कसलीही लचक, गुडघेदुखी, कंबरदुखी रोजच्या दहा मिनिटात होईल बरी.! तीन वस्तू तुमच्या गुडघ्याच्या नसा मोकळ्या करतील.!

आरोग्य

जसे जसे म्हातारपण जवळ येते तसे आजार जवळ येत असतात. अशा वेळी आपण काही गोष्टीची काळजी घेतो. अनेकांच्या पायामध्ये दुखणे असते ते काहीच केल्या कमी होत नाही किंवा नष्ट होत नाही, आणि त्यासाठी आपल्याला अनेक प्रकारच्या थेरेपी किंवा औषधे चालू ठेवावी लागतात. औषधांनी देखील आपले दुखणे किंवा आपला त्रास कमी होण्याचे नाव घेत नाही.

उलट तो दिवसेंदिवस एवढा वाढतो की त्याचा त्रास आपल्य आपल्या सहनशक्तीच्या बाहेर जातो. अशावेळी आपल्याला रोज इंजेक्शन्स किंवा अजून काही ट्रीटमेंट करावी लागते. त्यामुळे आपला बराच पैसा खर्च देखील होतो. खर्चाबरोबरच आपले गुडघ्याचे दुखणे अतिशय वाढू लागते. या त्रासावर रामबाण उपाय म्हणून आजचा आपला घरगुती उपाय असणार आहे.

चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला इथे धन्यांचा वापर करायचा आहे. धने गुडघ्यांसाठी सर्वोत्तम मानले जातात. धनेचा वापर केल्याने आपली गुडघेदुखी खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत करणार आहे. हाडांसाठी देखील धान्यांचा पाणी अत्यंत फायदेशीर आहे.

म्हणजेच धन्याचे पाणी प्यायल्यास गुडघेदुखी भरपूर प्रमाणात बरी होईलच त्याचबरोबर आपल्याला जॉईंट पेन असेल तर ते देखील नाहीसे होण्यास मदत करते. आपल्याला धन्यांचा वापर करायचा आहे. आपल्या सर्वांच्याच घरांमध्ये धने सहजपणे उपलब्ध होऊन जाते. त्यामुळे आपल्याला यावर वेगळा खर्च करण्याचा देखील प्रश्न निर्माण होणार नाही. त्याच बरोबर आपल्याला इथे मेथीचा देखील वापर करायचा आहे.

हे वाचा:   कधी झाली थोडी सर्दी किंवा खोकला तर झटपट करावा हा एक उपाय.! पित्त होईल चुटकीसरशी गायब.! दवाखाना होईल बंद.!

मेथीचे दाणे हे आपल्या शरीरासाठी त्याचबरोबर आपल्या केसांसाठी देखील भरपूर उपयोगी असतात. आयुर्वेदामध्ये देखील मेथीचा वापर केला जातो. मेथीचा वापर केस गळती साठी किंवा केस वाढण्यासाठी केला जातो. मेथी जेवढी केसांसाठी फायदेशीर व उपयोगी आहे तेवढीच किंवा त्यापेक्षाही जास्त गुडघेदुखीसाठी देखिल मेथी अत्यंत उपयोगी आहे.

मेथी हाडांना मजबूत करण्याचे काम करते. सोबतच कब्ज म्हणजेच ब’द्ध’को’ष्टता असेल तर तो देखील निघून जातो. आपले पोट कायम साफ राहणे गरजेचे असते.जर आपले पोट साफ नसेल तर आपल्या शरीरामध्ये आजाराचे प्रमाण अधिक वाढते. जर पोट साफ नसेल तर बाकी सर्व आजार आपल्याला होतात त्यामुळे पोट साफ करण्याचे काम ही मेथी करते.

मेथी मुळे पोट साफ राहते त्याचप्रमाणे आपली हाडे देखील मजबूत ठेवण्याचे काम ही मेथी करते. त्यामुळे एका पात्रामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि एक छोटी वाटी धने आणि एक छोटी वाटी मेथी टाकून ते पूर्ण रात्र पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा मेथी आणि धने पाण्यामध्ये भिजून पूर्णपणे त्यांचे घटक त्या पाण्यामध्ये एकरूप होतील.

तेव्हा ते भिजवून घेतलेले पाणी धने व मेथी आपल्याला तशीच्यातशी गॅस वर ठेवून दहा ते पंधरा मिनिटे उकळवून घ्यायचे आहे हे तोपर्यंत तो उकळवायचे आहे त्या पाण्याचा रंग पिवळा झाला पाहिजे. आणि हे उकळवून झाल्यानंतर एका ग्लास मध्ये हे पाणी गाळून घ्यायाचे आहे. ज्या प्रमाणे आपण सकाळचा चहा पितो त्या जागेवर त्याचप्रमाणे हा काढा किंवा चहा च्या जागी ही चहा आपल्याला प्यायची आहे.

हे वाचा:   चालू न शकणारा याच्या सेवनाने पळू लागेल.! दिवसातून एकदा घ्या.! कंबर दुखी, सांधे दुखी, गुडघेदुखी सर्व दुखणे गायब.!

आता हा काढा पिऊन झाल्यानंतर आपले पोट साफ राहील त्याचप्रमाणे आपल्या हाडांचे दुखणे थांबेल सोबतच आपल्या हाडांमधील कटकट येणारा आवाज देखील कमी होईल. पोट साफ राहील यामुळे चेहरादेखील साप आणि चमकदार राहील. सोबतच जॉईंट पेन कमी होईल. अशा प्रकारचे अनेक फायदे आपल्याला होतील. या काढाचा वापर आठवड्यातून तीन ते चार वेळा देखील तुम्ही करू शकता.

यामध्ये वापरले गेलेले सर्व घटक घरगुती असल्यामुळे याची आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.