एक टोमॅटो तुमचे डार्क सर्कल पुर्णपणे गायब करणार.! हा घरगुती उपाय तुम्हाला कोणी नाही सांगणार.!

आरोग्य

सुंदर दिसावे ही सगळ्यांची ईच्छा असते. डोळ्यांच्या खाली अनेकदा काळे सर्कल पडले जात असतात ज्याला आपण डार्क सर्कल असेही म्हणत असतो. जेव्हा आपले डोळे हे तणाव किंवा थकवा आल्यासारखे होत असतात तेव्हा ते हळूहळू कमजोर पडू लागतात. डोळ्याखाली येणारे डार्क सर्कल येण्यामागचे हजारो कारणे असू शकतात. डोळ्यांच्या आसपास असलेली त्वचा ही खूपच नाजूक असते आणि रक्तप्रवाह अनेकदा थांबला जातो त्यामुळे डार्क सर्कल येत असतात.

अशाप्रकारे डोळ्याखाली आलेल्या डार्क सर्कलना आपण टोमॅटो च्या साह्याने सहजपणे गायब करू शकतो. टोमॅटो तुम्हाला सहजपणे डोळ्याखाली येणारे डार्क सर्कल पासून सुटका मिळवून देईल. आजच्या या लेखामध्ये आपण याबाबतची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. टोमॅटो कशा प्रकारे आपल्या डोळ्याखाली येणाऱ्या डार्क सर्कल साठी उपयुक्त असतो.

त्वचेचा रंग गोरा करण्यासाठी टोमॅटो एक नैसर्गिक साधन आहे. यामध्ये विटामिन सी, अँटीबॅक्टरियल आणि अँटी एजिंग गुणधर्म असतात. जे डोळ्याखाली असलेले काळपट रंगाचे सर्कल पूर्णपणे नाहीसे करू शकते. आम्ही सांगत असलेला जो उपाय आहे तो जर तुम्ही पंधरा दिवसांपर्यंत करत राहिलात तर तुम्हाला डोळ्याखाली येणाऱ्या डार्क सर्कल पासून कायमची सुटका मिळेल.

हे वाचा:   एकाच कारल्याने कितीही जुनाट गजकर्ण, खाज, नायटा दूर होऊ शकतो.! कारल्याचे अनेकांना केले आहे बरे.! असे लोकांचा कधीच होणार नाही बरा.!

तुम्ही आज पर्यंत टोमॅटो आणि बटाट्याची भाजी अनेकदा खाल्ली असेल, परंतु तुम्ही टोमॅटो आणि बटाटा एकत्र पद्धतीने उपयोग करून डार्क सर्कल पासून सुटका मिळू शकतो. यासाठी एक टोमॅटो घेऊन ते चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यावे. बटाट्याला देखील चांगल्याप्रकारे बारीक बारीक करून घ्यावे. आता दोघांची एकत्र प्रमाणे पेस्ट बनवावी आणि पेस्ट डोळ्याच्या खाली लावावी. यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

टोमॅटो आणि लिंबू देखील यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल. टोमॅटोची बारीक पेस्ट बनवून घ्यावी व यामध्ये थोडेसे लिंबू पिळून टाकावे. याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. ज्या ठिकाणी काळपटपणा असेल त्या ठिकाणी ही पेस्ट लावावी. डोळ्यांच्या खाली देखील ही पेस्ट वापरू शकता. पंधरा मिनिटांपर्यंत याने मसाज करत राहावी व त्यानंतर सामान्य पाण्याने धुऊन टाकावे. असे काही दिवस केले तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

हे वाचा:   हे पाच पदार्थ फ्रीज मध्ये ठेवल्यास आरोग्य येते धोक्यात, कधीच ठेऊ नका हे पाच पदार्थ फ्रीज मध्ये.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.