पिवळे दात मिरवणे आता बंद करा.! आजच दोन मिनिटे एक एवढे काम करा आणि आपले दात बनवा पांढरे शुभ्र.! दोनच मिनटात दात चमकू लागेल.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. आम्ही तुम्हाला नेहमीच वेगवेगळ्या तक्रारींवर अनेक सोपे असेल घरगुती उपाय सुचवत असतोच. तर हीच शृंखला पुढे येत आहे आज आपण पाहणार आहोत, जर तुमचे दात पिवळे असतील तर ते पांढरेशुभ्र मोत्या प्रमाणे कसे चमकवायचे तेही घरगुती उपायाने अगदी कमी किमतील वस्तू वापरून! मित्रांनो मनमोकळेपणाने हसताना पिवळे दातामुळे आडकाठी येते.

चारचौघांमध्ये तुम्हाला शरमल्यासारखे होते. परंतु आता तुम्हाला तसे वाटणार नाही करून बघा हा उपाय. या उपायामुळे दातातील कॅव्हिटी पायरिया यांसारख्या समस्या असतील तरी देखील त्या दूर होतील. पूर्ण इंटरनेट वर असा उपाय तुम्हाला कुठेच शोधून देखील सापडणार नाही. अत्यंत गरम अथवा थंड खाल्याने दातांना सेन्सिटिव्हिटी चा त्रास होतो. असा त्रास आपल्यापैकी बहुतेक जणांना जाणवत असेल.

हा तुमचा त्रास देखील होईल आता ठीक. केवळ चार पाच घटकांपासून बनवलेला या उपायामुळे जो तुम्ही घरामध्ये अगदी पाच मिनिटांमध्ये बनवू शकता. हा अनोखा फायदेशीर उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे जिरे. तुम्ही विचारात पडला असाल यामध्ये जीरा दातांना काय फायदा करेल? जीरा मध्ये असे काही anti-inflammatory गुणधर्म असतात ज्यामुळे तुमच्या दातावरील पिवळा थर हटवून तुमच्या हिरड्या मजबूत बनवण्यासाठी याचा उपयोग होतो.

मजबूत हिरड्या असलेल्या लोकांना सेन्सिटिव्हिटी आणि दात सोडण्याचा त्रास होत नाही. जिरे मध्ये विटामिन ए, सी आणि डी असते. जिरे कुटून पावडर बनवून घ्या. कॅल्शियम आणि मायक्रोन्यूट्रिएंट जीरा मध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे तुमच्या दातांची योग्य निगा तर राखली जाते त्याच सोबत तुमची हाड देखील बळकट होतात.

दोन लिंबू घ्या. लिंबा मध्ये मोठ्या प्रमाणात असणारे विटामिन सी आपल्या दातांवर चा पिवळा थर हटवण्यासाठी खूप फायदेशीर असतो. परंतु हा उपाय करण्याचा योग्य पद्धत माहिती करून घ्या. दररोजच्या आहारात एका लिंबाचे सेवन केल्याने तुमच्या अनेक प्रकारच्या तक्रारी देखील कमी होतील. तुम्हाला आयुष्यात कधीही विटामिन सी आणि कॅल्शियमची कमतरता भासणार नाही.

कॅल्शियम आणि विटामिन सी व डी च्या कमतरतेमुळे अनेक लोकांना दातांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. कोवळ्या उन्हामध्ये बसल्याने देखील रोज तुमच्या शरीराला विटामिन डी मिळते. जी व्यक्ती नियमितपणे शरीराला सूर्यप्रकाश मिळेल अशी बसते त्यांनादेखील दातांच्या समस्या कमी होतात. लक्षात ठेवा जेवताना अन्नपदार्थ नेहमी चावून खा. ज्यामुळे अन्नपदार्थांचे नीट पचन तर होतेच परंतु दात तितकेच जास्त मजबूत होऊन दीर्घ वयापर्यंत दात खराब होणार नाहीत.

हे वाचा:   रोज रोज समोसा खाणारे लोक एकदा हे पण वाचा.! मुलांनी तर नक्की वाचा.! यामुळे शरीरात होत असतात असे जबरदस्त परिणाम.!

तुम्ही जर नीट बघितले असेल तर जनावरांचे दात कधीही खराब होत नाहीत. मंजन किंवा दात ब्रश न करता देखील जनावरांचे दात नेहमी स्वच्छ राहतात. आपल्यापेक्षा तर नक्कीच कमी प्रतीचे जेवण ते करत असतात तरी देखील त्यांचे दात खराब होत नाही. या मागचे कारण म्हणजे, त्यांचे रवंथ करणे कारण यामुळे त्यांचा दातांचा दीर्घ व्यायाम होतो. त्यामुळे जागरूकपणे जेवण करून ते व्यवस्थित चावा.

