एका रात्रीत मटकीला मोड आणण्याची एकदम सोप्पी पद्धत नक्की बघा; वेळ वाचणारी गावरान ट्रिक.!

ट्रेंडिंग

तर आज आपण मटकीला असे मस्त मोड कसे आणायचे हे बघणार आहोत. या लेखात तुमचे सगळे डाउट्स क्लिअर होणार आहेत. पटकन एका रात्रीमध्ये मोड कसे आणायचे हे आपण पाहणार आहोत. दुसरा प्रॉब्लेम् असा येतो की जरी आपल्या मटकीला मोड आले असेल तरी सुद्धा ही मटकी चिकट होते, त्याला एक उग्रवास येतो. जशी बाजारामध्ये मस्त मटकी मिळते तशी घरी अजिबातच होत नाही. तर इथे मी 150 g मटकी घेतलेली आहे. मटकी ही स्वच्छ निवडून घ्यायची, याच्यामध्ये कदाचित खडे असण्याची शक्यता असते. जर तुम्हाला चवदार मटकी हवी असेल तर गावराण मटकीच घ्यायची किंवा हे जे कडधान्य आहे ते साईजला थोडसं लहान अस बघून घ्यायचं आहे.

साईजला मोठ्या असणाऱ्या मटकीच्या तुलनेमध्ये साईजला लहान असणारी मटकी म्हणजेच ही गावराण मटकी चवीला अप्रतिम लागते. तर इथे मी मटकी चांगली निवडून घेतलेली आहे, यामधले जे खड़े होते ते साफ करून घेतले. आता यानंतर ही मट्की आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. मटकी भिजत घालण्यासाठी थोड्याशा मोठ्या आकाराच भांड आपल्याला इथे घ्यायच आहे. सगळ्यात आधी आपण ही मटकी चांगली स्वच्छ धुऊन घेऊयात.

तर सुरुवातीलाच आपल्याला दोन ते तीन पाण्याने ही मटकी चांगली स्वच्छ धुऊन घ्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता बराच कचरा इथे निघालेला आहे. पूर्णपणे पाणी खराब झालेल आहे. आता आणखीन दोन वेळा ही मटकी चांगली मी स्वच्छ धुवून घेते. इथे मटकी मी दोन ते तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुऊन घेतलेली आहे. आता यामध्ये भरपूर पाणी घालायच आहे. दोन ते तीन ग्लास भरून मी इथे पाणी घातलं आहे. आता ही मटकी आपल्याला एक पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवायची आहे. मटकीचा आकार लहान आहे यामुळे ही मटकी लगेच भिजली जाते. मटकी जर अशी बारीक असेल, गावराण असेल तर संध्याकाळच्या चार वाजता जरी तुम्ही मटकी भिजत घातली तरी रात्रीच्या दहा वाजता तुम्ही पाण्यामधून उपसून घेऊ शकता.

हे वाचा:   श्रावण महिन्यात का मांसाहार का करत नाही माहिती आहे का.? श्रावण महिना या कारणांमुळे आहे खूप शुद्ध महिना.!

आता यावरती एक घट्ट झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच ते सहा तासांसाठी ही चांगली मटकी आपल्याला भिजवून घ्यायची आहे. आणि आता इथे तुम्ही बघू शकता एक सहा ते सात तासांसाठी ही मटकी चांगली भिजवून घेतलेली आहे आणि हे बघा साईजला अगदी दुप्पट ही झालेली आहे. भरपूर पुरेस आपण यामध्ये पाणी घातलेलं होतं यामुळे भरपूर पाणी इथं अजूनही शिल्लक आहे. यावरती जो फेस तुम्हाला दिसेल, तर यामुळे मटकीला आंबट वास येण्याची शक्यता असते. यामुळे काय करायच की लगेच ही पाण्यामधून उपसून घ्यायची आणि कमीत कमी दोन ते तीन वेळा ही मटकी स्वच्छ धुऊन घ्यायची.

