कमी मेहनतीमध्ये नारळापासून खोबरे वेगळे करण्याच्या या ३ ट्रिक तुम्हाला माहित आहे का.?

ट्रेंडिंग

सन समारंभ म्हटल्यावरती आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये ओल खोबर हवं असतं, पण नारळ फोडून घेणं, त्यामधलं खोबरं अगदी सहज असं वेगळं करणं हे थोडसं वेळ खाऊ किवा अवघड काम वाटतं. म्हणूनच आज मी तुमच्या सोबत नारळ फोडण्याचे किंवा नारळ फोडून अगदी सहजरित्या त्यातल खोबरं बाहेर काढण्याचे तीन प्रकार सांगणार आहेत.

आता जर तुम्ही देवासमोर नारळ फोडणार असाल तर हे शेंडी सकटच आपण नारळ फोडतो पण आपल्याला एखादी मिठाई तयार करायची आहे, स्वयंपाकासाठी जर खोबरं हवं असेल, तर अशा वेळेस ही शेंडी काढायची आणि इथे जर तुम्ही नारळ व्यवस्थित बघितलात तर असे या नारळाला तीन डोळे असतात म्हणजेच असे तीन भाग असतात.

आता सगळ्यात सोपी पद्धत मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता असे तीन डोळे त्यातला हा जो मोठा डोळा तुम्हाला दिसतोय हा थोडासा सॉफ्ट झालेला असतो किंवा किंबहुना तो सॉफ्टच असतो, या मधूनच कोंब बाहेर येतो. तर हे बघा अगदी नखाने जरी तुम्ही असं वरचं टरफल काढून घेतलं तरी ते सहज निघतं.

आता सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे हा जो सॉफ्ट झालेला डोळा असतो किंवा थोडासा मोठ्या आकाराचा डोळा असतो तो असा ओपन करून् घ्यायचा आहे. तुम्ही चाकूच्या साहाय्याने अगदी सहज असं काढू शकता किंवा चमच्याच्या सहाय्याने, चमच्याचा जो मागचा भाग असतो त्याने सुद्धा काढू शकता.

आता या नारळामधलं जे काही पाणी आहे ते आपण सहज बाहेर काढू शकतो. इथेच तुम्हाला कळेल की हा नारळ खराब आहे की चांगला आहे. तर या नारळाला थोडसं हलवून घेतलं की अगदी सहज अस नारळामधून पाणी वेगळं होतं. आणि इथे नारळामधल संपूर्ण पाणी मी काढून घेतलेल आहे.

अजिबात या नारळामध्ये पाणी राहिलेलं नाही. आता यामधल पाणी काढून झालं की हा नारळ फोडून घ्यायचा आहे, तर मध्यभागी जोरात अशा पद्धतीने मार देऊन हा नारळ फोडून घ्यायचा. सहज असा हा नारळ फोडला जातो. एकदा नारळामधलं पाणी काढून घेतलं की मग नारळ फोडण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.

हे वाचा:   घराच्या कोणत्याही कोण्यात लपले असतील मच्छर तर ही एक टीप सगळ्या घरातले मच्छर पळवून लावेल.!

आता नारळ तर आपण सहज असा फोडून घेतला पण यामधलं खोबरं काढून घेणं सुद्धा अगदी चॅलेंजिंग काम असतं आणि जर तुम्हाला नारळापासून ही खोबऱ्याची वाटी अगदी सहज अशी वेगळी करून घ्यायची असेल ना तर, यासाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवायच आणि त्यावर आपली जी उकडीची चाळण असते ती ठेवायची. पाणी चांगलं खळखळ उकळल गेलं की मगच यावरती आपल्याला हे नारळाचे तुकडे असे ठेवायचे आहे आणि हे झाकून ठेवायचे. कमीत कमी आपल्याला एक 15 मिनिटांसाठी हा नारळ चांगला वाफवून घ्यायचा आहे.

