माणूस हा खूप हौशी प्राणी आहे. अगदी प्राचीन काळापासून तो साज-शृंगार करण्याचा शौकिन आहे. पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत त्याला सगळ नीट नेटके हवे असते. मानवाची ओळख आजकाल डोक्याच्या केसांनी केली जाते. डोक्यावर डौलदार व काळेभोर केस असले तर माणूस सुंदर दिसतो व डोक्यावर केस नसल्यास आपल्या समाजातील बाकीचे लोक तुमच्यावर टीका करतात.
काही लोकांच्या डोक्यावर केस असतात मात्र ते लवकर पातळ असतात किंवा सफेद होतात. जर तुम्ही देखील अश्या समस्यांनी ग्रस्त असाल तर तुम्हाला आता चिंता करण्याची काही गरज नाही आज आम्ही आमच्या या लेखाद्वारे तुमच्यासाठी आयुर्वेदातील असा एक रामबाण उपाय घेऊन आलो आहोत जो करताच तुमचे पातळ केस पुन्हा दाट तसेच सफेद पडलेले केस काळेभोर होतील ते ही नैसर्गिक उपचाराने. चला तर पाहूया हा दैवी उपाय.
केस काळेभोर, दाट व चमकदार असणे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र बाहेरच्या अरबट सरबट खान-पानामुळे अथवा वाढत्या प्रदूषणामुळे तुमचे केस पातळ व सफेद होतात. भारतीय घरातील स्वयंपाक घरात मोहरीचे तेल हे हमखास मिळेल. मोहरीचे तेल आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या मध्ये अनेक जीवनसत्व व खनिजे आहेत. मोहरीच्या तेलात अँटी ऑक्सिडंट घटक मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
त्याचसोबत यामध्ये अँटी मायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लामेट्रीसारखे गुण असतात जे रोगप्रतिरोधक क्षमता वाढवण्यासोबत हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. तसेच त्वचेसाठी ते तितकंच फायदेशीर ठरतं असून, या तेलामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. मोहरीच्या तेलाला येणार वास हा जास्त तीव्र असल्यामुळे अनेक लोकांना सहन होत नाही. त्वचेवर मोहरीच्या तेलाने मसाज केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
सोबतच राईचे तेल हे आपल्या केसांसाठी देखील अत्यंत फायदेशीर ठरते. मोहरीच्या तेला समावेत तुम्हाला आवळ्याची पावडर म्हणजेच आवळा चूर्ण देखील या मिश्रणात टाकायचे आहे. आवळा हा जीवनसत्व इ या घटकाने मुबलक असतो. प्रत्येक बनवल्या जाणार्या केसांच्या उत्पादनात आवळा हा हमखास सापडतोच. सोबतच आवळा तुमच्या केसांना मजबूती देतो व काळाभोर रंग व निखार देखील प्रदान करतो.
केसातील कोंडा देखील आवाळ्याचा प्रभावाने कमी होते. अगदी प्राचीन काळापासूनच आवळा केसांना काळे करण्यासाठी वापरला जातो. हा आवळा आपल्या डोक्याचा नसांमध्ये जावून र’क्तभिसरण प्रतिक्रीया जलद करतो व यामुळे नवीन केस उगण्यास मदत होते. या नंतर आपल्याला आवश्यकता आहे ती नैसर्गिक मेहंदीची होय आपल्याला हा उपाय करण्यासाठी नैसर्गिक मेहंदीची गरज भासणार आहे. मेहंदी लावल्यास तुमचे डोके शांत होते.
शरीरातील सर्व गरमी कमी होवू लागते. हळद या पदार्थाला आयुर्वेदात एक वेगळे स्थान आहे. हळद ही वेदनाशमाक आहे. ही एक रामबाण जडीबुटी आहे. यात अनेक गुण आहेत जे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपल्या केसांसाठी देखील ही हळद फायदेशीर आहे. हळद आपल्या केस गळतीला थांबवते. आपल्या डोक्याच्या त्वचेला निरोगी बनविण्याचे काम ही हळद करते. हळद मंद वाफेवर आपल्याला भाजून घ्यायची आहे.
पाच ते सहा मिनिटाच्या कालावधीत हळद आपला रंग बदलले व काळ्या रंगामध्ये रुपांतरीत होईल. मोहरीचे तेल, आवळ्याचे चूर्ण, मेहंदी व हळद यांना एकत्रित करुन त्यांचे मिश्रण करुन घ्यावे व आपल्या बोटांच्या मदतीने डोक्याला लावा. अगदी केसांच्या मुळांपर्यंत आपल्याला हे मिश्रण लावायचे आहे. पंधरा दिवसातून एकदा हा उपाय केल्यास तुमचे केस नैसर्गिकरित्या काळेभोर व मजबूत होतील. सोबतच केस गळती व कोंडा यांसारख्या समस्या देखील दूर होतील.
म्हणूनच केमिकल असलेले हेयर डाय टाळा व नैसर्गिक उपाय करुन कोणता ही धोका न पत्करता केस काळेभोर व चमकदार बनवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.