अनेकांना केसांवर आपल्या चेहऱ्यावर खूप प्रेम असते. त्याचे ते काळजी पण तितकीच घेत असतात. प्रत्येक जण आपल्या चेहऱ्याची भरपूर अशी काळजी घेत असतो. प्रत्येक जण आपल्या चेहऱ्याला सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करत असतो. प्रत्येकाला वाटते की आपला चेहरा सुंदर बनावा, चेहऱ्यावर कुठलेही प्रकारचे डाग असू नये. तसेच पिंपल्स असेल तर ते देखील कायमची निघून जावे. यासाठी अनेक जण महागडे प्रॉडक्ट तसेच महागडे फेसपॅक बनवून चेहऱ्यावर लावत असतात.
सूर्यप्रकाशामुळे, धूळ आणि मातीमुळे चेहऱ्याचे रंग अनेकदा फिकट होत जातात. वाढते प्रदूषण यामुळे चेहर् याला सुंदर ठेवणे फार कठीण आहे. आजच्या काळात प्रत्येक मुलीला सुंदर आणि चमकणारी त्वचा मिळवायची आहे, बाजारातून खरेदी केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांचा वापर मुली करतात. परंतु कधीकधी या रासायनिक पदार्थांनी भरलेल्या उत्पादनांमुळे फायद्याऐवजी आपल्या त्वचेचे नुकसान होते.
अशा परिस्थितीत आज आपण काही घरगुती उपायांची माहिती देणार आहोत, ज्याद्वारे मुरुमांचे डाग, टॅनिंग आणि फ्रिकल्स कमी करता येतील. हे घरगुती उपचार त्वचेला नैसर्गिकरित्या पुनरुज्जीवन तसेच निरोगी बनविण्यात मदत करतात. त्वचा पिग्मेंटेशन, डाग आणि टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी बटाटा खूप प्रभावी आहे.
एवढेच नाही तर कच्च्या बटाट्यांचा फेसपॅक त्वचेला चमकदार बनविण्यातही मदत करतो. यासाठी बटाटा किसून घेतल्यानंतर चेहऱ्यावर स्क्रबप्रमाणे चोळावे. दुसर्या दिवशी कच्चे दूध त्वचेवर लावावे. नियमितपणे याचा उपयोग केल्याने केवळ त्वचाच चमकत नाही तर त्यावरील डागही दूर होण्यास मदत होते.
नारळाचे पाणी त्वचेचे गडद डाग दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. यासाठी नारळाच्या पाण्यात एक चमचा मध मिसळा, हे मिश्रण आईस ट्रेमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवा. नंतर दररोज त्याचा एक तुकडा काढा आणि हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा. सुमारे 10 मिनिटांनंतर त्वचा पाण्याने धुवा. नारळाच्या पाण्यात असलेले केराटिन त्वचेला चमकदार बनविण्यात मदत करते.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.