजून घेतला आहे तो पेरू थंड झाल्यावर त्याच्यावर थोडेसे म्हणजे एक चमचा मध टाकुन तो पेरू खाल्ल्यास अधिक गुणकारी राहील आणि खोकला लवकर बरा होण्यास मदत होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.