आता म्हातारे ही दिसू लागतील जवान.! ८० वर्षाच्या आजीबाईचे केस झाले काळेभोर.! कसे झाले ते नक्कीच जाणून घ्या.!

आरोग्य

आज काल मानवाच्या प्रगतीच्या आंधळ्या धावेत प्रदूषण खूप वाढले आहे. आपण खाणारे अन्न तसेच पाणी पण दूषित झाले आहे एवढेच नव्हे तर आपण श्वासोच्छ्वास करतो ती हवा देखील आता प्रदूषित झाली आहे. पूर्वीच्या काळात माणसे अनेक वर्षे जगायची कारण त्यांचे आरोग्य चांगले असायचे मात्र आज काल वाढत्या प्रदूषणामुळे आपले आरोग्य निरोगी राहत नाही सोबतच आपल्या शरीराच्या इतर भागांवर याचा वाईट परिणाम होत आहे.

डोळ्यांची दृष्टी कमी येणे, कानांनी ऐकू कमी येणे तसेच केस सफेद होणे केसांचा रंग बदलने. आज आपण या लेखाद्वारे केस नैसर्गिक उपायाने काळेभोर व घनदाट कसे होतील हे पाहणार आहोत. केसांची समस्या आज काल अत्यंत सामान्य होत चालली आहे. प्रत्येक घरात एक ना एक माणूस असतो ज्याला ही समस्या भेडसावत असते. प्रदूषीत वातावरण व चुकीची खाण-पान हे या समस्येचे मूळ कारण होय.

बाजारात केस काळे करण्याची अनेक ऊत्पादने आज काल मिळतात. ज्यांच्या मदतीने तुम्ही अगदी काही मिनिटांमध्ये केस काळे करु शकता. बाजारात मिळणारे केसांचे डाय हे अनेक कृत्रिम रासायनिक केमिकल टाकून बनवले जातात. हे दर महिन्याला केसांना लावल्यास तुमचे घनदाट केस पातळ होवू लागतात. या केमिकलचा आपल्या केसांवर वाईट परिणाम झालेला दिसून येतो.

हे वाचा:   एक खोबरे असे वापरा, जुन्यातील जुनी सायनस, मायग्रेन, कफ, डोकेदुखी, डोळ्यांची कमजोरी सर्व होईल दूर...!

मात्र आता चिंता सोड आज आम्ही तुमच्यासाठी केस काळे करण्याचा एक साधा सोपा आणि आयुर्वेदीक उपाय घेऊन आलो आहोत. तुमच्या केसांना याचा कोणत्या ही प्रकारचा अपाय होत नाही या उलट याच्या वापराने तुमच्या केसांना याचा फायदाच होतो. चला आता वेळ न घालवता पाहूया हा उपाय. मित्रांनो कोरफड या वनस्पतीला तुम्ही सगळेच ओळखतच असाल आपल्या परिसरात कोरफडची झाडे मिळतात.

कोरफड आखुड असते आणि याचे खोडच याचा संपूर्ण आकार असतो. कोरफड अत्यंत गुणकारी आहे. यात अनेक घटक आहेत जे आपल्या त्वचेसाठी अत्यावश्यक आहेत. चेहर्यावरचे डाग व पूरळे घालवण्यासाठी जगभरात कोरफडीच्या रसाचा वापर केला जातो. केसांची मूळे भक्कम व मजबूत करण्यासाठी कोरफडीचा रस खूपच फायदेशीर आहे. म्हणूनच या उपायासाठी आपणास कोरफडीचा रस घ्यायचा आहे.

दुसरा घटक जो आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे लिंबाचा रस. लिंबू हे एक बहुगुणी फळ आहे. लिंबात जीवनसत्व क मोठ्या प्रमाणात असते. लिंबू शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. अशक्तपणा दूर करण्यासाठी देखील लिंबाचा वापर केला जातो. पित्त, अपचन असल्यास लिंबाचे सेवन करावे त्वरित आराम मिळेल. आपल्या केसांसाठी देखील लिंबू खूप फायदेशीर मानले जाते.

लिंबाच्या रसाने तुमचे केस काळे तसेच मजबूत होण्यास मदत होते. आता कोरफडीचा रस व लिंबाचा रस एका पात्रात योग्य प्रमाणात मिक्स करुन घ्या. या नंतर बाजारात नैसर्गिक मेहंदी अगदी सहज उपलब्ध होते. ती आपल्याला हा उपायासाठी लागणार आहे. ही मेहंदी या दोन्ही घटकांमध्ये टाका व या तीन्ही घटकांचे छान मिश्रण तयार करुन घ्या. आता रात्री झोपण्याआधी हे मिश्रण तुमच्या केसांना लावा.

हे वाचा:   पायाला सतत गोळे येतात का.? दवाखाने करून औषधे खाऊन थकले आहात का.? मग हे एक काम करून बघा काय होते ते.!

आठवड्यातून एकदा असे तीन आठवडे सलग हा उपाय केल्यास तुमचे केस काळेभोर होतील. हा उपाय केल्यास तुम्हाला प्रत्येक महिन्याला केस कलर करण्याची काही गरज भासणार नाही. तुम्ही सहा-सात महिने तरी निर्धास्त होवू शकता. हा उपाय फक्त नैसर्गिक घटक वापरुन तयार केला गेला आहे त्यामुळे कोणता ही अपाय होण्याचा धोका यापासून नाही.

तुम्ही ही केस काळे करण्यासाठी हा उपाय नक्की करुन पहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.