शरीरातील प्रत्येक अवयव हा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. शरीराचे कार्य सुरळीतपणे इतर पार पाडायचे असेल तर प्रत्येक अवयव हा अत्यंत निरोगी असणं गरजेचं आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, लिव्हर आपल्या शरीरासाठी एका फिल्टर प्रमाणे कार्य करतो. जर लिव्हर उत्तम असेल तर तुमचे शरीर देखील उत्तम राहते. लिव्हर आपल्या शरीरात 400 पेक्षा जास्त अत्यंत महत्त्वाचे कार्य पार पाडत असतो आणि म्हणूनच अशावेळी आपल्या शरीरातील लिव्हर म्हणजेच काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
आपल्याला आपल्या आहारामध्ये असे काही पदार्थ समाविष्ट करणे गरजेचे आहे ज्यामुळे भविष्यात तुमच्या लिव्हर ला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. लिव्हरच्या कार्यामध्ये जर थोडीफार जरी गडबड झाली तर त्याचा थेट परिणाम आपली त्वचा, आपले केस आणि पोटाच्या आरोग्यावर दिसून येतो. या तिन्ही गोष्टींवर परिणाम झाल्यामुळे तुमचे शरीर संस्था पूर्णपणे बिघडून जाते. बहुतेक वेळा लिव्हर चे कार्य योग्य पद्धतीने न पार पडण्याचे दोन कारण मानले जाते.
एक तर आपली चुकीची आहार पद्धती आणि जास्त प्रमाणामध्ये अल्कोहोल मध्ये पण व दा:रू सेवन करणे. या दोन्ही गोष्टींमुळे तुमचे लिव्हरचे कार्य बिघडू शकते. भारतामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू लिव्हर खराब झाल्यामुळे होत असतो आणि लिव्हर खराब होण्यामागे जास्तीत जास्त कारण हे अतिरिक्त प्रमाणामध्ये दा:रू सेवन करणे ही एक महत्त्वाची समस्या मानली जाते.
हल्लीची तरुण पिढी कधी आवड म्हणून दा:रू पिते कालांतराने एक सवय लागून जाते हेच आपल्याला कळत नाही. हल्ली अनेकदा पार्टी सेलिब्रेशन च्या नादामध्ये तरुण पिढीकडून कळत नकळतपणे दा:रू सेवन केले जाते. कालांतराने हीच एक सवय व्यसनाच्या रूपामध्ये प्रत्येकाला लागून जाते आणि एकदा का दा:रूची चटक लागली तर ती सोडणे अनेकांना शक्य होत नाही. अनेक जण वेगवेगळ्या औषधे उपचार करतात परंतु दा:रू काही केल्या सुटत नाही.
दा:रूचे अतिरिक्त प्रमाणात सेवन केल्याने तुमच्या लिव्हरवर अतिरिक्त प्रमाणात ताण निर्माण होतो आणि कालांतराने लिव्हर खराब होते. ज्या व्यक्तीचे लिव्हर खराब होते, ती व्यक्ती जास्त वेळ जिवंत राहू शकत नाही तिचा मृत्यू हा लवकरच ओढावतो. जर तुमच्या बाबतीत असे काही घडू नये म्हणून तुम्हाला तुमच्या लिव्हरची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही दा: रू सेवन करत असाल तर दा:रू मर्यादेपेक्षा जास्त सेवन करू नका, कारण की दारू सेवन करणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
मर्यादित स्वरूपामध्ये अल्कोहोल सेवन करणे हे आपल्या शरीरासाठी योग्य मानले जाते. आपल्या सर्वांना माहितीच असेल की, आपण अनेकदा औषधोपचार सेवन करत असतो त्यामध्ये देखील अल्कोहोलचा वापर केला जातो परंतु त्यामधील प्रमाण हे नॉर्मल असते. अनेकदा अल्कोहोल मध्ये जे काही रासायनिक पदार्थ असतात त्यामुळे तुमच्या शरीरातील पेशी दुभंगतात म्हणजेच ब्रेक होतात. जास्त प्रमाणामध्ये अल्कोहोल सेवन केल्याने लिव्हर पेशी यांच्यावर ताण निर्माण होतो आणि हळूहळू त्या डॅमेज होतात आणि परिणामी तुमच्या लिव्हरची कार्यशक्ती देखील खराब होऊ लागते.
आजच्या लेखामध्ये अतिरिक्त प्रमाणामध्ये दा:रू सेवन केल्याने जर तुमचे लिव्हर खराब झाले असेल तर ते लिव्हर आपल्याला कशाप्रकारे दुरुस्त करायचे आहे आणि त्याचबरोबर लिव्हरवर जर विषारी घटकांचा थर जमा झाला असेल तर हा थर आपल्याला कशा प्रकारे काढायचा आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 30 एम एल ते साठ एम एल दा:रूचे सेवन केल्यानंतर ते लिव्हरला पचवण्यासाठी एक ते दीड तास इतका अवधी लागतो. तसे पाहायला गेले तर हा अवधी प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या देखील ठरू शकतो.
अनेक गोष्टी व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीवर व पचन संस्थेवर देखील अवलंबून असतात आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला लागणारा वेळ देखील वेग वेगळा असू शकतो. जर एखादी व्यक्ती कधी किंवा तरी दा:रूचे सेवन केल्याने आपल्या लिव्हरवर जास्त परिणाम जाणवत नाही परंतु जर एखादी व्यक्ती रोजच्या रोज दारू सेवन करत असेल तर त्याचा गंभीर परिणाम लिव्हरवर होतो. जर आपल्या लिव्हर मध्ये काही बदल होत असतील तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपल्याला त्या कळत नाही परंतु जर वारंवार आपण दा:रू सेवन करत असू तर या सर्वांचा हल्ला लिव्हरवर वारंवार होतो.
सुरुवातीच्या क्षणामध्ये काही लक्षणांच्या द्वारे आपण लिव्हरचे आरोग्य खराब होत आहे हे समजू शकतो. जर एखाद्या व्यक्तीला वारंवार थकवा जाणवत असेल, अंगावर लाल चट्टे निर्माण होत असतील, वजन लवकर वाढत असेल, किंवा वजन लवकर कमी होत असेल या सर्वांमुळे देखील आपले लिव्हर खराब झालेले आहे असे समजून शकतो तसेच वारंवार पोट दुखी उद्भवणे, बद्धकोष्ठता, पोट वेळेवर साफ न होणे अशा अनेक समस्या देखील लिव्हर खराब झाले आहे याचे आपल्याला संकेत देत असते.
लिव्हर खराब झाल्यावर मानवी शरीरावर पिवळसरपणा थर निर्माण होतो आणि त्याला काविळ देखील होते त्याचबरोबर लघवीचा रंग बदलतो, वारंवार थकवा जाणवू लागतो आणि मानवाच्या विचार करण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते तसेच मानवी शरीरामध्ये असणारे अनेक हार्मोन्स बदल जाणव लागतात आणि मानवी शरीराची गरज पूर्णपणे बिघडून जाते तसेच तुमच्या लैं’गि’क क्षमतेवर देखील त्याचा विपरीत परिणाम जाणवतो टेस्टस्टेटोरांमध्ये गडबड होते.
आपण काही घरगुती व हरबल उपायांच्या मदतीने खराब झालेले लिव्हर सहजरीत्या व्यवस्थित करू शकतो त्यासाठी एक महत्त्वपूर्ण वनस्पती ठरते त्याला आपण मिल्क थिसर असे म्हणतो. या मिल्क थिसरच्या मदतीने डॅमेज झालेले लिव्हर पूर्ववतपणे व्यवस्थित रित्या करता येते. ही एक पाच ते दहा फूट उंच असणारी एक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीच्या बियांमध्ये सीलेरमेरीननावाचे घटक उपलब्ध असते. या घटकांमुळे लिव्हर मध्ये कोणत्याही प्रकारची कमजोरी आली असेल तर ती कमजोरी दूर करण्याची शक्ती या वनस्पतीमध्ये असते.
या वनस्पतीद्वारे बनवलेल्या गोळ्या औषधे आपल्याला मेडिकल स्टोर मध्ये सहजरित्या पाहायला मिळतात. या औषधी वनस्पतींमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्याने तुमच्या लिव्हरमधील विषारी घटक दूर करण्याचे क्षमता यामध्ये असते. जर तुमचे लिव्हर बिघडलेले असेल तर अशावेळी हळद अत्यंत लाभदायक ठरते. हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल व अँटी ऑक्सिडंट गुणधर्म मोठ्या प्रमाणात असल्याने तुमच्या शरीरामधील सर्व विषारी घटक हळदीमुळे दूर होतात, यासाठी आपल्याला एक ग्लासभर कोमट पाण्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करून हे हळदीचे पाणी नेहमी सेवन करायचे आहे.
त्याचबरोबर हळदी द्वारे बनवलेल्या गोळ्या देखील मेडिकल स्टोर मध्ये सहजरित्या उपलब्ध होतात व अनेक आयुर्वेदिक दुकानांमध्ये हळदीद्वारे बनवल्या गेलेला काढा अनेकदा उपलब्ध होत असतो. हा काढा देखील तुम्ही सेवन करून तुमच्या लिव्हरचे आरोग्य निरोगी ठेवू शकता. आपले लिव्हर नैसर्गिक रित्या मजबूत व निरोगी राखण्यासाठी मनुकेचे, पाणीदेखील अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते यासाठी आपल्याला कोमट पाणी करायचे आहे आणि त्यामध्ये सात-आठ मनुके भिजवायला ठेवायचे आहे व हे पाणी रात्रभर तसेच ठेवून सकाळी उपाशीपोटी सेवन करायचे आहे.
मनुक्याचे भिजवलेले पाणी आपण दिवसभर अर्धा तासाने सेवन केल्याने तुमच्या शरीराला खूप सारे फायदे प्राप्त होतील त्याचबरोबर आपण सातत्याने तीन ते चार दिवस मनुक्याचे पाणी सेवन केल्याने तुमचे लिव्हर योग्य पद्धतीने कार्य करू लागेल व उरलेले जे मनुके आहेत तुम्ही संध्याकाळी नाश्ता करताना सहजरीत्या खाऊ शकता, अशाप्रकारे घरच्या घरी काही उपाय केल्याने तुमच्या शरीराला आराम तर मिळेल पण त्याचबरोबर तुमचे खराब झालेले लिव्हर देखील सुधारेल आणि म्हणूनच जास्त प्रमाणात दारू सेवन करणे अत्यंत चुकीचे आहे.
जर तुम्ही सुद्धा मर्यादा पेक्षा जास्त दा:रू सेवन करत असाल तर आत्ताच सावधान व्हा आणि दा: रू सेवन न करण्याचा विचार करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.