पिठाच्या उंड्या मध्ये हे टाका.! हातापायांना येणाऱ्या मुंग्या, सतत चक्कर येणे, सतत तोंड येणे सर्व काही होईल कायमचे बंद.!

आरोग्य

आपले मानवी शरीर एक यंत्र आहे. आपण दैनंदिनी जे काम करतो त्यामुळे आपल्या शरीरातील बरीचशी ऊर्जा खर्चित होते. आपल्या शरीराला काम करण्यासाठी रोज भरपूर प्रमाणात गरज असते. ही ऊर्जा आपल्याला आपण रोज जो ग्रहण करतो त्या आहारातून मिळते. परंतू आता आपल्याला त्वरित मिळणार्या चटकदार तिखट व तेलकट फास्ट फूडची सवड लागली आहे.

याने आपले पोट देखील भरते व खूप प्रमाणात वेळ देखील वाचतो. मात्र तुम्हाला ठाऊक असेलच नियमित रित्या या जंक फूडचे सेवन केल्यास आपल्या शरीराला अनेक प्रकारचे अपाय होवू शकतात आणि सगळ्यात मुख्य म्हणजे या खाद्य पदार्थां मधून आपल्याला कोणताच शरीर उपयुक्त घटक मिळत नाही. म्हणूनच हे अन्न जास्त प्रमाणात खाणे टाळावे.

आपल्याला योग्य जीवनसत्व व घटक तसेच मिनरल्स न मिळाल्यामुले शरीरात अनेक व्याधी निर्माण होवू लागतात. शरीर अशक्त होणे, शरीरात मुंग्या येणे, जरासे कामे केले की थकवा येणे चक्कर येणे सोबतच मणक्यांचा त्रास या सर्व असामान्य बाधा निर्माण होतात. मग आपल्या मागे दवाखाना लागतो डॉक्टर गोळ्या औषधं लिहून देतात आपण ती खातो व हळुहळू आपल्या शरीराला या डोसची सवय लागते जी भविष्यात आपल्या शरीराला धोकादायक ठरू शकते.

हे वाचा:   आवडीने तूप खाणारे.! तुपाचे शरीरात काय होते माहिती आहे का.? तूप शरीरात जाऊन नेमके काय करते.? तुपाचे पचन क्रिया समजून घ्या.!

या कृत्रिम गोळ्या व औषधे आपल्या शरीरावर दुष्परिणाम करतात. म्हणूनच आपल्या शरीराला एका निर्धोक उपचाराची आवश्यकता आहे. आज आमच्या या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला असा एक रामबाण उपाय सांगणार आहोत ज्याच्या प्रभावाने तुमच्या शरीरात उर्जेचा संचार होईल. तुमच्या शरीरातील सगळा थकवा शीण निघून जाईल व तुम्ही देखील एक सामान्य आयुष्य जगू लागाल.

हा उपाय घरगुती आहे व हा तयार करण्यासाठी तुम्हाला स्वयंपाक घरातील काही सामग्रीचा वापर करायचा आहे. हा एक नैसर्गिक साधा व सोपा उपाय आहे मात्र तेवढाच फायदेशीर देखील आहे. या उपाया बाबत आपला महान ग्रंथ आयुर्वेद यात देखील सारांश रूपाने माहिती नमूद केलेली आहे. हा उपाय जास्त खर्चिक नाही. चला आता वेळ न दवडता पाहूया हा चमत्कारिक उपाय.

मित्रांनो आपण रोजच्या आहारात चपात्या खातो. चपाती हा पदार्थ गव्हाच्या पीठापासून तयार केला जातो. चपातीच्या सेवनाने आपले पचनतंत्र मजबूत होते. सोबतच यात मुबलक प्रमाणात फायबर असते जे आपण खाल्लेले अन्न पचन करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र फक्त फायबर शरीराला मिळणे म्हणजेच संतुलित आहार नव्हे. तर आपल्याला चपाती बनवताना या गव्हाच्या पीठात दोन घटकांचा समावेश करायचा आहे.

हे वाचा:   हा उपाय केला तर एकही मच्छर जवळ सुद्धा येणार नाही.!

होय त्यातील पहिला घटक आहे दही. दही हे प्रोबायोटिक आहे. आपल्या मानवी शरीरासाठी दही खाणे खूपच उपयुक्त मानले जाते. दही खाल्याने शरीराची रोगांशी लढण्याची रोग प्रतिकारक शक्ती चांगलीच वाढते. सोबतच दह्यात विटामीन बी 12 मोठ्या प्रमाणात आढळते. दुसरा घटक जो आपल्याला या चपाती बनवताना गव्हाच्या पीठात टाकायचा आहे तो म्हणजे मीठ. मीठ आपल्या शरीराला आयोडिन पुरवते.

आयोडिन आपल्या मेंदूच्या विकासासा करता खूप फायदेशीर मानले जाते. र’क्तातील दोष देखील दूर करण्यासाठी मीठ समर्थ आहे. दही व मीठ हे दोन घटक पीठाच्या प्रमणात टाकायचे आहेत. हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीन वेळा करु शकता. याच्या सेवनाने शरीराला एक संतुलित व संपूर्ण आहार मिळेल व तुमच्या शरीरात असणार्या बाधा वारंवार येणारी चक्कर व अशक्तपणा त्वरित दूर होईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.