फिट येणे म्हणजे नेमके काय? फिट आल्यावर काय करावे.? प्रत्येकाला हे माहिती असणे आवश्यक आहे.!

आरोग्य

मित्रांनो, फिट्स बद्दल पेशन्ट आणि नातेवाईक यांच्या मनात बऱ्याच शन्का कुशन्का असतात. त्या आम्ही क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहोत. एपिलेपसि, फिट्स, आकडी, मिरगी झटका येणे ही सगळी वेगवेगळी नावं आहेत एकाच त्रासाची. यामध्ये मेंदू मधील विद्युत करंट अनियंत्रित होतो आणि मग पेशंटला त्यामुळे त्रास होऊ लागतो. बेसिकली हा एक मेंदूशी निगडीत आजार आहे.

फिट्स येण्याचे अनेक प्रकार असतात. त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात. बऱ्याच जणांची अशी समजूत असते की फिट येणे म्हणजे फक्त हात पाय टाईट होणे डोळे पांढरे होणे तोंडातून फेस येणे, हा प्रकार होत असल्यास पेशंटला फिक्स आली असे अनेक लोकांचा गैरसमज असतो. फिट्स चे अजून अनेक बरेच प्रकार असतात. ज्यामध्ये थोड्यावेळासाठी बेशुद्ध होणे.

लहान मुलांमध्ये आणखी एक वेगळा प्रकार बघायला मिळतो तो म्हणजे लहान मुलं काही सेकंदासाठी कुठल्याच पद्धतीने रिस्पॉन्स करत नाहीत. त्यांची हालचाल होत नाही. डोळ्यांची पापणी हलत राहते. अनेक लोकांच्या सकाळी उठल्यानंतर हातातून वस्तू पडतात. हेसुद्धा फिट्सचे प्रकार असतात. फिट्स आल्यानंतर काय करावे याबद्दल अनेक लोकांना संभ्रम असतो.

अनेकदा दातखिळी बसली असेल तर बरेच लोक ती जोराने उघडण्याचा प्रयत्न करतात. किंवा तोंडात काही वस्तू टाकतात. काही लोक पेशंट ना कांदा-लसूण किंवा चप्पल यांचा वास देतात परंतु या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. कोणत्या पेशंट ला फिट आली आहे असे दिसल्यास सर्वप्रथम त्याच्या गळ्याभोवती असलेले टाईप कपडे सैल करण्याचा प्रयत्न करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका कुशीवर झोपू द्यावे.

हे वाचा:   हे उपाय केले तर पोटाची एकही समस्या राहणार नाही, कफ साठी यासारखा उपाय नसेल.!

यामध्ये जीभ मागे जाऊन श्वासाला अडथळा तयार करते. तोंडामध्ये कुठल्याही प्रकारची वस्तू घालू नये. सर्वसाधारण कोणतीही फिट तीन ते पाच मिनिटांपेक्षा जास्त चालत नाही. तीन ते पाच मिनिट पेक्षा जास्त फिट्स सुरू राहिल्यास त्वरित डॉक्टरांकडे नेणे गरजेचे असते. काही पेशंट कडे स्प्रे असतात. त्यावेळी असे स्प्रे देण देखील योग्य असते. फिट्स येणाऱ्या पेशंटला कशी काळजी घ्यायची याबद्दल अनेक गैरसमज असतात.

डॉक्टर साधारणपणे तीन वर्ष सलग औषध घेण्याचा सल्ला देतात. काही लोकांना फिट्स हे सहा महिने ते एक वर्षातून येतात. अनेक जण स्वतःहून तीन ते सहा महिन्यात गोळ्या बंद करतात. तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गोळ्या बंद कराव्यात. फिट्स येणाऱ्या पेशंट ची एखादी गोळी जरी मीस झाली तरी त्यांना पुन्हा फिट्स येण्याची शक्यता असते. गोळी चा एकही डोस चुकवू नका.

फिट्स येणाऱ्या पेशंट ने तीन महिने ड्रायव्हिंग करू नये, स्विमिंग करू नये, उंच ठिकाणी जाऊ नये, अल्कोहोल किंवा स्मोकिंग करण टाळावे. अनेकवेळा कुठल्या प्रकारचे फिट आहे हे फक्त नातेवाईकच सांगू शकतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसारच डॉक्टर निदान करतात. अनेकदा फीट्स ची सुरुवात एका हातापासून किंवा एका पायापासून होते. सुरुवात कशी होते ते अत्यंत महत्त्वाचे आहे ट्रीटमेंट साठी.

तुमच्याकडे मोबाईल असल्यास पेशंटला फीट्स आल्यावर ते व्हिडिओ रेकॉर्ड करून डॉक्टरांना दाखवा. यामुळे योग्य उपचार करणे सोपे जाईल. फिट्स हा आजार कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकतो. काही लोकांना लहानपणापासून तर काही लोकांना तरुणपणापासून फिट्स सुरू होतात. तर काही लोकांना म्हातारपणी. याची कारणं वेगवेगळी असतात. फीट्स चा तपासण्या मुख्यत्वे तीन असतात. एक EEG, MRI, CT स्कॅन.

हे वाचा:   म'रेपर्यंत केस काळेच राहतील, पुन्हा पुन्हा डाय करण्याची चिंता आता कायमची मिटली.!

व्यक्तिपरत्वे तपासून डॉक्टर म्हणजेच मेंदू विकार तज्ञ तुम्हाला उपचार सजेस्ट करतात. अनेक लोकांना एक-दोन-तीन अशा गोळ्या सुरू असतात. आपला आजार दुसऱ्या सोबत तुलना करणे अत्यंत चुकीचे आहे. बऱ्याच जणांच्या फिट्स एका गोळीत ठीक होतात तर काही जणांना तीन गोळ्यांमध्ये कंट्रोल होतो. अनेकदा बऱ्याच लोकांमध्ये ट्रिपल एपीलेप्सी सर्जरी करावी लागते.

शस्त्रक्रिया केल्यानंतर हे आजार बरे होतात. त्यासाठी देखील वेगळा काही तपासण्या असतात जसे व्हिडिओ EG इत्यादी. आशा आहे फिट्स बद्दल आम्ही तुमच्या मनातील शंका-कुशंका दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. ९०% फीट्स हे योग्य उपचाराने बरे होण्यासारखे असतात. फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे योग्य उपचार करावा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका. Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *