आज कालच्या युगात एक वेळ डोक्यावर केस नसले तरी हरकत नाही परंतू दाढी व मिश्या मात्र आकर्षक असल्या पाहिजेत. आकर्षक दाढी व मिश्या हे एक पुरुषत्वाची निशाणी व खूण मानली जाते. अनेक लोकांना नैसर्गिक घनदाट दाढी व मिश्या असतात मात्र अनेकांच्या दाढी व मिश्या फारच विरळ पातळ असतात. काही पुरुषांच्या चेहर्यावर तर अजिबात केस नसतात.
फक्कड दाढी व मिश्या असाव्यात असे प्रत्येक पुरुषाला वाटते परंतू अनेक कारणांनी अथवा अनुवंशिकतेच्या आभावामुळे हे स्वप्न स्वप्नच बनून राहते. चेहर्यावर चांगली दाढी व मिशी ठेवणे आता एक शैली फॅशन बनली आहे. परंतू जे लोक या दाढी व मिशीपासून वंचित आहेत ते मात्र असे काही करु शकत नाहीत. अनेक बाजारातील खात्री देणारी उत्पादने देखील फक्त हमी देवू शकतात याचा काडी मात्र देखील फायदा होत नाही.
या उलट याचे आपल्या त्वचेवर दुष्परिणाम मात्र दिसू शकतात. हे पदार्थ कृत्रिम घटकांपासून तयार केले गेलेले असतात त्यामुळे आपल्या सेंसिटीव त्वचेवर याचा अनेक वेळा अपायच झालेले दिसून येतो. मात्र आता चिंता सोडा व निर्धास्त रहा. आज आम्ही आमच्या या लेखात तुमच्या दाढी व मिशीच्या केसांना घनदाट बनवेल असा एक आयुर्वेदीक रामबाण उपाय घेवून आलो आहोत.
होय आता तुम्ही देखील आकर्षक दाढी व मिशी आपल्या पाहुण्या राउळ्यांमध्ये मिरवू शकता. सोबतच हा उपाय अत्यंत नैसर्गिक आहे याचा तुमच्या शरीरावर काही वाईट परिणाम होत नाही. स्वयंपाक घरातील काही घटक वापरुन तुम्ही हा चमत्कारिक उपाय तयार करु शकता. हा एक घरगुती उपाय आहे त्यामुळे हा कमी खर्चिक देखील आहे. मित्रांनो आयुर्वेदात देखील या उपायाबद्दल आपल्या महान वैद्यांनी नमूद करुन ठेवले आहे.
चला आता क्षणाचा ही विलंब न करता पाहूया हा उपाय. हा उपाय तयार करण्यासाठी आपल्याला दोन पदार्थांची आवश्यकता आहे. त्यातील पहिला पदार्थ म्हणजे लिंबू. हे भारतीयांच्या अन्नात रोजच्या वापरात असलेले एक आंबट चवीचे फळ आहे. हे फळ कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळ्या रंगाचे होते. कागदी लिंबाचे अनेक उपयोग आहेत. लिंबू हे फळ लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
पाण्याबरोबर लिंबाचे सेवन केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते. पित्त झाल्यास लिंबाचे सेवन करा. मरगळलेल्या केसांना लिंबाचा रस चमक आणि तजेलदार बनवतात. लिंबामध्ये जीवनसत्व क मोठ्या प्रमाणात असते जे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. म्हणूनच या उपायासाठी एका लिंबाचा रस घ्या. दालचिनीला कलमी देखील म्हटले जाते. दालचिनी हा एक अत्यंत स्वादिष्ट मसाला आहे.
हा आपल्या औषधी गुणधर्मांसाठी देखील हजारो वर्षांपासून प्रसिद्ध आहे. दालचिनी हा वैज्ञानिक दृष्ट्या आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. दालचिनी झाडांच्या आतील सालातून बनविला जातो. जेव्हा ते कोरडे वाळते तेव्हा त्याच्या पट्या बनवतात ज्या रोलमध्ये गुंडाळल्या जातात व ज्याला दालचिनी स्टिक्स म्हणतात. आता एका लिंबाचा रस काढा व एका पात्रात घ्या. लिंबाच्या रसातून त्यातील बिया वेगळ्या करा.
आता दालचिनीची बारीक वाटून पेस्ट तयार करुन घ्या. आता हे दोन्ही घटक एकत्र करा व याचे छान मिश्रण तयार करुन घ्या. रोज रात्री हे आपल्या चेहर्यावर दाढी व केस येणार्या भागांना लावा. आठवड्यातून तीन वेळा हा उपाय नियमित करा. याच्या प्रभावाने तुम्हाला देखील आकर्षक व घनदाट दाढी व मिश्या येतील. आमचा हा नैसर्गिक व सर्वोत्तम रामबाण उपाय नक्की करुन पहा.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.