अशी वांग्याची भाजी बनवली तर तुमचीच वाहवा होईल.! असा वांग्याचा सुगंध घरभर पसरेल.! चविष्ट वांगी अशी बनवा.!

आरोग्य

रोजच्या आहारात वेगवेगळ्या भाज्यांचा आपण समावेश करतो. भाजी शिवाय जो चौरस आहार म्हणतात तो पूर्ण होताच नाही. आणि चांगला चविष्ट जेवण कुणाला आवडणार नाही, हिंदीत म्हणतात ना दिल का रास्ता पेटसे हो कर जाता है. तसाच चांगला जेवण मन खुश करता आणि घरात देखील वातावरण नीट राहता. काही भाज्या मुलांना किंवा मोठ्यांना देखील आवडत नाहीत परंतु त्या भाज्या आरोग्य निरोगी ठेवतात.

आज आपण यालेखात अश्याच वांग्याच्या भाजीला चवदार कशी बनवावी,जेणेकरून सगळे चवीने खातील व घरात पण तुमची वाहवा होईल ते जाणून घेऊया. म्हणजे लहान मुले पण खातील आणि मोठे पण हौसेने खातील. वांग्याचे अनेक फायदे आहेत. वांगी खाल्ल्यामुळे कॅन्सर पासून बचाव होतो. आश्चर्यचकीत होऊ नका हे सत्य आहे की वांग्याची भाजी किंवा भरीत खाल्ल्यामुळे कॅन्सर होण्यापाून वाचू शकतो.

त्याचबरबरीने वांगी खाल्ल्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते, हृदयविकराचा धोका टळतो, उच्चरक्तदाबापासून दूर राहता येते, त्याचप्रमाणे शरीरातील कोलेस्टेॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत होते. चला तर आपण बघुया ही चवदार भाजी बनवायची कशी.अर्धा किलो वांगी स्वच्छ धुवून चांगले सुकवून घ्या. नंतर त्याचे देठ व वांग्याला असणारे काटे कापून घ्यावे.

त्यानंतर त्यावर चिरा माराव्या जेणेकरून आपल्याला कळेल की वांगी अतून खराब तर नाही त्याचबरोबर त्या चिरांमुळे मसाला ही आत छान लागेल.चिरा पाडून झाल्यावर मसाला तयार होईपर्यंत ते काळे पडतील म्हणून पाण्यात ठेवावे. आता आपण वांग्याचे भरवा मसाला कसे बनवावे ते जाणून घेऊया. एका ताटात पाच चमचे धने पावडर, दोन चमचे तिखट. तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता म्हणजे लहान मुलांना बनवत असाल तर कमी तिखट असे.

हे वाचा:   पुरुषांसाठी आनंदाची बातमी.! जगात असा कोणताच आजार नसेल जो यामुळे ठीक होऊ शकत नाही.! अनेक डॉक्टर करतात कौतुक.!

त्यानंतर त्यामध्ये दीड चमचा आमचूर पावडर, एक चमचा भाजलेले जिरे पावडर,एक चमचा हळद, सव्वा चमचा मीठ किंवा चवीनुसार,पाव चमचा हिंग, एक चमचा बडीशेप पावडर , दोन चमचे कसुरी मेथी बारीक करून घालावी. हे सगळे मसाले एकजीव करून घ्यावे. भरवा वांग्यामध्ये मसाले जास्त टाकले जातात. त्यानंतर या मिश्रणामध्ये दोन चमचे कच्चे मोहरी तेल घालावे यामुळे याला खूप छान चव येते.

यामध्ये एक चमचा बेसन पीठ घालावे, बेसन पीठ तुम्ही भाजून ही घालू शकता, त्यानंतर तीन चमचे दही घालावे याने या भरवा वांग्याला खूप छान चव येते.यानंतर हे मिश्रण एकजीव करून घ्यावे. हा मसाला तुम्ही कुठच्याही भाजी साठी वापरू शकता. आता हा मसाला वांग्यामध्ये घट्ट भरून घ्यावा. जेवढा जास्त मसाला भराल तेवढं छान चव या भरवा वांग्याला येईल.

हे वाचा:   फक्त सात दिवस दुधासोबत खा १०० वर्षांपर्यंत हाडांचे व सांध्यांचे दुखणे, रक्ताची कमतरता पासून होईल सुटका..!

आता हे भरलेले वांगी अर्धा तास बाजूला ठेऊन द्यावा. अर्ध्या तासानंतर एका कढईमध्ये तीन चमचे मोहरी तेल किंवा तुम्ही जे घरी वापरता ते घ्यावे तेल गरम करून त्यामध्ये एक चमचा जिरे, पाव चमचा मीठ व पाव चमचा हिंग घालावे.त्यानंतर यामध्ये वांग्यात भरण्यासाठी तयार केलेला उरलेला मसाला घालावा. नंतर यामध्ये भरलेली वांगी घालावी व ती चांगली परतून घ्यावी. यामध्ये थोडासा पाणी घालावे जेणेकरून वांगी करपू नये.

जसे लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून वांगी चांगले शिजवून घ्यावे. वांगी शिजताना थोड्या थोड्या वेळाने परतत राहावे त्यामुळे वांगी पूर्ण व सगळीकडून शिजतील. अश्याप्रकरे चवदार वांग्याची भाजी तयार होईल याला तुम्ही चपाती किंवा भाकरी सोबत खाऊ शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.