नमस्कार मित्रांनो जर तुम्ही लहान किड्यांना बघून ही दुर्लक्ष करत असाल आणि असा विचार करत असाल कि हे तुमच काहीच बिघडवू शकत नाही तर तुम्ही पूर्णपणे चुकीचा विचार करत आहात. कारण असेही काही किडे असतात जे तुमच्या मृ’त्यूला कारणीभूत ठरू शकतात. आज मी तुम्हाला याच किड्यांबद्दल माहिती देणारी आहे. यानंतर तुम्हाला वाघ व सिंहापेक्षा जास्त या किड्यांची भीती वाटू लागेल. टिक हा कीड गोचिडीसारखा असतो.
हा कीडा तुमच्या शरीरामध्ये कुठेही जाऊ शकतो. केस, कानामध्ये एवढेच नव्हे तर हे आपल्या मानेवर व काखेमध्ये सुद्धा कब्जा करतात. या किड्याचा आकार गोल असतो. सगळ्यात जास्त आश्चर्यची गोष्ट म्हणजे हा कीडा त्याच्या आकारापेक्षा दुप्पट मांस खाऊ शकतो. हे एकाच ठिकाणी चिपकून राहतात व मांस खाऊन त्यांचा आकार वाढू लागतो. यामुळे त्या व्यक्तीला तर दुखतेच परंतु त्या सोबतच हे अनेक आजारांना आमंत्रण देतं.
त्यामध्ये खाज, ताप, अल्सर, डोकेदुखीसारखे अनेक आजार होतात. त्यामुळे तुमची व तुमच्या पाळीव प्राणी जसे कुत्रे, मांजराची स्वछता नेहमी ठेवा. मित्रांनो जेव्हा आपण वि’षाबद्दल विचार करतो तेव्हा पहिलं आपल्या डोळ्यासमोर साप येतो. परंतु हे गरजेचे नाही की नेहमी सापांमध्येच विष असते काही भयानक कोळीसुद्धा सापापेक्षा कमी नसतात. ऑस्ट्रेलियामध्ये आढळून येणार हा कोळी हजारो माणसांना मा’रण्यासाठी पुरेसा आहे.
या कोळीच्या ४० वेगवेगळ्या प्रजाती आहेत. यामध्ये नर कोळी जास्त वि’षारी असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही कोळी बघाल तेव्हा नक्की एकदा बघा की हा फरल वेब स्पायडर तर नाही आहे ना. जर वि’ष चढले तर डोकेदुखी, घाम येणे ही पहिली लक्षणे दिसून येतात नंतर हळूहळू विष पूर्ण शरीरभर पसरल्यानंतर व्यक्तीला वाचवणे अशक्य होते. साउथर्ण फ्लॅनेल मोथ्स हा दिसायला आकर्षक असतो.
परंतु याला आकर्षित होऊन याला हात लावण्याची चूक करू नका. कारण याच्या वर खूप सुंदर दिसणारे काटे खूपच विषारी असतात. हे आपल्या त्वचेला लागल्यावर लगेच परिणाम दाखवू लागेल. जसेकी अंगदुखी, डोकेदुखी, एलर्जी, उलटी, ताप हे होऊ लागेल. फक्त स्पर्श झाल्याने हे सगळे होऊ लागेल विचार करा अजून किती भयंकर परिणाम होऊ शकतात.
मित्रांनो तुम्ही मातीवर मुंग्यांचे वारूळ बघितलेच असेल. ज्यांना बनवणारे ह्या मुंग्याच असतात. चुकून जर तुम्ही चालताना या मुंग्यांच्या वरुळावर पाय ठेवला तर हे तुमच्यासाठी खूपच हानिकारक ठरेल. कारण ह्या मुंग्यांच्या चावल्याने इतर मुंग्या चावल्यापेक्षा जास्त दुखत. जर तुम्हाला आधीच कोणतीतरी एलर्जी असेल तर या मुंग्यांच्या विषामुळे जास्त त्रास होऊ लागेल. या मुंग्यांच्या २२ प्रजातींमध्ये जास्त विषाचे प्रमाण दिसून येते.
जेव्हा आपण भयानक किड्यांबद्दल बोलतच आहोत तर उवांना कसे विसरू शकतो. कधीना-कधी तुमच्या डोक्यामध्ये उवा झाल्याचं असतील. केसांमध्ये जाऊन रक्त शोषून घेण्याचं काम तर त्या करतच असतात परंतु या एकपासून अनेक खूप वेगाने तयार होऊ लागतात. यामुळे डोक्यामध्ये खाज उठणे, डोकेदुखी या समस्या होतात. त्सेत्र या किड्यापासून सुटका मिळवण्यासाठी बरेच मार्ग आहेत.
काही लोक फणी वापरून यांना मारतात व आता तर मेडिकलमध्ये औषधे सुद्धा येऊ लागले आहेत. परंतु पूर्णपणे नष्ट होई पर्यंत एवढा त्रास देतात की तो असह्य असतो. मित्रांनो विंचू तर तुम्हाला माहीतच असेल. त्याच्या डंकामुळे माणूस २४ तासांमध्येच म’रू शकतो. भारत, पाकिस्तान व नेपालमध्ये आढळणारे लाल विंचू खूप जास्तच भयानक असतात. हे फक्त लाल रंगाचे नसतात ह्यांचे अनेक रंग असतात.
हे विंचू त्यांच्या रस्त्यात येणाऱ्या किड्यांना खाऊन टाकतात. त्यांच्या वाटेमध्ये येणाऱ्या माणसाला ते खूप जलद गतीने डंक मारतात. काही माणसांना विष एवढ्या लगेच चढते कि लगेच दवाखान्यामध्ये भरती करावे लागते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.