मटकी धुवत असताना खूप जास्त ती चोळून धुवायची नाही तर अगदी हलक्या हाताने धुवून घ्यायची आहे. जर तुम्ही अशीच ही मटकी पाण्यामधून उपसून मोड आणण्यासाठी ठेवली तर मात्र मटकीला मोड तर येतील पण ही मटकी चिकट आणि आंबट होईल. अशी मटकी खाण्यायोग्य अजिबातच राहत नाही. आता तुम्हाला मटकीला छान असे मोड आणायचे असेल तर तुमच्याकडे अशा स्टेनर असेल, जाळी असेल तर ती घ्या, तुमच्याकडे अशी जाळी नसेल तर तुम्ही एखादी पुरणाची चाळण, वड्या उघड्ण्याची चाळण किंवा सूप स्टेनर असत ते घेतले तरी चालेल किंवा धान्य चाळण्याची चाळण जरी तुम्ही घेतलीत ना तरी सुद्धा इथं चालेल.

बरेच जण कपड्यामध्ये बांधून मटकीला मोड आणतात पण यामुळे होतं काय? मटकीला मोड तर येतात पण जेव्हा कपड्यामधून ही मटकी तुम्ही बाहेर काढता ना तेव्हा या मटकीचे मोड तुटले जातात. असं होऊ नये यासाठीच आपल्याला अशा प्रकारची जाळी वापरायची किंवा चाळण वापरायची. आता ही मटकी मी तीन ते चार वेळा अलगद पाण्याने धुऊन घेतलेली आहे.

हे वाचा:   नळ स्वच्छ करायची नवीन घरगुती पद्धत.. फक्त 2 मिनिटात करा नळ स्वच्छ.!

यामधील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचय आणि आता खाली एखाद भांड ठेवायच आणि भांड्यावरती ही मटकी चांगली पसरून घ्यायची आणि ही एक पाच मिनिटांसाठी फक्त निथळत ठेवायची आहे. मटकीमध्ये आपल्याला अजिबातच पाणी ठेवायचं नाही. जर पाणी राहिलं तर मात्र ही चिकट होण्याची शक्यता असते. यामुळे या चाळणीवरती मटकी पसरून ठेवायची म्हणजे यामधल जे एक्सेस पाणी आहे हे पूर्णपणे निथळलं जातं.

तर एक पाच मिनिटांसाठी यामधलं पाणी मी चांगलं निथळून घेतल आहे. यामधलं जे पाणी आहे एक्स्ट्रा ते पूर्णपणे निघून गेलेल आहे आणि ही मटकी चांगली कोरडी झाली आहे. आता एका रात्रीमध्ये यावरती जेव्हा तुम्ही झाकण लावून घ्याल, तेव्हा आतमध्ये एक दमट वातावरण तयार होतं आणि हे दमट वातावरण असच बराच वेळा राहावं यासाठी आपल्याला एक कापड ठेवायचंय वरच्या साईडने, किंवा एखादा नॅपकिन, एखादा टॉवेल घेऊन यावरती आपल्याला घट्ट बसेल असं झाकण ठेवायचे आहे.

आता जेव्हा तुम्ही खाली आणि वर अशा प्रकारे कापड टाकता ना तेव्हा आतमध्ये ना एक दमट वातावरण तयार होत आणि यामुळेच मटकीला मोड लवकर येतात. आता यानंतर जर तुमच्याकडे खूप पाऊस असेल, थंडी असेल तर अशा वेळेस एखाद्या उष्ण ठिकाणी हे तुम्हाला ठेवून द्यायच आहे. तुम्ही गॅस शेगडीच्या साईंडला सुद्धा हे ठेवू शकता किंवा यावरती तुम्ही आणखीन एखाद कापड्, एखादा रुमाल किंवा एखादी तुम्ही कढई सुद्धा ठेऊ शकता.

यामुळे मटकीला मोड आणं अगदी सोपं आणि सहज शक्य होतं. तर ही मटकी आठवडभरासाठी जरी तुम्ही फ्रिजमध्ये ठेवलीत ना तरी या चाळणीतून, या मटकीचे मोड अजिबात कुठेही तुटले जात नाहीत. ही मोड आलेली मटकी आहे अशी राहते. तर मित्रांनो कसा वाटला आजचा लेख हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.