काही केले तरी केस लांबसडक होत नाही.! केसांची वाढ खुंटली असेल तर या उपाय शिवाय काहीच पर्याय नाही.!

आरोग्य

आजकाल केसांची समस्या सगळ्यांनाच जाणवत आहे. धुळ, माती, प्रदूषण, चुकीची जीवनशैली यामुळे केस गळण्याची समस्या निर्माण होते. केस गळणे, तुटणे, केसांची वाढ न होणे, केस पांढरे होणे, केसात कोंडा होणे अश्या अनेकप्रकारच्या समस्यांना आपण तोंड देत असतो. यामागील कारण म्हणजे चुकीची जीवनशैली आणि वाढते प्रदूषण.

अशा परिस्थितीत बर्‍याच व्यक्ती या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे केसांची निगा राखणारी उत्पादने वापरतात. अशा रासायनिक उत्पादनांमुळे केस आणखी कमकुवत होतात. आपले केस आपल्या व्यक्तीमत्त्वात भर घालतात. यामुळे आपले सौंदर्य खुलून दिसते आणि आपला आत्मविश्वास देखील वाढतो. अशाप्रकारे आपल्या केसांचेसुद्धा आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे.

अनेकांची केस खूप कमी वयातच पांढरी दिसू लागतात. आणि मग त्यावर मारा सुरु होतो तो वेगवेगळ्या डायचा. आणि यामुळे केस काळे तर होतातच पण कमकुवत देखील होऊ शकतात. अशा या रासायनिक उत्पादनांपासून दूर राहण्यासाठी आम्ही तुम्हाला आज एक घरगुती उपाय सांगणार आहोत तोही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता.

हे वाचा:   दहा रुपयांची ही एक वस्तू अनेक आजार कायमचे बरे करेल, नक्की जाणून घ्या याचे रोज सेवन कराल.!

आपल्याला सर्वात प्रथम तुरटी घ्यावी लागेल. या तुरटीची छोटा एक चमचा बारीक पूड करून घ्यावी. सगळ्यांना माहीतच असेल पूर्वी दाढी केल्यानंतर अनेक जण या तुरटीचा उपयोग करायचे. तुरटीमुळे पांढरे केस काळे होण्यास मदत होते. तुरटी ही जंतुनाशक आहे. त्यामुळे केसात उवा देखील होत नाहीत.

त्याशिवाय केसातील कोंडा सुद्धा ही तुरटी दूर करते. आता तुरटीच्या पूड मध्ये तीन चमचे आवळ्याचे तेल घाला. या तेलाने आपले केस मजबूत राहतात आणि चमकदार देखील होतात. हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. आता या मिश्रणात व्हिटॅमिन ई असलेली एक कॅप्सूल टाका. ही व्हिटॅमिन ई असलेली कॅप्सूल तुम्हाला बाजारात सहज मिळू शकते. ही आपल्या केसांसाठीच नाही तर त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे.

हे वाचा:   रात्री हा उपाय केला व सकाळी गुडघेदुखी गायब, हा उपाय तुमचे लाखो रुपये वाचवेल.!

हे मिश्रण एकत्र करून एका कापसाच्या बोळ्याच्या साहाय्याने ते केसांच्या मुळांशी लावा. आणि एका तासाने केस धुवून टाका. आठवड्यातून दोन वेळा असा मसाज केल्यास तुमच्या केसांची वाढ नक्कीच सुधारेल आणि केस काळे झाल्याचे तुम्हाला काही दिवसातच जाणवेल. व्हिटॅमिन ईमुळे तुमच्या केसांची त्वचेचे आरोग्य सुधारते ज्यामुळे केस मजबूत होतात. काळेभोर केसांसाठी हा उपाय नक्की करून बघा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.