हाय फ्लेमवरती एक 15 मिनिटांसाठी उलट् पलट करत हा नारळ मी वाफवून घेतलेला आहे. आता गॅसची फ्लेम मी पूर्णपणे बंद केलेली आहे. आता यामधील नारळ आपण काढून घेऊयात आणि थोडेसे थंड करून घेऊयात. तर हे बघा एक चार ते पाच मिनिटांमध्ये हा नारळ चांगला थंड होतो. आता वरच्या बाजूने थोडासा आपल्याला हा मोकळा करून घ्यायचा आहे. आणि त्या नंतर अगदी सहज अस यामधून खोबरे बाहेर येतं आणि आता दुसरी जी वाटी आहे ती सुद्धा अशाच पद्धतीने आपण मोकळी करून घ्यायची आहे.

हा झाला नारळ फोडण्याचा एक प्रकार आता दुसरा प्रकार बघूयात. नारळ फोडण्याच्या दुसऱ्या प्रकारामध्ये सुद्धा आपल्याला आधीच्या पद्धतीनेच नारळामधल पाणी काढून घ्यायच. यासाठी यावरची शेंडी काढून घ्यायची आणि यामधला जो मोठा डोळा आहे तो फोडून घ्यायचा आणि यामधून पाणी वेगळं करून घ्यायच. आता नारळामधल पाणी काढून झालं की यामध्ये एखादा चमचा किवा असा चाकू खोसायचा आणि यानंतर हा नारळ डायरेक्ट गॅस फ्लेमवरती आपल्याला धरायचा आहे.

हे वाचा:   गव्हाच्या पिठात टाका ही एक वस्तू, तासाभराची काम होतील एकदम चुटकीसरशी.!

तुम्हाला जर नारळ वाफवून घ्यायचा नसेल किंवा इतका तामझाम करायचा नसेल तर ही पद्धत सुद्धा अगदी सोपी आहे. यामध्ये तुम्हाला पाणी सुद्धा गरम करावं लागत नाही. यामधलं नारळामधल पाणी फक्त काढून घ्यायचे आणि यानंतर हा नारळ डायरेक्टच आपल्याला गॅसच्या फ्लेमवरती धरायचा आहे. आता हा नारळ उलट पलट करत आपल्याला सगळ्या बाजूने एकसारखा असा भाजून घ्यायचा आहे.

थोडासा वरून डार्क काळा असा रंग आला की यानंतर गॅसची फ्लेम् आपल्याला बंद करून घ्यायची आहे. त्यानंतर थोडस मोकळं करून घ्यायच म्हणजे खोबर सुद्धा यामधून लगेच निघेल. आपण हा नारळ गरम करून घेतला होता यामुळे हा लगेचच फुटला जातो आणि यापासून खोबरं सुद्धा अगदी सहज अस मोकळं होतं.

आता हा झाला नारळ फोडण्याचा दुसरा पर्याय पण आता तिसरा पर्याय या दोन पर्यायापेक्षा खूप साधा आणि सोपा आहे. याला वेळ जास्त लागतो पण मेहनत मात्र अगदी कमी आहे. आता इथे अगदी फ्रेश असा मी नारळ घेतलेला आहे. आता हा नारळ आपण एका प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये ठेवूयात आणि यानंतर ही अशीच कॅरी बॅग आपल्याला फ्रिजरमध्ये ठेवायची आहे. तर कमीत कमी एक 24 तास तरी हा नारळ आपल्याला असाच फ्रिजमध्ये ठेवून द्यायचा आहे. तर नारळ फ्रिजरमध्ये ठेऊन 24 तास झालेल की मग हा नारळ काढून घ्या.

नारळाच्या शेंड्या काढून मगच हा नारळ फ्रिजरमध्ये ठेवा, म्हणजे सोललेला नारळच फ्रिजमध्ये ठेवायचा आहे, तसाच नारळ ठेवू नका. आता हा नारळ आपल्याला फोडून घ्यायचा आहे. तर सगळ्या बाजूने आपण ह्याला थोडं थोडं फोडून घ्यायचं आहे. त्यानंतर हा नारळ व्यवस्थित मोकळा होईल. तर मित्रांनो हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधे नक्की सांगा. तसेच हा लेख तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा.