आज कालच्या होणार्या पार्ट्या व जल्लोष हा म’ध्यपान केल्याशिवाय संपन्न होत नाही हे आपणास ठावूकच असेल. परंतू जे म’ध्यपान घेत नाहीत ते देखील या पार्टीचा भाग असतातच आता त्यांना प्यायला काय.? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो मात्र आता बाजारात असे काही पेय मिळायला लागले आहेत जे अ’ल्काहोलिक नसतात पण याचे सेवन तुम्हाला वेगळीच मजा देते.
होय यालाच आपण सामान्य भाषेत एनर्जी ड्रिंक असे देखील म्हणतो. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणी ही याचे सेवन करु शकते. तुमचे जे मित्र म’ध्यपान करत नाहीत त्यांच्यासाठी एनर्जी ड्रिंक हा एक उत्तम विकल्प ठरू शकतो. यात असणारे घटक तुम्हाला वेगळीच मजा देतात व तुमचा मेंदू तरोताजा होतो. मित्रांनो अनेक लोक असे मानतात की हे एनर्जी ड्रिंक आपल्या मानवी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तर काहींचे असे मत आहे की एनर्जी ड्रिंक प्यायल्याने आपल्या शरीराला हानि पोहचू शकते.
परंतू यातील सत्य विधान कोणते असा प्रश्न अनेकांच्या मनात पडत असेल. याच प्रश्नाचे उत्तर आज आम्ही आमच्या या लेखाद्वारे तुम्हाला देणार आहोत. एनर्जी ड्रिंक बद्दल तुमच्या मनात असणार्या सर्व शंका-कुशंकांचे निवारण आता आम्ही अगदी काही शब्दातच करणार आहोत. ही माहिती तुमच्या व तुमच्या परिवारासाठी अत्यंत महत्वाची ठरू शकते त्यामुळे सदर लेख अगदी शेवट पर्यंत वाचा. सर्व प्रथम जाणून घेवूया या ड्रिंकला एनर्जी ड्रिंकच का म्हटले जाते.?
मित्रांनो हे ड्रिंक तुम्ही रोज पीता त्या फळांच्या रसासारखे नसते. यामध्ये देखील काही प्रमाणात फळांचे मिश्रण असते परंतू सोबतच काही कृत्रिम घटकांचा समावेश देखील या मध्ये असतो. हे एनर्जी ड्रिंक कॅफेन, टावरेन व कॅल्शियम कार्बोनेट टाकून तयार केले जातात. हे घटक तुमच्या मेंदूला जागृक करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. कॅफेन कॉफी व चहामध्ये असते म्हणूनच चहा अथवा कॉफी प्ययल्यास तुमची सुस्ती उडून जाते.
तुम्हाला झोप येत नाही. सोबतच असणारा टावरेन आपल्या शरीरात ऊर्जा उत्पन्न करण्याचे काम करतो. खूप थकवा आला असल्यास अथवा कोणतेही मोठे काम करण्यास तुम्हाला वीट वाटत असेल तेव्हा या ड्रिंकचे सेवन केल्यास तुम्ही मोठ्या उर्जेने व आत्मविश्वासाने हे काम पूर्ण करु शकता. एनर्जी ड्रिंक हे म’ध्य नाही परंतू याच्या सेवनाने काही तासांसाठी तुमच्या शरीरात मोठ्या प्रमाणात उर्जेची उत्पत्ती होईल.
होय एनर्जी ड्रिंकच्या सेवनाने तुमच्या हृदयाचे ठोके वाढू लागतात. शरीरात रक्तभिसरण प्रक्रिया जलद होवू लागते. मात्र ही अशी एनर्जी तीन ते चार तासांसाठीच मर्यादित असते. जे लोक चालक आहेत रात्री ज्यांना गाडी चालवायची असते अश्या लोकांसाठी हे एनर्जी ड्रिंक पिणे खूप फायदेशीर आहे. याच्या सेवनाने झोप येत नाही व तुमचा मेंदू देखील फ्रेश होतो. तुम्ही तुमच्या कामावर चांगले लक्ष्य केंद्रीत करु शकता.
जसे हे एनर्जी ड्रिंक आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे त्याच बरोबर याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. होय जास्त प्रमाणात या ड्रिंकचे सेवन आपल्या जीवावर बेतू शकते. जसे आम्ही म्हणालो एनर्जी ड्रिंकने तुमच्या शरीराच्या हृदयाचे ठोके वाढतात त्यामुळे जर जास्त प्रमाणात तुम्ही हे पेय प्यायलात तर हृदयाचे ठोके जलद गतीने वाढतात व तुमचा हृदय विकाराच्या झटक्याने तुमचा मृ’त्य देखील होवू शकतो.
सोबतच रात्रीच्या समयी याचे सेवन आपल्या अनीद्रेचे कारण बनू शकते. कोणती ही गोष्ट प्रमाणाच्या बाहेर केल्यास त्याचा अपायच होतो म्हणूनच एनर्जी ड्रिंक घ्यावे परंतू प्रमाणाच्या बाहेर घेण्याची कधीच चूक करु नये. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.