मूळव्याध चा शेवटचा उपाय करून टाका.! डॉक्टरांकडे जाण्या आधी एकदा हा उपाय करून बघा.! १००% फायदा होणार.!

आरोग्य

जर आपल्यापैकी कोणाला मु’ळ’व्याध असेल तर त्यांना मु’ळव्याध कसा होतो व त्याचे किती प्रकार असतात हे माहीतच असेल पण त्याचबरोबर त्यामुळे किती त्रास होतो हे देखील माहीत असेल त्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो, जसे की डॉक्टरचा सल्ला घेऊन अनेक औषधे घेणे. जर औषधांनी काही झाले नाही तर ऑपरेशन देखील करणे आणि त्यानंतर देखील मुळव्याध काही आपला पिच्छा सोडत नाही त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे पथ्य करावे लागतात सोबतच आपल्याला अनेक आयुर्वेदिक औषधे देखील घ्यावी लागतात.

मुळव्याध जरी बरा झाला तरी मुळव्याधामुळे तयार झालेले मस्से म्हणजेच जखम काही बरी होत नाही त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत मी मुळव्याधाची जखम बरे करण्यासाठीचा घरगुती उपाय. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे आणि हा उपाय बनविण्याची प्रक्रिया काय असणार आहे. हा उपाय बनविण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे लागणार आहे ती म्हणजे हळद.

हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो, ही जंतुनाशक आहे. म्हणून आपल्याला इथे हळदीचा वापर करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे. तुम्ही एका वाटीमध्ये देखील हा उपाय बनवू शकता किंवा जर तुम्हाला हा उपाय स्टोअर करून ठेवायचा आहे तर तुम्ही ज्या डब्बीमध्ये किंवा ज्या छोट्याशा कंटेनर मध्ये हा उपाय स्टोअर करून ठेवणार आहात त्यामध्ये देखील हा बनवू शकता.

हे वाचा:   या झाडाची फक्त तीनच पाने वापरा.! चरबी अगदी बर्फा सारखी वितळू लागेल.! वजन कमी करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा लेख.!

त्यामुळे इथे आपल्याला एक ते दोन चमचे हळद घ्यायचे आहे आणि त्यामध्ये कोणत्याही उच्च ब्रँडचे खोबरेल तेल म्हणजेच नारळाचे तेल घ्यायचे आहे.सर्वप्रथम नारळाचे तेल एक चमचा घ्यायचे आहे. आणि नंतर थोडे थोडे करून आपल्याला यामध्ये हे तेल वाढवत जायचे आहे कारण हा उपाय जास्त पातळ होऊ नये कारण ज्या त्वचेवर आपण लावणार आहोत तिथे हा तसाच राहावा म्हणून सर्वप्रथम आपण त्याला जाड बनवायचे आहे.

जेणेकरून तो त्वचेवर चिटकून राहील त्यानंतर यामध्ये आपल्याला एलोवेरा जेल टाकायचे आहे. जर हे एलोवेरा जेल म्हणजेच कोरफडीचे जेल आपण कोरफडीच्या रोप येते तीच कोरफड वापरायची आहे. जेव्हा आपण एका कोरफडीची फांदी तोडतो तेव्हा ती पाच ते दहा मिनिटांसाठी जिथून तोडली आहे तो भाग खाली ठेवून उभी करून ठेवायची आहे असे केल्यास त्यामधील असलेले जे विषारी घटक आहेत.

जे आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या त्वचेसाठी चांगले घटक नाही आहेत असे पिवळ्या रंगाचे एक द्रव्य त्यामधून निघते आणि पाच ते दहा मिनिटानंतर तो भाग म्हणजे पिवळा झालेला भाग आपल्याला कापून टाकायचा आहे आणि त्यानंतर त्यामधील जेल आपल्याला वापरायचे आहे कारण हा पिवळा भाग आपल्या त्वचेसाठी चांगला नसतो सोबतच आपल्या शरीरासाठी देखील तो चांगला नसतो. त्यानंतर एक ते दोन चमचे जेल आपल्याला वापरायचे आहे.

हे वाचा:   शाम्पू लावून लावून थकला पण कोंडा गेला नाही? हा उपाय करा कोंडा वाहून जाईल.!

आता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे मिक्स करून घ्यायच्या आहेत.जर आपल्याला यामध्ये हळदीची कमी वाटत असेल तर आपल्याला त्यामध्ये अजून थोडी हळद टाकून मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी ही पेस्ट मुळव्याधाच्या मस्स्यांवर लावायची आहे. एका आठवड्याच्या वापरामध्येच यामध्ये फरक झालेला दिसून येईल मस्से म्हणजेच जखम नाहीसे होतील.

आपल्याला त्रास देखील होणार नाही पण हे तर झालं मुळव्याधाचे बाहेरील उपचार म्हणजेच बाहेरून हे ठीक होईल पण जर आतून कायमचा मुळव्याध बरा व्हायचा असेल तर आपल्याला काही तथ्य देखील पाळावी लागतील जसे की काकडीचा वापर करणे, जेवणात काकडीचा समावेश करणे त्याचबरोबर ताक पिणे. जर तुमच्या घरात ताक बनत असेल तर दिवसाचे दोन ते तीन ग्लास ताक तुम्ही प्यायले पाहिजे.

जर ताक बनत नसेल तर जवळपास दोन ग्लास ताक तरी प्यायले पाहिजे कारण ते थंड असते सोबतच ज्यामध्ये जास्त पाणी आहे अशा गोष्टी खाल्ल्या पाहिजेत जसे की काकडी कलिंगड नारळ पाणी. यामुळे आपला मूळव्याध कायमचा बरा होईल किंवा यापुढे आपल्याला मूळव्याध होणार नाही भरपूर पाणी प्यायले पाहिजे सोबतच अंजीर चे देखील सेवन केले पाहिजे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.