मरेपर्यंत कधी कंबरदुखी झाली तर बोला, आयुष्यातून हे सात आजार कायमचे निघून जातील, एकच उपाय करा आणि व्हा टेन्शन फ्री.!

आरोग्य

आजकालच्या जीवनशैलीमुळे आपल्याला स्वतःकडे लक्षच देता येत नाही. मग अचानक कधीतरी दुखणं चालू होत. कधी कंबर दुखी तर कधी सांधे दुखी. यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. कधी कधी हे दुखणे एवढे होऊन जाते की आपल्याला ओपरेशन करण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही. कंबरेच्या वेदना किंवा कंबर दुखणे ही सध्या एक सामान्य समस्या झाली आहे, व्यायामाचा अभाव, आधुनिक जीवनशैली, कोणत्याही शारीरिक स्थितीमध्ये बसणे यांसारख्या गोष्टींमुळे अगदी तरुण वर्गात सुद्धा हा आजार मोठ्या प्रमाणावर पसरला आहे.

एकाच जागी खूप वेळ बसून काम करणे सुद्धा याला कारणीभूत आहे. म्हणूनच आज आपण बघणार आहोत यासाठी एक महत्त्वाचा उपाय. कंबर दुखणे, सांधे दुखणे, हाडांमध्ये कटकट आवाज येणे, गुडघे दुखी, विनाकारण वजन वाढणे, हाडांमध्ये गाठी होणे किंवा हाडे ठिसूळ होणे या सगळ्यावर हा एकमेव उपाय आपण नक्की करून बघा. आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे बदाम आणि सुकं खोबरं.

८ ते १० बदाम आणि दोन वाट्या सुकं खोबर घेऊन ते थोडस तव्यावर गरम करावं. जास्त वेळ सुद्धा गरम करू नये. याची आपल्याला पूड बनवायची आहे म्हणून ते जास्त भाजू नये फक्त थोडं कुरकुरीत करून घ्यावे. हे मिश्रण थोडे कुरकुरीत झाल्यावर एकत्र मिक्सरला बारीक वाटून घ्यावे. ही पावडर तुम्ही एक महिन्यासाठी सुद्धा करून ठेवू शकता. ही पावडर दुधात उकळून घ्या आणि थोडं कोमट दूध प्या.

हे वाचा:   हजारो लाखो रुपये खर्च करूनही फरक पडला नसेल एवढा फायदा हे करून दाखवेल, याचे अमूल्य फायदे तुम्हाला हैराण करून सोडतील.!

दूध उकळून त्यात 3 ते 4 चमचे ही पूड टाकावी आणि पुन्हा दूध उकळवावे. हे उकळलेले दूध किमान १० दिवस तरी प्यावे. याचा फरक तुम्हाला नक्की पडेल. हाडांच्या मजबुतीसाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे. भारतात नारळाचा वापर मोठ्याप्रमाणात केला जातो. धार्मिक कार्यात, स्वयंपाकासाठी तसेच विविध आजारात नारळाचा वापर होतो. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, पोटॅशिअम, फायबर, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्स असल्याने याच्या सेवनाने अनेक फायदे होतात.

खोबऱ्याच्या पेस्टमध्ये बदाम मिश्रित करुन नियमित खाल्ल्यास स्मरणशक्ती सुधारते. यात अ‍ँटी बॅक्टेरिअल, अ‍ँटी फंगल आणि अ‍ँटी व्हायरल तत्वामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. सुक्या खोबऱ्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण आढळते. जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. नारळामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. यामुळे हार्ट ब्ल़ॉकेज होण्यापासून रोखले जाऊ शकते.
दूध हे कॅल्शियम चे प्रमुख स्त्रोत आहे.

हे वाचा:   महिनाभर जो कोणी हे पदार्थ खाईल त्याच्या डोळ्यावर असलेला चष्मा कायमचा निघून जाईल.! अजूनही विश्वास बसत नसेल तर मग हे एकदा वाचाच.!

कॅल्शियम मुळे हाडांना बळकटी मिळते. त्यामुळे नियमित दूध पिणे हे पाठ, कंबर दुखण्यावर उत्तम औषध आहे. बदामात पेशी, स्नायू, हाडांना आवश्यक असलेले कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम हे धातू असतात. भिजवलेले बदाम तर आपण साल काढून खातोच पण हा उपाय करताना आपल्याला सुके बदाम साल न काढता वापरायचे आहेत. हा उपाय तुम्ही नक्की करून बघाल. यात आपण अतिशय उपयुक्त आणि महत्वाचे पदार्थ वापरले आहेत. याचा फायदा नक्की घेऊन बघाच.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.