या लहान मोठ्या टीप्स ज्यांना माहिती आहेत त्याचे खूप पैसे वाचतात.! तुम्ही देखील या टिप्स माहिती करून घ्या जेणेकरून तुमचे पण लाखो रुपये वाचतील.!

आरोग्य

मित्रांनो आपल्या भारतीय महिलांना माता अन्नपूर्णा देवीचे वरदान मिळाले. स्वयंपाक घरात यांचा हात जगात कोणी धरू शकत नाही. स्वयंपाक घरात कोणता ही पदार्थ तयार करताना आपत्ती आल्यास या महिला दोन मिनिटात या समस्येवर तोडगा काढतातच. आज आमच्या या लेखात आम्ही तुम्हाला अश्याच काही स्वयंपाक घरात किंवा आपल्या रोजच्या जीवनशैलीत येणार्‍या साधारण समस्या आपण कश्या सोडवू शकतो हे आपण पाहणार आहोत.

या लेखा द्वारे आपण आपले पैसे तर वाचवू मात्र सोबतच नुकसान देखील जास्त काही होणार नाही. चला आता वेळ नंतर दवडता पाहूया या ट्रिक. मित्रांनो काकडी आपल्या सर्वांना आवडते. उन्हाळ्याच्या दिवसात काकडी खाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. शरीरातील गरमी कमी करून आपल्या शरीराला थंड ठेवायचे काम काकडी करते. काही काकड्या मोठ्या देखील असतात ज्या एकाच वेळी खाल्या जात नाहीत.

तुम्ही अर्धी काकडी खाल्ली की अर्धी तशीच ठेवता. मात्र काही वेळाने ही उरलेली काकडी खराब होते. अश्या वेळा तुम्ही काकडी कापताना मधून कापा. असे केल्याने तुमची काकडी खराब होणार नाही. हो शास्त्रीय शिक्षण देखील आपल्याला याचा पुरावा देते. म्हणूनच काकडीची नासाडी टाळण्यासाठी काकडी नेहमी मधूनच कापत जा. दिवसाची सुरवात आपण चहा घेवूनच करतो. चहा बनवताना आपण पाणी, साखर, व चहा पावडर वापरतो.

हे वाचा:   खाज खरूज कायमचा होईल नष्ट.! चिंचेच्या बिया अशा वापराने आयुष्यभराचा त्वचा विकार नष्ट होईल.! काळे डाग, वांग, दिसणार सुद्धा नाही.!

चहा बनवून झाल्यावर उरते ती फक्त चहाची पावडर. अनेक जण या पावडरला काचर्यात टाकून देतात तर काही झाडांच्या कुंडीत टाकतात. परंतू ही चहाची पावडर आपल्यासाठी खूपच उपयोगी आहे. तुमच्या घरात अनेक छोटी मोठी काचेची भांडी असतीलच व वापर होवून ती जर पिवळी पडू लागली असतील तर अश्या वेळी तुम्ही या वापरलेल्या चहाच्या पावडरला पाण्यात उकळून घ्या. नंतर हे पाणी गाळून घ्या व यात डिश वॉश टाका.

या पाण्याने ही काचेची भांडी धुवून पहा सगळे डाग नाहीसे होतील आणि हे भांडी चमकू लागतील. या सोबतच स्वयंपाक घरात अनेक वेळा कळत न कळत आपल्या कडून दुध ओतू जाते. मात्र हे होणे टाळण्यासाठी एक सोपी युक्ती तुम्ही करु शकता. सर्व प्रथम ज्या पातेल्यात तुम्ही दुध गरम करता त्यात दुध ओतण्याच्या आधी थोड पाणी टाका याने तुमचे दुध जळणार नाही व दुधाच्या पतेल्याच्या वरच्या बाजूला तेल लावून ठेवा.

याने काय होईल जेव्हा ही दुध वरती येवू लागेल तेव्हा आवाज होईल व तुम्ही सतर्क होवून गॅस बंद कराल सोबतच याने जास्त साय देखील तयार होत नाही. आपल्या पैकी अनेकांना नखे वाढवण्याची आवड असते. मात्र अनेक वेळा ही नखे पिवळी पडू लागतात अश्या वेळी. लिंबाच्या सालीला थोडासा बेकिंग सोडा लावा व आता ही लिंबाची साल तुमच्या पिवळ्या पडलेल्या नखावर घासा याने तुमची पिवळी पडलेली नखे परत चमकू लागतील.

हे वाचा:   फक्त महिलांसाठी.! युरेनरी इन्फेक्शन नेमके असते तरी काय माहिती आहे का.? एक लहानशी चूक जीवघेणी ठरू शकते.!

या सोबतच अनेक वेळा तुम्ही ज्या भांड्यात बटाटे उकडायला ठेवता ते कालांतराने काळे पडू लागते. अश्या वेली सर्व प्रथम या भांड्यात पाणी कमी घाला याने तुमचे बटाटे पटकन शिजतील. नंतर यात थोडेसे मीठ घालावे ज्याने बटाट्याच्या साली लगेच निघतील व सोबतच यात एक लिंबाची साल टाका याने तुम्ही बटाटे उकडवत असणारे भांडे कधीच काळे पडणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.