आयुष्यात कधीही ऐकल्या नसतील ह्या किचन टिप्स.! कामे आता झटपट होतील.! या दहा किचन टिप्स प्रत्येक गृहिणीला माहिती असाव्या.!

आरोग्य

आपल्या स्वयंपाक घरामध्ये अशा काही वस्तू आपण दररोज आणत असतो पण त्याबद्दल फारशी माहिती आपल्याला नसते. त्या कशा वापरायच्या किंवा त्या वापरण्यासाठी चा योग्य प्रकार अशा छोट्या-मोठ्या टिप्स आज आपण जाणून घेणार आहोत,चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण जेव्हा देखील घरामध्ये कोणतेही नवीन भांडे आणतो जसे की नवीन तवा किंवा नवीन टोप अशाप्रकारे नवीन वस्तू आणतो.

त्यावर एक प्रकारचा स्टिकर असतो आणि हा स्टिकर जर तेव्हाच काढला तर तो अर्धा निघतो आणि त्याचा डाग तसाच राहतो. जर तो आपण काढला नाही तरी देखील त्याचा डाग राहतो. तर हा स्टिकर काढण्यासाठी व काढल्यानंतर त्यावर कोणताही डाग राहू नये म्हणून सर्वप्रथम गॅस चालू करून त्यावर कोणतेही आपण नवीन घेतलेले भांडे ठेवायचे आहे आणि ते गरम करायचा आहे.

गरम केल्यावर केवळ एका मिनिटांमध्ये तो स्टिकर हळूहळू निघू लागेल. हळुवारपणे त्या स्टिकर ला काढायचे आहे आणि यामुळे आपल्या भांड्यावर कोणत्याही प्रकारचा डाग देखील राहणार नाही. दूसरी टीप अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर ठरणारी अशी आहे. जेव्हा देखील आपण गॅसवर दूध गरम करायला ठेवत असतो तेव्हा आपण कितीही मंद आचेवर दूध ठेवले तरी देखील ते उतू जाते.

हे दूध उतू जाऊ नये म्हणून आपल्याला दुधाच्या टोपावर आडवा ताट ठेवायचा आहे किंवा कोणताही चमचा ठेवायचा आहे यामुळे काय होते तर दुधाला जी उकळी फुटते ती वर आल्यानंतर जो फुगा निर्माण होतो त्यावर चमचा चा अडथळा निर्माण झाल्यामुळे फुटत नाही व दूध उतू जात नाही. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा असा हा उपाय आपण घरी केला पाहिजे. त्यानंतर तिसरी टीप म्हणजे टोमॅटो जास्त काळ टिकून ठेवण्याचा उपाय.

आपल्या घरामध्ये जेव्हा आपण टोमॅटो आणतो तो टोमॅटो जास्त काळासाठी आपण टिकवून ठेवू शकत नाही. कधी कधी हे टोमॅटो खराब देखील होतात त्यामुळे जर आपल्याला टोमॅटो जास्त काळासाठी टिकवून ठेवायचे असतील तर टोमॅटो सर्वप्रथम पॅक बंद डब्यामध्ये ते स्टोअर करून ठेवायचे आहेत त्यानंतर बाजारामधून आणताना चांगल्या प्रकारचे म्हणजे घट्ट असणारे टोमॅटो घरी घेऊन यायचे आहेत जेणेकरून ते जास्त वेळ टिकतील आणि जेव्हा आपण त्या डब्यामध्ये टोमॅटो ठेवणार आहोत.

हे वाचा:   मासे खाणे योग्य की अयोग्य.? माशाचे शौकीन असलेले नक्की वाचा.! जाणून घ्या संपूर्ण माहिती.!

तेव्हा देठ खाली ठेवून त्यानंतर तशाप्रकारे टोमॅटो ठेवायचे आहेत जेव्हा आपण टोमॅटो ठेवणार आहोत तेव्हा त्याचा देठ हा खालच्या दिशेने असला पाहिजे असे केल्यास टोमॅटो कधीही खराब होत नाही जास्तीत जास्त पंधरा दिवस पर्यंत आपण हे टोमॅटो वापरू शकतो. त्यानंतर कधी कधी आपण फ्रीजमध्ये टोमॅटो काढून ठेवला असेल मग तो कापेपर्यंत मऊ होतो त्यामुळे जेव्हा आपल्याला टोमॅटो वापरायचा असेल तेव्हाच तो टोमॅटो काढून कापला तर तो आपल्याला कापण्यास देखील सोपा राहतो आणि व्यवस्थित रित्या कापला देखील जातो.

