सिताफळ आवडीने खाणाऱ्यांनी एकदा नक्की बघा.! पावसाळ्यात सिताफळ खाणे चांगले असते का.? आरोग्यासाठी सिताफळ नेमके कसे.?

आरोग्य

फळे खाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते हे आपण अगदी लहानपणा पासूनच शिकत आलो आहोत. फळांपासून आपल्याला अनेक प्रकारची जीवनसत्त्वे तसेच मिनरल्स मिळतात. थकलेल्या शरीराला देखील फळे ऊर्जा प्रदान करतात. फळे खाणे एक चांगली सवय आहे. डॉक्टर देखील आपल्याला फळे खाण्याचा सल्ला देतात. आजच अश्याच एका फळाची चर्चा आपण या लेखात करणार आहोत.

सीताफळ या फळाला तुम्ही ओळखतच असाल. सीताफळ भारतात त्याच बरोबर श्रीलंका, भूटान या देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मिळते. सीताफळाचे वृक्ष मोठ्या आकाराचे व जमीनी पेक्षा थोड्याच उंचीवर असते. याची फळे चवीला गोड व रुचकर असतात. तुम्हाला देखील सीताफळ आवडतच असेल. सीताफळ आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असते. सीताफळ शरीराला थंडावा प्रदान करते.

सीताफळामध्ये अनेक विविध मानवी शरीर उपयुक्त मिनरल्स आणि विटामीन्स असतात. सीताफळ आपल्या शरीराची रोगांपासून संरक्षण करणारी रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढवते. मार्च ते जून या कालावधीत सीताफळाचे झाड फळांनी बहरून येते. परंतू ज्या गोष्टी फायदेशीर असतात तसेच त्या हानिकारक देखील असतात. होय सीताफळाच्या प्रभावाने देखील आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

सकाळी उठल्यावर सर्व प्रथम काही न खाता सीताफळाचे सेवन कधीच करु नये. उपाशी पोटी सीताफळाचे सेवन केल्यास पोटात वेग वेगळ्या रीअॅक्शन होतात व पोटदुखी, अपचन अश्या काही बाधा निर्माण होतात. म्हणूनच कधीच सकाळी-सकाळी उपाशी पोटी या सीताफळाचे सेवन करु नये. मित्रांनो या सोबतच जेवल्यानंतर देखील याचे सेवन हानिकारक मानले जाते.

हे वाचा:   आता केस डाय करणे द्यावे लागेल सोडून, फक्त दहा दिवसात डोक्यावर एकही पांढरा केस उरणार नाही.!

जेवण झाल्यावर लगेच तुम्हाला फळे खाण्याची सवय असेल तर ही सवय फार चांगली आहे. पण या वेळी तुम्ही मुख्यतः केळी नाहीतर सफरचंदाची फळे ग्रहण करा. सीताफळ खाणे बंद करा याच्या परिणामाने शरीरातील अन्न पचण्यात बाधा निर्माण होण्याची शक्यता असते. मित्रांनो सीताफळ खाल्यावर लगेच पाणी कधी ही पिऊ नये. ही सवय देखील तुम्हाला भारी पडू शकते.

सीताफळ खावून लगेच पाणी प्यायल्यास तुम्हाला सर्दी तसेच खोकल्याच्या समस्यांना सामोरे जावे लागेल. सीताफळ हे स्वभावाला अत्यंत शीतल असते हे खाल्यावर लगेच पाणी ग्रहण केल्यास शरीरात थंडावा वाढतो व सर्दी-कफ होतो. जास्त पिकलेले बुरशी आलेले सीताफळ देखील खाणे टाळावे. या फळामध्ये असणारे सर्व घटक व जीवनसत्व जास्त होवून खराब झालेली असतात.

त्यामुळे यांच्या सेवनाने तुम्हाला उलटी होणे तसेच मळमळणे अश्या व्याधी होवू शकतात. म्हणूनच शक्यतो सीताफळ पिकले की त्वरित खावून टाका. आता अनेक मोठ्या कंपन्या सीताफळाचा आइसक्रीम देखील बनवत आहेत मात्र शक्यतो हा आइसक्रीम खाणे टाळा याने देखील तुम्हाला सर्दी होवू शकते. सीताफळ एक चमत्कारिक फळ आहे. आम्ही जसे सांगितले याचे आपल्या शरीराला अनेक फायदे देखील आहेत.

हे वाचा:   मूळव्याध चा शेवटचा उपाय करून टाका.! डॉक्टरांकडे जाण्या आधी एकदा हा उपाय करून बघा.! १००% फायदा होणार.!

आपण नेहमी सीताफळ खावून झाले की त्यात असणार्या बिया फेकून देतो. मात्र या बिया केस गळती थांबवण्यासाठी व नवीन केस उगवण्यासाठी एक रामबाण उपाय आहे हे खूप कमी लोकांना माहित आहे. या सीताफळाच्या बिया फोडून त्यात असणारा गर एकत्र करा या गराला पाण्यात भिजवून ठेवा व रोज रात्री झोपताना या पाण्यात असणार्या गराला आपल्या केसांच्या मूळांमध्ये लावा.

सकाळी उठून कोमट पाण्याने केस धुवून टाका. असे नियमित चार ते पाच दिवस केल्यास तुम्हाला असणारी केसांची कोणती ही समस्या अगदी चुटकी सरशी दूर होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.