या पद्धतीने चटणी बनवाल तर इडली डोसा पेक्षा जास्त चटणी खाल; पहा बनवण्याची पद्धत..

ट्रेंडिंग

नमस्कार, आज आपण डोशासाठी लागणारी किंवा इडलीसाठी लागणारी चटणी पाहणार आहोत आणि ही चटणी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि नेहमी तुम्ही याच पद्धतीने चटणी बनवाल. चला तर रेसिपी करायला सुरुवात करूयात. मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलाय, पॅन हलकासा गरम झाला की आपण याच्यामध्ये एक चमचा तेल घालूयात. तेल थोडस गरम झालं की आपण याच्यामध्ये घालूयात अर्धी वाटी शेंगदाणे, आता या वाटीप्रमाणेच आपण इतर देखील साहित्य मोजून घेणार आहोत. घरातली कुठलीही एखादी वाटी घ्या त्या वाटीप्रमाणेच इतर साहित्य देखील तुम्ही मोजून घ्या. गॅसची फ्लेम लो ठेवा. लो फ्लेम वरतीच आपल्याला हे शेंगदाणे अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत.

शेंगदाणे भाजतायत तोपर्यंतच मी इथे पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, मिरच्यांना थोडेसे मधून काप द्यायचे म्हणजे ते फुटणार नाहीत अगदी काही सेकंद साठी हे मिरची आणि शेंगदाणे मी मिक्स करून, परतून घेतले आहेत. आता यानंतर आपण याच्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालूयात आणि याच बरोबर आपण याच्यामध्ये घालूयात एक इंच आल्याचा तुकडा घालू आणि हे देखील एखाद्या दोन मिनिटांसाठी मी परतून घेते. आपल्याला हे सगळे जे साहित्य आहे ते लो फ्लेम वरतीच परतून घ्यायचं आहे. हाय फ्लेम वरती परतून घ्याल तर करपण्याची शक्यता असते आणि याचबरोबर याची चव देखील बिघडण्याची शक्यता असते. काही मिनिटांसाठी मी हे परतून घेतल आहे.

आता यानंतर अगदी फ्रेश असा कडीपत्ता आपण याच्यामध्ये घालूयात आणि तो देखील या सगळ्या साहित्यांसोबत परतून घेऊयात. चला तर हे सगळं साहित्य मी एक दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घेतलं. आता यानंतर आपल्याला यामधे फुटाण्याची डाळ टाकायची आहे. जी भाजलेली डाळ असते ती मी इथे वापरली. दोन ते तीन चमचे इथे डाळ वापरलेली आहे. आता ही डाळ देखील या सगळ्या साहित्यांसोबत आपण परतून घेऊयात. चला तर डाळ देखील एक दोन मिनिटासाठी मी परतून घेतली आहे. आता यानंतर अगदी फ्रेश असा मूठभर मी इथे पुदिना घेतला आहे, तो देखील आपण या सगळ्या साहित्यांसोबत परतून घेऊयात. पुदिन्यामुळे एक वेगळीच टेस्ट या चटणीला येते.

हे वाचा:   तुमची बदनामी करणाऱ्याचे तोंड असे बंद करा.. पुन्हा कधी तुमच्या वाट्याला जाणारच नाहीत.!

लो फ्लेम वरतीच आपल्याला हे सगळं साहित्य भाजून घ्यायच आहे. तर हे बघा अगदी अर्धा मिनिटासाठी मी पुदिना भाजून घेतला, आता यानंतर एक वाटी भरून मी ओल्या नारळाचे काप घेतले आहेत. आता हे काप देखील मी फक्त एखाद्या मिनिटांसाठी भाजून घेणार आहे. गॅसची फ्लेम तुम्ही बंद केली तरी देखील चालेल. एखाद्या मिनिटांसाठी आपण भाजून घेऊयात.

ओल्या खोबऱ्याचे काप आपल्याला बंद गॅसवरतीच परतून घ्यायचे आहेत. जर तुम्ही जास्त वेळ हे ओल्या खोबऱ्याचे काप परतून घ्याल तर चटणीची चव बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅसची फ्लेम बंद करायची. बंद गॅसवरतीच आपल्याला हे सगळे काप भाजून घ्यायचेत. आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात आणि मगच मिक्सर मधून वाटून घेऊयात.

मिक्सरमधून काढताना आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील घालायची आहे. आता तुम्हाला याची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे हे पूर्णपणे तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला हे थोडसं दाटस हवं आहे, किंवा जर आणखीन पातळ हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पाणी याच्यामध्ये वापरू शकता, मी ही चटणी डोशासाठी बनवली आहे. डोशासाठी ही कन्सिस्टन्सी अगदीच योग्य आहे. आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेऊयात. याचा कलर आणि याची कन्सिस्टन्सी जी आहे ती अगदीच मस्त दिसते. आता यानंतर आपण याच्यासाठी तडका तयार करूयात.

हे वाचा:   सासू सुनेच्या नात्याला काळीमा फासणारी घटना, सुनेला पाय दाबवण्यास बोलवले आणि...

त्यासाठी मी गॅसवर ही छोटी कढई ठेवली त्याच्यामध्ये एक चमचा मी तेल घातलय. तेल हलकस गरम झालं की आपण याच्यामध्ये मोहरी घालूयात. मी इथे अर्धा चमचा मोहरी घेतली. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. आणि यानंतर मी इथे एक मोठा चमचा भरून उडीद डाळ घेतली आहे. ती देखील अगदी छान आपण परतून घेऊयात. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार तुम्हाला जशी आवडते तशी क्वान्टिटी कमी जास्त करू शकता.

आता याचबरोबर मी इथे थोडीशी हिंग देखील घातली आहे, आता हे छान परतून घेऊयात. डाळ हलकीशी गुलाबी रंगावरती परतली गेली की आपण याच्यामध्ये अगदी फ्रेश असा कडीपत्ता घालायचा. गॅसची फ्लेम बंद करायची आणि बंद फ्लेम वरतीच आपल्याला हा कडीपत्ता घालायचा आहे. तर हे बघा अगदी छान मस्त अशी फोडणी लागलेली आहे. आता ही फोडणी आपण या चटणीमध्ये घालूयात आणि मिक्स करून घेऊया.

अगदी मस्त चटपटीत अशी ही चटणी तयार होते. ही चटणी इडली डोसा सोबत खूप मस्त लागते. अगदी मेदू वडा असतो त्यासोबत ही चटणी अगदी परफेक्ट लागते. तर मित्रांनो आजची ही रेसिपी तुम्हा सगळ्यांना आवडली असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा, त्याचबरोबर तुमच्या मित्र परिवारांसोबत ही रेसिपी शेअर करा.