जर आपण साधी सुरी वापरली तर टोमॅटो कापायला आपल्याला अडथळा येतो पण तीच सुरी, आपण कात्री असणारी वापरली तर टोमॅटो चांगल्या पद्धतीने कापता येतो. त्यानंतर पाचवी टीप म्हणजे गवारची भाजी. आपल्यापैकी अनेक जण खात नाहीत कारण ती थोडीशी गिळगीत लागते त्यामुळे गवारची भाजी करण्याआधी आपण तोडून तिला स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये एक चमचा तेल टाकून या भाजीला पाच मिनिटे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे.

त्यावर छोटे छोटे काळे डाग आल्यानंतर आपण पूर्वीप्रमाणे जशी आपण भाजी फोडणीला देतो तशी देऊन ही भाजी बनवायची आहे असे केल्यास भाजीची चव देखील वाढते आणि ही भाजी आपल्याला चिकट किंवा गिळगिळत देखील लागत नाही. सहावी टीप अशी आहे की जेव्हा आपण ही भाजी तयार करतो तेव्हा जर त्यामध्ये आपण वरून पाणी टाकले तर ती भाजी पांचट लागते आणि जर त्यामध्ये पाणी टाकले नाही तर ती खालून लागण्याची शक्यता असते त्यामुळे जेव्हा आपण भाजी बनवतो त्या पात्रावर आपल्याला एक ताट ठेवायचे आहे.

आता त्यामध्ये पाणी टाकायचे आहे असे केल्यामुळे भाजीची वाफ तयार होऊन त्या ताटाला लागते आणि त्या ताटाला लागलेले पाणी परत त्या भाजीमध्ये जाते आणि ही भाजी शिजते आणि ती करपत देखील नाही. सातवी टीप अशी आहे की जेव्हा आपण फोडणी देतो तेव्हा आपण लगेचच कढीपत्ता आणि हिंग टाकतो असे केल्यास आपला कढीपत्ता थोडासा जळतो किंवा त्याचे गुणधर्म आपल्याला मिळत नाही त्यामुळे जेव्हा फोडणीला आपण कांदा टोमॅटो देतो त्यानंतर जर कढीपत्ता आणि हिंग टाकले तर त्याचा स्वाद जास्त प्रमाणात आपल्याला मिळतो.

हे वाचा:   गुडघे, कंबर, हात -पाय आणि सांधेदुखी असं होईल गायब की जसे काही कधीच नव्हतं हे दुखणं.! हात-पाय झटपट मोकळे करण्यासाठी नक्की वाचा.!

त्यामुळे कढीपत्ता आणि हिंग नंतर टाकले तर चांगले. त्यानंतरची म्हणजे आठवी टीप अशी आहे की जेव्हा आपण घरामध्ये भरपूर नारळ आणतो आणि ते आपण लवकर वापरू शकत नाही आणि त्यामुळे ते खराब होण्याची शक्यता असते अशावेळी काय करायचे तर शेंडीची बाजू वरती ठेवून कोणत्याही कोपऱ्यामध्ये हे नारळ असेच उभे करून ठेवायचे असे केल्यामुळे शेंडीची बाजू वर असल्यामुळे नारळ लवकर खराब होत नाहीत. नववी टीप म्हणजे जेव्हा आपण बटाटे आणतो.

तेव्हा आपण ते बटाटे जास्त प्रमाणात आणतो आणि त्यामुळे कधी कधी बटाट्यांना कोम येतात किंवा हे बटाटे नरम पडतात, अशावेळी बटाट्याची चव कमी होते तर त्याची चव टिकून राहण्यासाठी आपण हे बटाटे फ्रिजमध्ये देखील ठेवू शकतो पण जेव्हा आपण हे फ्रीजमध्ये ठेवू तेव्हा ते हवाबंद डब्यामध्ये न ठेवता उघडे म्हणजेच कोणत्याही टोपलीमध्ये किंवा छोट्याशा भांड्यामध्ये जरी ठेवले तरी ते जास्त काळासाठी टिकून राहतात. त्यानंतर शेवटची टीप म्हणजे जेव्हा आपण कांदा कापतो तेव्हा तो आपल्या डोळ्यांना झोंबतो आणि त्यातून पाणी येते त्यामुळे आपल्याला कांदा कापून झाल्यानंतर तो पाण्याने धुऊन घ्यायचा आहे.

त्यानंतर तो कापायचा आहे. कापताना देठाकडचा जो पिवळ्या रंगाचा भाग असतो तो देखील कापून घ्यायचा आहे त्यामुळे कांदा सुटसुटीत कापला जातो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.