तुळशीच्या बुडात टाकली दहा रुपयांची ही वस्तू, तुमची तुळस पूर्ण हिरवीगार आणि टवटवीत होईल.! नक्की वाचा कशी.?

आरोग्य

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुळशीच्या झाडाची कशी काळजी घ्यावी. काय कारणामुळे आपलं तुळशीचे रोपं सुकतात किंवा कोमेजतात. अनेक लोकांच्या या तक्रारी असतात की आमच्या अंगणात तुळस टिकत नाही. ती जळून जाते. पूजा केल्यानंतर तांब्या मधले पूर्ण पाणी आपण तुळशी ला घालतो. म्हणजेच सांगायचा हेतू हा की अति पाणी दिल्यामुळे आपले तुळशीचे रोप खराब होते. रोपाची मूळ खराब होतात.

तुळशीला येणाऱ्या मंजिरी वेळच्या वेळी कापल्या पाहिजेत. त्या मंजिरी तुम्ही पुन्हा माझे टाकून नवीन तुळशीचे रोप उगवू शकता किंवा घरातील चहा पत्ती मध्ये, काढ्या मध्ये असा त्याचा औषधी वापर ही करू शकता. सांगायचा हेतू हा की वेळोवेळी तुळशीच्या मंजीरा न कापल्यामुळे रोपाची जास्त शक्ती बिया बनवण्यात खर्ची पडून पान पिवळी पडतात, रोप सुकते व वाढ खुंटते.

परिणामी तुळशीचे रोप लवकर खराब होते. म्हणूनच तुळशीच्या मंजेरी बिया वेळेत काढणे गरजेचे असते. या मंजीरा बाजूला साठवून तुम्ही पुन्हा कधीही, पाहिजे तेव्हा परत एकदा तुळशीचे रोप बनवू शकता. पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचे झाडं लवकर लागतात. तुळशीचे रोप प्रत्येक अंगणात असलेच पाहिजे. घरात सकारात्मकते सोबत आजूबाजूचे वातावरण हवा फक्त ठेवण्याचे काम तुळस करते. त्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटते.

हे वाचा:   एकदाच उपाय करा आणि गॅस एसिडिटी ची कटकट कायमस्वरूपी ची घालवा.! ॲसिडिटीचा काळ आहे हा उपाय.!

तुळसचे झाड कटिंग ने ही लागते. त्यामुळे बिया नसतील तरी तुम्ही तो स्वरूप लावू शकता. त्यालाही मंजिरी उगवल्यावर ती पुन्हा तुळशीचे अनेक रोपे तयार करू शकता. तुळशीचे पान म्हणजे खोड मूळ हा प्रत्येक भाग आयुर्वेदिक औषध आहे. तुळशीच्या मंजीरा यांचा असंख्य उपयोग आहेत. दारामध्ये तुळस असणे जसे पवित्र मानले जाते त्याचप्रमाणे दररोज तुळशीच्या पानाचे सेवन करणे आपल्या शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

चांगल्या तुळशीचा रोपासाठी नेहमी सेंद्रिय खतांचा वापर करावा. रासायनिक खते वापरू नयेत. पाणी जास्त देऊ नये. खासकरून थंडीच्या दिवसांमध्ये तुळशीच्या रोपाची जास्त काळजी घ्यावी लागते. गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्याने देखील झाड खराब होतात. थंडीमध्ये तुळशीचे रोप लवकर सुकते. आवश्यक पुरेशा प्रमाणामध्ये सूर्यकिरणे तुळशीच्या रोपाला योग्य वाढीसाठी मिळाली पाहिजेत.

हे वाचा:   डोळा लावताच झोप लागली पाहिजे.? शांत झोप हवी असेल तर दुधात हा एक पदार्थ घ्यायला पाहिजे.! शांत, गाढ झोप लागेल.!

त्यामुळे रोप लावण्यासाठी अशीच जागा निवडावी ज्या ठिकाणी पुरेसा सूर्यप्रकाश असेल परंतु जास्त कडक उन्ह नसेल. टीप : 1)जस मंजिरी वेळेत कपावी 2)सुकलेली पाने फांदया छाटणे आवश्यक आहे. असं न केल्यास बाकी पान वेगाने सुकू लागतील. आणि तुमची तुळस जळून जाईल. 3)आवश्यक त्या प्रमाणातच पाणी द्यावे. 4) तुळशीच्या रोपाच्या मुळाशी मातीत असलेला वाळलेला पाला देखील तुम्ही वेळोवेळी साफ करत चला.

मित्रांनो अशा प्रकारे काळजी घेतल्यावर तुमचे तुळस होईल दाट आणि हिरवीगार… अशा आहे आम्ही दिलेली माहिती व टिप्स तुम्हाला आवडली असेल आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ही नावीन्यपूर्ण माहिती आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.