या गोष्टी घडू लागल्या तर समजून जा हार्ट अटॅक येणार आहे.! वेळीच सावध होण्यासाठी खूप महत्वाची माहिती.!

आरोग्य

मित्रांनो आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आजकाल खूप कमी वयामध्ये देखील हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा स्थितीमध्ये आपण काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. हार्ट अटॅक आल्यावर काय करावे तसेच हार्ट अटॅक येण्यापूर्वी आपल्याला शरीर काय सूचना देत असतात या सर्व गोष्टी आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाच्या मानल्या जातात.

परंतु या धकाधकीच्या जीवनामध्ये सध्या आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो मित्रांनो या गोष्टी तुम्हाला माहीत असणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी हार्ट अटॅक बद्दल खूपच महत्त्वाची अशी माहिती घेऊन आलो आहोत ही माहिती तुम्ही नक्की वाचा तसेच तुमच्या प्रियजनांना ही माहिती नक्की शेअर करा. मित्रांनो, हार्ट अटॅक येण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला काही लक्षणे दाखवून देत असते.

ती लक्षणे कोणतीही याची माहिती आपल्याला नसते. म्हणून आज आपण या लेखातून या लक्षणांनी विषयी माहिती जाणून घेणार आहोत. आजकालच्या या ताण-तणावाच्या जीवनामध्ये कोणतेही कारण असताना आपल्याला हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. पहिले लक्षण म्हणजे छातीत दुखणे. सायकल चालवल्या मुळे, जिना चढल्यामुळे किंवा कोणतेही काम करत असताना.

अचानक जर छातीत दुखायला सुरुवात झाली तर समजुन जा की, ही आर्ट अटॅक येण्याची लक्षणे आहेत. दुसरे लक्षण म्हणजे उलटी येणे किंवा मळमळ होणे. बऱ्याच वेळा आपल्याला मळमळ होत असतात किंवा उलटी येत असते या वेळी आपण पित्ताचा त्रास किंवा ऍसिडिटी आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो. परंतु हे लक्षण हृदयाकडून देखील येण्याची शक्यता असते. त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका.

हे वाचा:   कडीपत्ताचे झाड भरभर वाढत जाईल.! मुळाशी टाका फक्त ही एक गोष्ट.! भरभर वाढेल कडीपत्ताचे झाड.!

तिसरा लक्षण म्हणजे चक्कर येणे. काही कारण नसताना अचानक जर आपल्याला चक्कर येत असेल तर, हे सुद्धा हार्ट अटॅक येण्याचे लक्षण आहे. हार्ट अटॅक येण्याच्या वेळी आपल्या शरीराला रक्त पुरवठा होण्याचा बंद होत असतो. त्यामुळे मेंदूला रक्त पुरवठा झाल्यामुळे आपल्याला चक्कर येण्याची शक्यता असते. म्हणून ह्याच्याकडे देखील दुर्लक्ष करू नका. चौथ्या लक्षण म्हणजे छाती जड होणे किंवा छातीवर दडपण आल्यासारखे होणे.

असे होणे देखील हार्ट अटॅक येण्याचे लक्षण मानले जाते. पाचवे लक्षण म्हणजे दम लागणे. जर आपल्याला श्वास स त्रास होत असेल. श्वास घेण्यामध्ये त्रास होत असेल तर, समजून जा की हे देखील हार्ट येण्याचे लक्षण आहे. पुढचे लक्षण म्हणजे खूप घाम येणे. काहीही श्रमाचे काम न करता जर, आपल्याला घाम येत असेल तर, हे देखील हार्ट अटॅक चे लक्षण आहे. कोरडा खोकला येणे.

हे वाचा:   अगदी मुळापासून केस काळे करायचे असेल तर हा उपाय करायला हवा.! हे तेल बनवून ठेवा वेळ मिळेल तेव्हा लावा.!

अचानक पणे जर कोरडा खोकला येत असेल तर हा देखील येण्याचे लक्षण मानले जाते. अस्वस्थता होणे, होणे चेहरा पडल्यासारखी होणे हे देखील हार्ट अटॅक चे लक्षण असू शकते. डोके जड होणे, डोक्यात खूप कळ येणे हे देखील हार्ट अटॅक चे लक्षण असू शकते. अशाप्रकारे ही काही लक्षणे आहेत. ज्यामुळे आपण हार्ट अटॅक येणार असेल तर, तो जाणून घेऊ शकतो व त्याच्यावर योग्य वेळेत उपचार करू शकतो.

त्यामुळे अशी काही लक्षणे आपल्यात आढळल्यास आपण लगेच दवाखान्यात जावे. अनेक लोक एवढी सारी लक्षणे दिसूनही दवाखान्यात जाणार नाही, परंतु सर्वांना हात जोडून विनंती आहे हार्ट अटॅक हा खूपच भयंकर असा आजार आहे. यासोबत हलगर्जीपणा करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे इत्यादी प्रकारचे कोणतेही लक्षणे तुमच्या शरीरात दिसून आल्यास त्वरित दवाखाना गाठावा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.