सांधेदुखी, कंबर दुखी, गुडघेदुखी वयोमानानुसार हे दुखणं आणखी वाढत जात असते पण आज काल हे दुखणं स्त्री – पुरुष यांना म्हातारपण येण्याचा अगोदर हे दुखणे सुरू होत असते. कारण कामाच्या वेळी एकाच जागेवर जास्त वेळ बसून राहिल्याने, शरीराची हालचाल न करणे, वजन जास्त असणे किंवा व्यायाम न करणे यामुळे लोकांना पाठदुखीचा त्रास होतो. पाठदुखी ही महिला व पुरुषांमध्ये एक हल्ली सर्व साधारण सामान्य समस्या झाली आहे.
पाठ दुखी ही दुखापत, काम करताना किंवा काही वैद्यकीय परिस्थितींमुळे होऊ शकते. हे कोणत्याही वयाच्या लोकांना प्रभावित करू शकते पण या गोष्टीना दुर्लक्ष केल्याने नंतर त्यांचा त्रास आणखी वाढतो त्यासाठी आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे की हा उपाय केल्याने ,या उपायाचे सेवन केल्याने दुखने कमी होईल. हा आजचा उपाय करण्या साठी आपल्याला तुळशीचे पाने घ्यायचे आहेत.
आपल्याला बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे तुळशी मिळतात जसे की,श्यामा तुळशी, राम तुळशी, विष्णू तुळशी, वन तुळशी, लिंबू तुळशी असे तुळशीचे अनेक प्रकार आहेत. या पाच प्रकारच्या तुळशीचे अनेक फायदे आहेत. या तुळशीचे जसे अधायत्मिक उपयोग असतात त्याचबरोबर तुळशीचे आयुर्वेदीक उपाय देखील लाभदायी मानले गेले आहे. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला एका भांड्यात एक ग्लास पाणी घेऊन ते पाणी गरम करायला ठेऊन द्यायचे आहे.
तुळसी चे सहा सात पाने पाण्यात टाकून द्यायचे मग पाण्याला चांगलं उकडून घेऊ ह्यानंतर पाण्याला हलके कोमट करायला ठेऊन त्यानंतर त्याच सेवन करायचे आहे. अशा प्रकारे रोज एक एक ग्लास घेतल्याने खूप फायदेशीर ठरतात पण ज्या लोकांना हायपोथायरॉईड आहे त्यांनी ह्या मिश्रणाच सेवन करू नये त्याच्यासाठी आम्ही तुम्हांला दुसरा उपाय सांगणार आहे. एका ग्लास कोमट पाण्यामध्ये मेथी ची पावडर टाकून त्याच सेवन करायचे आहे पण मेथी ची पावडर चार चिमुटभर टाकायची आहे.
जास्त मेथी पावडर टाकल्याने उष्णता वाढेल म्हणून आपल्याला चार चिमुटभर मेथी पावडर घेयाची आहे. तुळसी आणि मेथी हे रोज सेवन केल्याने आपल्याच खूप फायदेशील ठरेल. तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. अनेक रोग बरे करण्यास आणि शरीराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही तुळशी खूप प्रभावी आहे.
ही वनस्पती शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते आणि जीवाणू आणि विषाणूजन्य संक्रमणाशी लढा देते. तुळशीच्या पाण्याचे आरोग्य मिळविण्यासाठी रोज हे पाणी रोज घ्या आणि मेथीमध्ये असलेले पाचक एंझाइम स्वादुपिंड अधिक अॅक्टिव करतात, ज्यामुळे पचन सुधारते. यामध्ये भरपूर फायबर असतात ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते अश्या प्रकारे आपण लेखात सांगितलेला उपाय काही दिवस केला तर आपल्याला लवकर फरक जाणवेल.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.