इम्यूनिटी वाढवणे झाले सोपे.! कुठलाही आजार तुमच्या शरीरात पाऊल पण ठेवणार नाही.! सर्दी ताप जरी पण झाला तरी दोन दिवसात होत जाईल बरा.!

आरोग्य

आपल्या परिसरात आज काल प्रदूषण फार झपाट्याने वाढत आहे आणि याचा परिणाम आपल्या शरीरावर मोठ्या प्रमाणात पडत आहे. शरीराची रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती फारच कमी होत आहे आणि यामुळेच सर्व सजीवांचे आयुष्य देखील कमी होत आहेत. या सोबतच आता माणसे आपल्या कामात खूप जास्त व्यस्त असतात व त्यांना आपल्या आहराकडे योग्य लक्ष्य देण्यासाठी वेळ नसतो.

यामुळेच संतुलीत घरचा ताजा आहार न घेता आपण जास्त जलद तयार होणारे फास्ट फूड व जंक फूड खाणं जास्त पसंत करतो. या खाद्य पदार्थांचा आपल्या शरीराला काहीच फायदा होत नाही. या उलट आपल्या शरीराला आजारी बनवण्यासाठी आपण स्वतःच्या हातानेचे पैसे देत आहोत. म्हणूनच घरात तयार होणारे ताजे व सर्व घटक असलेले अन्नच खावे. या कारणांमुळे आपल्या शरीराला विविध असे आजार कायम होत असतात.

एक संपला की दुसरा सर्दी संपली की खोकला व खोकला संपला की अंग दुखी असे आजार आता आपल्या व आपल्या प्रियजनांना त्रास देत असतात. सारखे डॉक्टरकडे जाणे आपल्या शरीराला व खिश्याला परवडत नाही आणि त्याच बरोबर सतत गोळ्या औषधे खाणे आपल्या शरीरासाठी अपायकारक ठरू शकते. तुम्ही देखील या सर्व समस्यांनी त्रस्त आहात तर आता काळजी सोडा व सुटकेचा निश्वास घ्या.

हे वाचा:   दही मध्ये ही एक वस्तू टाका, दह्याची ताकद दहापट वाढेल, सर्दी खोकला असेल तर रात्रीत बरा होऊन जाईल.!

आज आम्ही आमच्या या लेखात तुमच्यासाठी असा एक रामबाण उपाय घेऊन आलो आहोत ज्याच्या वापराने तुम्हाला असणार्या शारिरीक समस्या त्वरित दूर होतील. सोबतच आपली रोग प्रतिकारक शक्ती देखील कमालीची वाढते. हा एक आयुर्वेदीक व नैसगिर्क उपाय आहे. सोबतच घरगुती उपाय असल्या कारणाने हा तुम्ही अगदी घरच्या घरीच तयार करु शकता. सामान्य लोकांच्या खिशाला परवडेल असा साधा व सोपा व रामबाण उपाय आहे.

चला आता विलंब न करता पाहूया हा उपाय. आपल्या आस पास अनेक वनस्पती आहेत परंतू यांचे औषधी गुणधर्म आपल्याला माहित नसतात. अशीच एक वनस्पती आहे गुळवेल. गुळवेल एक अत्यंत चमत्कारिक वनस्पती आहे. अनेक विविध आजारांवर ही वनस्पती एक रामबाण उपाय आहे. तापापासून ते आम्ल पित्त पर्यंत अनेक आजार याने बरे केले जातात. याच बहुगुणी गुळवेलीचे खोड आपल्याला या उपायासाठी वापरायचे आहे.

या वेलीचे खोड बारीक करुन एका भांड्यात घ्या. दुसरा घटक जो आपल्याला या उपायासाठी आवश्यक असेल तो म्हणजे आले. आले आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. सर्दी व खोकला, डोकेदुखी व कफावर एक रामबाण उपाय आहे. आल्याचे सेवन शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. आल्याचा एक मोठा तुकडा धुवून व सोलून या उपायासाठी घ्या. आता या भांड्यात आले व सोबत 200 मि.ली. पाणी घाला. तीसरा घटक आहे लवंगीच्या फुलांची पावडर.

हे वाचा:   कितीही कुरळे केस असू द्या या उपायाने मऊ मुलायम केस बनतील.! फक्त दहा रुपयात बनवा केस लांसडक मऊ आणि मुलायम.!

लवंग आपल्या शरीरात उर्जा निर्माण करते. शरिरातील थकवा शीण दूर करण्यासाठी लवंग उपयुक्त आहे. त्याच बरोबर ही लवंग एक नैसर्गीक वेदना शमाक देखील आहे. आपल्या शरीरासाठी लवंग उपयुक्त आहे. सात ते आठ लवंगीची फुले बारीक वाटून घ्या व या मिश्रणात टाका. आता जे पाणी गरम होण्यासाठी गॅस वर ठेवा यात गुळवेलीचे एक पान घाला. चांगली उकळी आल्यावर गॅस बंद करा.

आता हे पाणी चांगले गाळून घ्या आणि गरम गरम या पाण्याचे सेवन करा. रोज रात्री झोपताना व सकाळी उपाशी पोटी हा उपाय करा. या उपयाच्या वापराने शरीराच्या सर्व व्याधी अगदी काही दिवसातच नैसगिर्क रित्या दूर होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.