ही एक गोष्ट ज्याला समजते आणि जमते त्याचे पोट आयुष्यात कधीच खराब होत नाही.! दररोज पोट साफ ठेवायचे असेल तर हे एक काम रोज करा.!

आरोग्य

अन्न ही एक माणसाची मूलभूत गरज आहे. आपण अन्न ग्रहण केले नाही तर आपण जागू शकणार नाही. शरीराच्या सर्व अवयवांना त्यांचे कार्य योग्य वेळी व योग्यरित्या करण्यासाठी शक्तीची गरज असते. अन्ना द्वारे मिळणार्या पोषक तत्वांनी ही शक्ती शरीरात पोहचते व शरीरातील इतर भागांपर्यंत जाते. जे अन्न आपण रोज ग्रहण करतो ते आपल्या शरीरासाठी योग्य आहे का हे पाहणे फार आवश्यक आहे.

अन्न ग्रहण करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच ते योग्य वेळात पचन होणे सुद्धा फार आवश्यक आहे. मित्रांनो आपल्या पैकी आज काल अनेक लोकांना सकाळी पोट साफ न होण्याची समस्या होते. होय सकाळी पोट साफ न झाल्यास संपूर्ण दिवस बेकार व बेचव वाटतो. कोणत्या कामात देखील लक्ष्य केंद्रीत करता येत नाही. ही तक्रार उद्भवण्याचे कारण म्हणजे खाल्लेले अन्न पचन न होणे. अन्न पचन न होण्यामागे अनेक करणे आहेत.

मात्र आपण आपल्या रोजच्या जीवनात अश्या काही चुका करत आहोत ज्यामुळे तुमचे पचन तंत्र विसख्ळीत होत आहे. आज आपण या लेखात सकाळी पोट साफ न होण्याची कारणे व यासाठी फायदेशीर असे उपाय पाहणार आहोत. आपल्या पोटावरच आपले आरोग्य अवलंबून आहे. चेहर्यावर डाग येणे अथवा गॅस तसेच अपचन सारख्या व्याध्या सारख्या होणे या सर्व बाबी पोटातील मळ वेळेत बाहेर न पडल्यामुळे होतात.

हे वाचा:   नव्वद वर्ष वया पर्यंत एकदा पण कॅल्शियम कमी पडणार नाही.! पीठ मळताना त्यात टाका फक्त एक चमचा.! पचन शक्ती, कफ, वात सगळे गायब.!

आरोग्य चांगले हवे असेल तर पोट साफ असणे फार आवश्यक आहे. मित्रांनो तुम्ही किती ही पौष्टिक अन्न ग्रहण करा मात्र ते योग्य वेळी पचन झाले नाही तर त्याचा आपल्या शरीराला काही फायदा होत नाही. आज काल अनेक लोक पोट साफ होण्यासाठी बाजारातील अनेक उत्पादने तसेच गोळ्या औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. त्याच बरोबर पोट साफ होण्याची 100% हमी देणारी चूर्ण देखील आता बाजारात मोठ्या प्रमाणात विकली जातात.

पोट साफ करण्यासाठी अश्या गोष्टींचा वापर करणे शरीरावर अपाय करण्यासारखेच आहे. या सर्व गोष्टी रोज नियमित घेतल्यास तुमच्या शरीरात तयार होणारी नैसर्गिक अन्न पचन करणारी संस्था संपुष्टात येते व तुमचे अन्न पचन करण्यासाठी तुम्हाला रोज या गोळ्या औषधे व चूर्ण यांवर अवलंबून रहावे लागेल. म्हणूनच पोटाच्या सफाईसाठी गोळ्या-औषधे व चूर्ण घेणे आजच बंद करा.

अन्न पचन करण्याचे काम हे फायबर करते. त्यामुळे तुमच्या आहारात जास्तीत जास्त पालेभाज्या व फळभाज्या घ्या. मासे तसेच मांस देखील शरीरासाठी गरजेचे असते परंतू हे पदार्थ पचण्यास जड असतात म्हणूनच जेव्हा पण तुम्ही मांसाहार ग्रहण कराल तेव्हा त्यासोबत सलाड नाही तर फळभाजी नक्की घ्या. याने तुम्ही खाल्लेला मांसाहार देखील योग्य वेळेत पचन होईल. शरीराला फायबर प्रदान करण्यासाठी जेवणानंतर फळे ग्रहण करा.

हे वाचा:   नको ती चरबी पाण्यासारखी वितळून जाईल.! पाण्यात या चार गोष्टी टाकून पील्याने पोट चरबी मुक्त होईल.!

फळांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळून येते म्हणूनच रोज एक तरी फळ खावे. जर ही समस्या अनेक दिवसांपासून होत असेल तर रात्री जेवताना पाण्यात इसबगुल टाकून घ्यावे. इसबगुल एक नैसर्गिक घटकांपासून तयार केलेला औषधी पदार्थ आहे. पाण्यात टाकताच पाच मिनिटांच्या आत हे पाणी पिवून टाका. असे रोज चार ते पाच दिवस केल्यास तुमचे पोट सकाळी कोणत्या ही तक्रारी शिवाय साफ होईल.

सोबतच दिवसाला तीन ते चार लिटर पाणी हे शरीराला दिले गेले पाहिजे. याने शरीराचे संतुलन बनून राहते. अन्न देखील पचन होण्यास पाणी मोठी मदत करते. रोज निदान अर्धा तास तरी व्यायाम करावा याने तुमच्या शरीरातील वाईट घटक घामा मार्फत बाहेर पडतील. वरील घटकांवर लक्ष्य दिल्यास तुम्ही तुमचे पोट अगदी सहजरित्या साफ करु शकता.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.