आज काल क्षणा-क्षणाला वातावरण बदलत असते आणि यामुळे प्रत्येक घरात कोणा ना कोणाला तरी सर्दी किंवा खोकला हा लागलेला असतो. हे आजार इतके गंभीर नसतात मात्र यांमुळे तुम्हाला अनीद्रा व अंगाची कन-कन होते दोखे दुखी होते आणि आपले आरोग्य पुर्ण पणे बिघडते. सर्दी सामान्य आहे समजून आपण तिच्या कडे दुर्लक्ष करतो. काही लोक त्वरित डॉक्टर कडे जातात मात्र डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांमुळे सर्दी सुकते व घशात व छाती मध्ये कफ तयार होतो आणि या समस्या अजून वाढतात.
मात्र आता घाबरण्याचे काही कारण नाही आहे आज आम्ही तुमच्यासाठी असा एक उपाय घेऊन आलो आहे जो करताच तुमची सर्दी व खोकला त्वरित बरा होईल हा उपाय नैसर्गिक असल्या करणाने याचे कोणते ही दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसून येत नाहीत हा एक निर्धोक उपाय आहे. मित्रांनो हिवाळा सुरु झाला आहे. थंडीमुळे आता तापमान खूप कमी होते.
त्रास सुरु होतो तो म्हणजे सर्दी, खोकला व घसा दुखी,अंग दुखीचा उन्हाळ्यात व पावसाळ्यात केलेली मजा ही हिवाळ्यात बाहेर पडते. अश्या वेळी कृत्रिम गोळ्या व औषधे खाणे हे शरीरासाठी घातक ठरू शकते. पुदीन्याची पाने तर सगळ्यांनाच माहीत असतील. पुदीन्याची पाने ही अत्यंत आयुर्वेदीक असतात. यांच्या गुणधर्मामुळे यांना संजीवनी देखील म्हटले जाते.
पुदीन्याच्या पानांचा वापर हा अनेक ठिकाणी केला जातो. कोणत्या ही खोकल्याच्या औषधात पुदीना हा असतोच. पुदीन्याने कोणत्या ही पदार्थाला एक वेगळीच मेहेक व वेगळीच चव येते. चहा मध्ये देखील पुदीना वापरला जातो याने चहाला चव येते परंतू शरीराला देखील ऊर्जा मिळते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्व प्रथम घटक घ्यायचा आहे तो म्हणजे पुदिन्याची पाने जर तुमच्याकडे पुदीन्याची पाने नसतील तर तुम्ही तुळसीची पाने देखील या उपयासाठी वापरु शकता.
या नंतरच घटक जो आपल्याला लागणार आहे तो म्हणजे धने होय धने हे सर्दी व खोकल्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. धन्याच्या सेवन मात्र ने तुमचा खोकला सर्दी कमी होते. म्हणूनच या धन्यांचे देखील सेवन करणे गरजेचे आहे. धना हा घटक सुद्धा आपल्या या उपयात घ्यायचा आहे. या नंतरचा घटक म्हणजे हळद. हळद ही एक आयुर्वेदीक दर्द शामक आहे. दुखण्यावर हळद लावल्यास ती जखम लवकर भरते. जखम झाली असल्यास देखील हळद लावली जाते या मुळे र’क्तस्त्राव थांबतो व जखम भरते.
अश्या या गुणकारी हळदीचा वापर देखील आपण आपल्या या उपयामध्ये करणार आहोत. पुदीना, धने व हळद हे पदार्थ मिळून आपल्याला हा उपाय करायचा आहे. सर्व प्रथम पुदीन्याची अथवा चार-पाच तुळसीची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत. नंतर दुसरा घटक म्हणजे धने बारीक वाफेवर भाजून घ्यावेत धने अश्या प्रकारे भाजल्याने ते नरम होतात आणि खाण्यास चवीष्ट लागतात. सोबतच दोन चमचे हळद सुद्धा आपण घ्यायची आहे.
हळद, पुदीन्याची पाने व धने यांना एकत्र करुन खायचे आहे. तुम्ही हिवाळ्यात याचे सेवन केल्यास तुम्हाला असणारी सर्दी, खोकला व घश्याचे आजार बरे होतील. हे मिश्रण आपण जेवणा पूर्वी अथवा जेवणा नंतर घ्यायचे आहे. लहान मुलांना देखील आपण हे मिश्रण देवू शकतो मात्र यात थोडा मध घाला याने ते आवडीने याचे सेवन करतील. हा उपाय अत्यंत सोपा आहे व या साठी तुम्हाला अनेक पैसे खर्च करण्याची देखील काही गरज नाही आहे. हा उपाय नैसर्गिक आहे व निर्धोक आहे.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.