मानव हा भगवंताने बनवलेला सर्वात सुंदर व हुशार प्राणी आहे. द्वापार युगात देव दानव सुर असुर अथवा ऋषिमुनी कोणीच सुंदरतेला भुलले नाहीत असे नाही. आज ही माणसे सुंदर दिसण्यासाठी आपल्या चेहर्यावर विविध प्रक्रिया करतात. सुंदर दिसणे हे प्रत्येकाचे स्वप्न आहे. छान व गोरा पान चेहरा असल्यास आपल्याला समाजात वेगळा दर्जा मिळतो. अश्या माणसांकडे अनेक लोक आकर्षक होतात आणि या व्यक्ती त्यांच्या आयुष्यात याव्या अश्या मनोकामना देखील करतात.
काही लोकांच्या चेहर्यावर अनेक डाग असतात. अती तेलकट अथवा तिखट खाल्याने आपल्या चेहर्यावर डाग व पूरळे पिंपल्स उठू लागतात. यामुळे तुमच्या चेहर्याची पट्टी जरी किती ही छान असली तरी ही तुमचा चमकदार दिसत नाही. चेहर्यावर तेल व काळपट डाग नेहमीच झळकत राहतात. केमिकल युक्त क्रीम व फेसवॉश वापरुन थोड्या काळासाठी चेहरा उजळतो मात्र हे केमिकल वापरुन तुम्ही तुमच्या चेहर्याला धोक्यात टाकत आहात.
याच्या नियमित वापराने चेहरा खराब होवू शकतो. आता तुम्ही विचार करत असाल की मग नक्की करायचे काय .. मात्र आता निश्चिंत व्हा कारण आज आम्ही आमच्या लेखाद्वारे तुमच्यासाठी असा एक रामबाण उपाय आणला आहे ज्याच्या वापराने तुमचा चेहरा काही दिवसातच उजळू लागेल व हा उपाय आयुर्वेदातील एक नैसर्गिक उपाय आहे. याचे तुमच्या चेहर्यावर फक्त चांगले फायदे दिसतील.
तुमच्या चेहर्याला याच्या वापराने कोणत्या ही प्रकारची हानि होणार नाही. चला तर जाणून घेऊया हा उपाय. बटाटा ही फळ भाजी सगळ्यांना माहितच असेल.
बटाट्यात शीतल आणि मधुर रस गुणधर्म असतात. त्यामुळं तो मलावष्टंभक आहे. जर अशक्तपणा येत असेल तर अशात तुम्ही बटाट्याचं सेवन करू शकता.
तसेच स्कार्व्ही या विकाराच्या रुग्णांकरिता बटाटा गुणकारी आहे. सालीसकट बटाटा खाल्ला तर त्यातील सर्व गुणधर्म तुम्हाला मिळतात व शरीर बळकट होते.
चटका बसल्यास किंवा भाजलं असेल तर त्या ठिकाणी फोड येतो. अशा फोडांवर बटाटा उगाळून लावला जातो आणि हा उपचार खूप जुना आहे. बा’ळंत स्त्रीला दूध कमी असेल तर दूध वाढवण्यासाठी बटाटा उपयुक्त ठरतो. मित्रांनो जर तोंड आलं असेल तर बटाटा उकडून खावा. या गुणकारी बटाट्याला किसून बारीक करुन त्याचा रस काढून घ्या. या नंतर दुधाची साय घ्या. दुधा मध्ये अनेक शरीराला उपयुक्त असे घटक असतात.
या मध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने उच्च दर्जाची असल्यामुळे शरीराची वाढ, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर दूधात कॅल्शियम व डी जीवनसत्त्व असते. दुधामधील कॅल्शियमचा आपल्या हाडांना खूप फायदा होतो. दुधामध्ये लॅक्टोज नावाची कर्बोदके व साखर असते. हे आपल्या शरीराच्या त्वचेसाठी अत्यंत आवश्यक असते. रोज एक ग्लास दूध प्यायल्यास आपली त्वचा चमकदार व गोरी होवू लागते.
बटाट्याचा रस व दुधाची साय एकत्रित करुन कापसाच्या मदतीने चेहर्यावर आठवड्यातून चार दिवस लावल्यास चेहर्यावर नैसर्गिक निखार येतो. तसेच तांदळाचे पिठ आणि अंड्या यांना बटाट्याच्या रसात मिक्स करुन चेहर्यावर वीस मिनिटे फेस पैक सारख लावून ठेवून मग कोमट पाण्याने धुवून टाकायचे आहेत. अंडे व तांदळाचे पीठ चेहर्यावरचे डाग व पूरळे समूळ नष्ट करण्यास मदत करतात आणि म्हणूनच हा उपाय नक्कीच करुन पहा.
या पुढिल दोन नैसर्गिक उपयांना करुन तुम्ही तुमची त्वचा सुंदर व चमकदार बनवू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.