चमचाभर सेवनाने सगळा त्रास गायब झाला.! आयुष्यातून कायमची हाडे दुखी निघून जाणार.! कंबरदुखीचा रामबाण इलाज आहे हा उपाय.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेकांना कमी वयातच हाडांचे आजार, सांधेदुखी, कंबर दुखी यासारख्या समस्या उद्भवतात. पूर्वीच्या काळी ही समस्या विशिष्ट वय झाल्यावर वृद्धांमध्ये आढळून यायची परंतु हल्ली तीन ते चार वर्षाच्या मुलाला देखील हातपाय दुखणे यासारख्या समस्या त्रास देतात. या समस्या उद्भवन्या मागे कारणेदेखील वेगवेगळे असू शकतात. जर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर अशावेळी देखील तुम्हाला हाडांचे आजार सहजच होऊ शकतात.

म्हणूनच आपले हाडे मजबूत बनवण्यासाठी आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक गुणकारी उपाय घेऊन आलेला आहोत. हा उपाय काही दिवस केल्याने तुमच्या हाडांचा ठिसूळपणा नाहीसा होणार आहे. हाडे आतून मजबूत बनणार आहे. हाडांची शक्ती वाढणार आहे व परिणाम तुमच्या शरीरातील कॅल्शियमची मात्रा देखील वाढणार आहे, चला तर मग आजचा उपाय आपल्याला कशा करायचा आहे याबद्दल जाणून घेऊया.

आपल्या आहारशास्त्रामध्ये व आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा प्रामुख्याने उपाय सांगितला गेलेला आहे. आहारशास्त्रामध्ये तिळाचे अनेक फायदे सांगण्यात आलेले आहे. आजचा उपाय करण्यासाठी आपण तीळ वापरणार आहोत. आपल्यापैकी अनेक जण तिळाचा वापर करत असतात. स्वयंपाक करण्यात किंवा लाडू बनवण्यात देखील तिळाचा प्रामुख्याने वापर केला जातो. हिवाळ्याच्या दिवसात अनेक जण शरीराला उष्णता मिळावी म्हणून तिळाचे लाडू सेवन करत असतात.

तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, प्रोटीन, फायबर यासारखे अनेक तत्व उपलब्ध असतात, ज्यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्व मिळतात. बाजारामध्ये तीळ ही दोन प्रकारचे मिळते. एक तीळ ही पांढरी असते व दुसरी तीळ काळी रंगाची असते. तुम्हाला दोन्हीही तीळ सेवन केल्याने कोणताही दुष्परिणाम भोगाव लागणार नाही परंतु सर्वसाधारणपणे पांढऱ्या तिळाचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये जास्त केला जातो म्हणूनच आजचा उपाय करण्यासाठी देखील आपण पांढऱ्या तिळाचा उपयोग करणार आहोत.

हे वाचा:   आयुष्यभर तरुण राहण्यासाठी रोज घ्या एक चमचा, आयुष्यभर एकही गोळी खावी लागणार नाही, नेहमी पोट साफ, चरबी तर मेनासारखी वितळेल.!

आता आपल्याला आजचा उपाय करण्यासाठी बदाम देखील लागणार आहे. बदामाचे अनेक फायदे आपल्या सर्वांना माहिती आहे. बदामामध्ये खूप सारे पोषक तत्व उपलब्ध असतात, जे आपल्या शरीराला मजबुती प्रदान करत असतात. बदाम नियमितपणे खाल्ल्याने आपली स्मृती चांगली होते. स्मरणशक्ती चांगली बनते तसेच डोळ्यांचे आरोग्य देखील सुधारते परंतु बदाम खाताना आपल्याला बदाम योग्य पद्धतीने सेवन करायचा आहे.

आपल्यापैकी अनेक जण असेच बदाम खातात यामुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होण्याची शक्यता असते. बदाम हे उष्णता गुणधर्म प्रवृत्ती निर्माण करणारे असतात म्हणूनच बदाम आपल्याला पाण्यामध्ये भिजवून खायचे आहेत. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन ते तीन चमचा पांढरे तीळ घ्यायचे आहे आणि सात ते आठ बदाम घ्यायचे आहेत.हे दोन्ही पदार्थ आपल्याला एका वाटीमध्ये टाकून थोडेसे पाणी मिक्स करून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचा आहे.

यामुळे या दोन्ही पदार्थांमधील उष्णता कमी होईल आणि आपल्या शरीराला योग्य ते पोषक तत्व देखील प्राप्त होतील सकाळी उठल्यावर हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि हे पाणी तुम्ही पिऊ शकता किंवा जर तुम्हाला फेकायचे असेल तर तुम्ही फेकू देखील शकता परंतु भिजलेली तीळ व भिजलेले बदाम आपल्याला सकाळी उपाशीपोटी सेवन करायचे आहेत. जर तुम्हाला फक्त हे दोन्ही पदार्थ सेवन करायचा कंटाळा आला असेल तर अशावेळी तुम्ही दुधामध्ये हे दोन्ही पदार्थ मिक्स करून देखील सेवन करू शकता.

हे वाचा:   डॉक्टर सुद्धा हैराण आहेत.! फक्त दोन अक्रोड शरीराच्या सर्व नसा मोकळ्या करेल.! अक्रोड चे असे सेवन करणे ठरते अधिक फायदेशीर.!

दुधामध्ये हे पदार्थ टाकून दूध आपल्याला छान पद्धतीने उकळू द्यायचे आहे आणि त्यानंतर दूध थंड झाल्यावर सेवन करू शकता असे केल्याने तुमच्या शरीरातील हाडे मजबूत होतील. शरीरामध्ये चालताना उठताना जो आवाज होतो, तो देखील कमी होईल म्हणूनच आपल्या शरीराचे आरोग्य मजबूत राखण्यासाठी व हाडांची कमतरता कॅल्शियमचे कमतरता भरून काढण्यासाठी आजच्या लेखांमध्ये सांगितलेला उपाय अवश्य करा.

त्याचबरोबर दिवसभरातून एकदा जसा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा एक ग्लासभर दूध आवश्य सेवन करा. दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते आणि कॅल्शियम जर तुमच्या शरीरात जास्त असतील तर भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचे हाडांचे आजार होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.