डोळ्यांची ताकद वाढवण्याचे याहून सोपे औषध नसेल.! घातलेला चष्मा द्यावा लागेल फेकून, आता आंधळ्याला पण दिसू लागेल.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेक जणांच्या घरांमध्ये काही माणसे असे असतील त्यांना डोळ्यांचे आजार तर असतीलच पण काही जणांना तर लहान वयामध्येच डोळ्यांचे आजार सुरू झाले आहेत. डोळ्यांची दृष्टी कमी होणे सोबतच डोळ्यातून पाणी येणे,डोळे कधी कधी लाल होणे हे आता मोठ्यांबरोबरच लहानांना देखील उद्भवू लागले आहे, अशावेळी आपण कोणत्या प्रकारच्या औषधांचा वापर करावा किंवा कोणती ट्रीटमेंट घ्यावी हे आपल्याला कळत नाही.

अनेकदा पण अशी काही औषधे वापरतो त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो किंवा जास्त गोळ्या घेतल्यामुळे आपल्याला अनेक दुसरे आजार देखील होऊ शकतात. कधी ही डोळ्यांची समस्या अचानक उद्धवते तर कधी हळूहळू याची जाणिव तुम्हाला होते. या समस्येची अनेक कारणे असू शकतात. तुम्ही जर सतत कम्प्युटर काम करत असाल तर डोळ्यांवर ताण आल्याने तुम्हाला धुसर दिसण्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे काही आजार व वृद्धपणामुळेही दृष्टी अंधुक होते. आपल्या सर्वांना माहिती आहे डोळा हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे म्हणून डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. डोळ्यांच्या संबंधित असलेल्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. आजचा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला येथे मनुकांचा वापर करायचा आहे.

डोळ्यांसाठी चांगले असतात. मनुका या आपल्या डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असतात. भिजवलेले मनुका खाण्याचे अनेक फायदे आहेत, यामुळे डोळ्यांची कमजोरी दूर होते. मनुकामध्ये व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे डोळ्यांच्या समस्या, मोतीबिंदू आणि खराब प्रकाशाची समस्या दूर होते. अशा स्थितीत भिजवलेली मनुका नियमित खाल्ल्यास तुम्ही तुमचे डोळे निरोगी होऊ शकतात.

त्यामुळे रात्री पाच ते सहा मनुका धुवून स्वच्छ एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घेऊन भिजत ठेवायचे आहेत आणि सकाळी उठल्यावर उपाशीपोटी याचे सेवन करायचे आहे. मनुके सेवन करताना जर तुम्हाला त्यातील बिया नको असतील तर तुम्ही त्या बिया काढू देखील शकतात. सकाळी उठल्यावर तुम्हाला जाड झालेल्या मनुका दिसून येतील. या मनुका तुम्ही तुमच्या मुलांना देखील देऊ शकता.

हे वाचा:   माशाचे डोके खाल्ल्याने शरीरात नेमके काय झाले.? माश्यांचे डोके शरीरात गेल्यास शरीरात होतात असे काही बदल.!

असे केल्याने आपल्या डोळ्यांवर अनेक प्रकारे फायदे प्राप्त होतात आणि आपली गेलेली दृष्टी परत यायला देखील मदत होते. जर मनुके सेवन दररोजरीत्या केले तर चष्मा देखील तुम्ही कायमचा काढून टाकू शकता त्यानंतर इथे आपल्याला वापर करायचा आहे तो म्हणजे बडीशेपचा. बडीशेप आपल्या डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर अशी आहे. डोळ्यांमध्ये जळजळ होत असेल,डोळे लाल होत असतील, डोळ्यांमधून पाणी येत असेल तर मात्र बडीशेप हा रामबाण उपाय आहे त्यामुळे इथे आपल्याला एक वाटी बडीशेप घेऊन त्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे.

या बडीशेपची पावडर बनवताना आपल्याला बडीशेपला भाजून घेण्याची काहीही गरज नाही, जशी आपण बडीशेप साध्या प्रकारे खातो तशीच ती बडीशेप आपल्याला इथे देखील वापरायचे आहे त्यामुळे एक वाटी बडीशेप ची बारीक पावडर तयार करायची आहे पण पावडर तयार करण्याआधी आपल्याला यामध्ये अजून एक गोष्ट ॲड करायचे आहे ती म्हणजे खडीसाखर. खडीसाखर छोटी छोटी जी बाजारामध्ये उपलब्ध असते. ती न वापरता खड्यावाली खडीसाखर आपल्याला वापरायची आहे.

जर त्यामध्ये देखील शक्य झाले तर आपल्याला धाग्याची खडीसाखर वापरायची आहे.
इथे आपण साखरेच्या ऐवजी खडीसाखरेचा वापर करत आहोत कारण साखर जेव्हा आपल्यापर्यंत येते तेव्हा त्यामध्ये अनेक प्रकारची रसायने देखील वापरली गेलेली असतात पण इथे तसे नाही. इथे आपल्याला सरळ साखरेचा खडा मिळतो त्यामुळे ही खडीसाखर साखरेपेक्षा जास्त गुणकारी असते त्यामुळे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात गोडवा हवा आहे तेवढ्या प्रमाणात खडीसाखर यामध्ये टाकायची आहे आणि याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे.

हे वाचा:   सकाळी उठल्याबरोबर एक तुकडा खाल्ला तर 21 दिवसाच्या आत सर्व वजन कमी होईल, आरोग्यासाठी आहे हजारो फायदे.!

ही पावडर वाटून झाल्यानंतर एका पात्रामध्ये सर्वप्रथम काढायचे आहे आणि त्याला थंड करून द्यायचा आहे कारण गरम गरम पावडर जर आपण स्टोअर करून ठेवली तर ती खराब देखील होण्याची शक्यता येऊ शकते त्यामुळे आपल्याला या पावडरचा भरपूर दिवस उपयोग करायचा असल्यामुळे प्रथम ती थंड होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर एका बरणीमध्ये ती स्टोअर करून आपल्याला ठेवायचे आहे. दररोज सकाळी एका ग्लास मध्ये एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा ही पावडर टाकून आपल्याला उपाशीपोटी घ्यायची आहे.

तसे आपण याचा वापर सकाळी करणार आहोत त्याचप्रमाणे याचा वापर आपल्याला संध्याकाळी रात्री झोपायच्या आधी एक तास करायचा आहे. अशाप्रकारे घरबसल्या आपण आपल्या डोळ्यांवर उपचार करू शकतो हळूहळू आपल्या डोळ्यांवर याचा फरक पडेल आणि आपल्या डोळ्यांची जळजळ आपल्या डोळ्यांमधून येणारे पाणी, व आपले डोळे लाल होणे किंवा आपल्याला असलेला चष्मा कायमचा निघून जाईल. हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला कोणताही जास्त खर्च देखील होणार नाही.

सोबतच यामध्ये वापरले गेलेले सर्व घटक हे घरगुती असल्यामुळे आपल्याला याचा कोणताही त्रास देखील होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.