फक्त या पदार्थाचा वास घ्या..! हिवाळ्यात सर्दी आणि थंडीमुळे बंद झालेले कान, नाक आता दहा मिनिटात खुले होतील.!

आरोग्य

हिवाळ्याची थंडी आपल्या सगळ्यांनाच आवडते. परिसरात धुके व चोहीकडे गुलाबी थंडी असे वातावरण निर्माण होते. सभोवतालचा परिसर अगदी साजरा दिसू लागतो. मात्र हाच हिवाळा ऋतू येताना आपल्या सोबत विविध प्रकारचे आजार देखील घेवून येतो. हिवाळ्यात आपल्या शरीराची रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणावर कमी होत जाते रक्त प्रवाह देखील सामान्य गतीने चालत नाही.

आपल्या आजू बाजूचे वातवरण अती शीतल होते व याच मुळे आपल्याला सर्दी, खोकला व ताप यांसारखे आजार लवकर होतात. हिवाळ्यातील सर्दी ही सर्वात भयानक सर्दी म्हणून ओळखली जाते. या मागचे कारण म्हणजे हिवाळ्यात झालेली सर्दी महिनाभर तरी तुमचा पाठलाग सोडत नाही. सोबतच तुमचे डोके या सर्दीच्या प्रभावाने जोर जोरात ठणकते. दोन्ही नाक चोंदतात व कान देखील दुखू लागतात.

आता या सर्व समस्या एकत्र होवू लागल्या तर माणसाची अवस्था काय होईल याच विचार देखील तुम्ही करु शकत नाहीत. शरीराला यामुळे अजिबात आराम मिळत नाही, जेवताना देखील मन लागत नाही व क्षण भर जरी झोप लागली तरी नशीबच समजावे. या अश्या समस्यांना आपल्या पैकी अनेक लोक तोंड देत असतात. मेडिकल स्टोर्स मध्ये या व्याधींवर औषधे उपलब्ध आहेत. मात्र ही औषधे म्हणजे या समस्यांचा काही कायमचा बंदोबस्त नाही.

हे वाचा:   ना कुठल्या औषधाची गरज पडेल ना दवाखान्यात जाण्याची.! थायरॉईड घरीच पूर्णपणे बरा करा.! हा सोपा उपाय देईल तुम्हाला शंभर टक्के फायदा.!

या गोळ्या व औषधांनी तुम्हाला काही काळ आराम मिळेल मात्र कायमची मुक्तता कदाफि मिळणार नाही. तुम्ही देखील या अश्या समस्यांनी त्रासलेले असाल व या तक्रारींवर एक कायमचा तोडगा शोधत असाल तर आता सुटकेचा निश्वास घ्या. कारण हा लेख अगदी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही आमच्या या लेखात सर्दीने होणारी कानदुखी, डोकेदुखी व नाकाच्या बंद होण्यावर एक रामबाण उपाय घेवून आलो आहोत.

हा उपाय एक नैसर्गिक उपाय आहे. सोबतच शरीराची रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचा एक नैसर्गिक उपाय देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे उपाय घरगुती उपाय आहेत त्यामुळे तुम्ही घरातील काही सामग्रीचा वापर करुन घरच्या घरी देखील तुम्ही तयार करु शकता. सोबतच आयुर्वेदीक उपाय असल्या कारणाने याचा तुमच्या शरीरावर देखील काही दुष्परिणाम होताना दिसून येत.

हे उपाय साधे सोपे व गुणकारी आहे सामान्य लोकांच्या खिशाला परवडतील असे जे उपाय आहेत. चला आता विलंब न करता पाहूया हे उपाय. दाढी केल्यानंतर आपण यावर तुरटी फिरवतो. पाणी स्वच्छ व निवळ करण्यासाठी देखील तुरटीचा वापर केला जातो. आपल्याला सर्दीमुळे कान, नाक व डोके या दुखणार्या भागांना याच तुरटीच्या मदतीने बरे करायचे आहे.

हे वाचा:   हे पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करा; फक्त १ महिन्यात डोळ्यांवरचा चष्मा कायमचा निघून जाईल.!

सर्व प्रथम तुरटीचा खडा घ्या आता हा एका नाक पुडीवर ठेवा दुसर्या हाताने दुसरी नाकपुडी बंद करा. आता या तुरटीचा जोरात वास घ्या. पुढे दुसर्या नाक पुडी समवेत देखील असेच करा. असे दिवसातून तीन वेळा करा तुम्हाला कानाचे दुखणे, डोके दुखी व नाक चोंदणे या समस्यांपासून नक्कीच आराम मिळू लागेल. शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बदाम, खडी साखर व काळी मिरी यांना मिक्सरच्या मदतीने बारीक वाटून घ्या.

रोज रात्री झोपण्याच्या आधी हे मिश्रण दूधात टाकून प्या. पचन क्रिया सुरळीत होईल व रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढू लागेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.