आपले जुने जाणकार तसेच अनेक आयुर्वेदातील पुस्तके देखील सांगतात एक दात बत्तीस वेळा चावून खावा. या उपायांमध्ये तिसरा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे बेकिंग सोडा. या घटकामुळे दाता वरील पिवळा थर जाऊन दातांची कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास ती ठीक होते. मात्र याचे प्रमाण आणि प्रयोग व्यवस्थित माहिती असले पाहिजे. २० ग्रॅम जिरा पावडर ला एक ग्रॅम बेकिंग सोडा याप्रमाणे प्रमाण असावे.

तुम्ही नेहमी प्रमाणे आठवड्यातील सातही दिवस ब्रश करा परंतु हा उपाय आठवड्यातील फक्त आणि फक्त दोनच दिवस करायचा आहे. दात घासण्यासाठी वापरली जाणारी पेस्ट देखील आयुर्वेदिक हर्बल असावी. लक्षात घ्या, हा उपाय दोन आठवड्यांपेक्षा जास्त केल्याने तुमचे दात बेकिंग सोडा मुळे खराब देखील होऊ शकतात तेव्हा याची काळजी घ्या.

२० ग्रॅम जिरा पावडर, १ ग्रॅम बेकिंग सोडा मिक्स करा. यानंतर तुम्हाला लागणार आहे तो घटक म्हणजे वाळलेल्या पुदिन्याची पानांची पावडर. अशी पुदिन्याची पावडर उपलब्ध नसल्यास बाजारांमध्ये पुदिन्याचे गोळी देखील मिळते, ती वापरली तरी देखील चालेल. अशाप्रकारे एका वाटीमध्ये जिरा पावडर, बेकिंग सोडा, वाळलेल्या पुदिन्याची पावडर अथवा पुदिन्याची एक गोळी आणि पाच ते सहा थेंब लिंबूचा रस घालून मिश्रण एकजीव करून घ्या.

हे वाचा:   रात्री झोपताना पनीर खाऊन झोपणे योग्य की अयोग्य.! यामुळे शरीरात नेमके काय होते.? पनीर खाणारे नक्की वाचा.!

मिश्रण खुप घट्ट वाटत असल्यास थोडे लिंबू वाढवू शकता. साधारण अर्धा लिंबू. मिश्रण व्यवस्थित एकजीव केल्यामुळे या घटकातील पूर्ण पोषक तत्व तुमच्या दातांना मिळतात. बोटाने किंवा कापसाच्या मदतीने अथवा सॉफ्ट ब्रशने हे मिश्रण तुम्ही तुमच्या दातावर लावावे. अशा पद्धतीने दिवसातून दोन वेळेस याचा प्रयोग करावा. आठवड्यातील दोन दिवस म्हणजे एकूण आठवड्यामध्ये चार वेळा हा प्रयोग होईल. या पेक्षा जास्त करू नका.

एक गोष्ट लक्षात घ्या ज्या पण गोष्टी तुमच्या हाडांची बळकटी वाढविण्यासाठी चांगल्या असतात जसे कुळीथाची डाळ यामध्ये हाय कॉलिटी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आढळते. याचा तुमचा अन्नपदार्थांमध्ये प्रयोग नक्की करा. भुईमूग शेंगा खा. बदाम भिजवून त्याचे साल काढून खा यासोबतच आक्रोड, पिस्ता देखील पाण्यात भिजवून खाल्ल्याने तुमच्या दातांसाठी खूप फायदेशीर असते. पिण्याचे पाणी हे तांब्याच्या भांड्यातील असावे.

त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे विटामिन्स मिनिरल्स, कॉपर, कॅल्शियम चे फायदे अनेक पटीने वाढतात. आहारात सॅलड चे प्रमाण मुबलक असावे जसे गाजर, मुळा, काकडी. गाजरामध्ये देखील असे पोषक तत्व असतात ज्यामुळे तुमच्या दातांना मजबूती मिळते. यासोबतच सकाळी उठून जाऊन ऊस खाल्ल्यामुळे देखील तुमच्या दातांचा चांगला व्यायाम होऊन त्याचा तुम्हाला फायदा होतो.

तुमचे दात व हिरड्या बळकट होतात. यामुळे पायरिया, सेन्सिटिव्हिटी, दात दुखणे यांसारखे त्रास देखील होतात गायब. दात एकदम मोठ्या प्रमाणे चमकू लागतील आणि अन्य दातांच्या तक्रारी आयुष्यात होणार नाहीत. खात्री आहे आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आणि तुमच्या ज्ञानात भर घालण्या सोबतच तुम्हाला फायदा देखील करून देईल. ही माहिती आपल्या जवळच्या व्यक्ती सोबत नक्की शेअर करा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *