पायाला सतत गोळे येतात का.? दवाखाने करून औषधे खाऊन थकले आहात का.? मग हे एक काम करून बघा काय होते ते.!

आरोग्य

आपल्या शरीरावरील प्रत्येक अवयव अत्यंत महत्त्वाचा असतो. जर एखादा अवयव दुखू लागला तर संपूर्ण शरीरच अगदी थकून जाते, त्याचबरोबर अनेकदा शरीरावर वेदना भरपूर प्रमाणात होत असतात. आपले हात पाय तसेच शरीरावरी प्रत्येक अवयव हा आपल्या कार्यरचनेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. हल्ली अनेकांना एक समस्या त्रास देते ती म्हणजे पायाला सतत गोळे येणे. आपल्यापैकी अनेक जण दिवसभर उभे राहून काम करत असतात.

अनेक जण मैलो न मैल चालतात तसेच अनेक जणांचे काम करण्याचे स्वरूपच उभे राहून करायचं असते आणि म्हणूनच एका ठिकाणी जास्त वेळ उभे राहिल्याने आपल्या पायांच्या तळव्यांवर प्रेशर निर्माण होतो. बहुतेक वेळा आपल्या पायांमधील नसा या दबलेल्या असतात. नसा मधील र’क्तप्रवाह सुरळीत होत नाही, नसांना सूज आलेली असते, र’क्त प्रवाह एकाच ठिकाणी जमा होऊन काळपट भाग तयार होतो.

या सगळ्या समस्या जर तुम्हाला सुद्धा त्रास देत असेल तर आजच्या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुम्हाला लवकरच फरक जाणवणार आहे. आपल्यापैकी अनेक स्त्री व पुरुष हे दिवसभर घराच्या बाहेर असतात. काही जणांना कामाच्या निमित्ताने दारो दार फिरावे लागते. तर काहींना एकाच ठिकाणी उभे राहून काम करावे लागते.

हे वाचा:   दहा मिनीटात गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी बंद होईल, या एका उपायाने सर्व दुखणे पळून जाईल.!

कामाचे स्वरूपच असे असल्याने आपल्या असला काही इलाज देखील राहत नाही परंतु संध्याकाळी घरी आल्यावर आपण काही छोटे-मोठे उपाय सहजच करू शकतो. आपल्या पायांना वारंवार गोळे येत असेल तर सर्वात आधी आपल्याला आयुर्वेदिक उपचार करणे गरजेचे आहे, यासाठी काही पथ्य पाळणे देखील महत्वाचे आहे. जर तुमच्या पायाला वारंवार गोळे येत असतील तर अशावेळी जास्त वजन उचलू नये त्याचबरोबर चालताना आपल्या तळव्यांची विशिष्ट काळजी घ्यायला हवी.

रात्री झोपताना पायांच्या तळव्यांना तिळाचे किंवा मोहरीचे तेल गरम करून या तेलाद्वारे मालिश करायला हवी, असे केल्याने आपल्या पायाच्या नसा मोकळ्या होतात त्याचबरोबर जिऱ्याचे पाणी आपल्याला नियमितपणे सेवन करायला हवे. जिरे मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात. जर तुमच्या शरीरातील र’क्त प्रवाह सुरळीत होत नसेल, र’क्तामध्ये ब्लॉकेज होत असेल तर ते ब्लॉकेज काढण्याचे काम जिरे करतात त्याचबरोबर आपल्याला उभे राहून काम करायचे नाही.

हे वाचा:   कोणत्या मिरचीचे सेवन करावे हिरवी मिरची की लाल मिरची? कोणती मिरची आहे आरोग्यासाठी उपयुक्त...!

जास्तीत जास्त बसून कशा पद्धतीने काम करता येईल याचा विचार आपल्याला करायचा आहे, त्यासाठी बाजारामध्ये अनेक गोष्टी देखील उपलब्ध होतात. आपल्या घरामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक असतात त्यांनी सुद्धा जास्त प्रमाणात एकाच ठिकाणी बसू नये. थोडीफार शरीराची हालचाल करणे गरजेचे आहे. जर हालचाल झाली तर तुमच्या शरीरातील र’क्त प्रवाह सुरळीत होतो, नाहीतर तुमच्या पायाला गोळे येतात. एकदा का पायाला गोळे आले तर ते लवकर जात नाही आणि या वेदना देखील भयंकर असतात.

अशावेळी घरातील छोटे मोठे काम करून देखील तुम्ही तुमचे हात पाय अगदी सुरळीत व व्यवस्थित ठेवू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.