लसणाची सालं फेकून देण्यापूर्वी, कृपया हा लेख अवश्य वाचा.!

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणे आज सुद्धा आम्ही तुमच्यासाठी काही छोट्या टिप्स घेऊन आलो आहे. मला आशा आहे की त्या तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा-जेव्हा वेट वाईप्सचा वापर केला असेल, तेव्हा तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा तुम्ही एक वाइप काढायला सुरुवात करता तेव्हा तुमचे दोन वाइप एका सोबत बाहेर पडतात, त्यामुळे तुमच्या वाइप  वेस्ट होतात.

तर असे होऊ नये म्हणून आम्ही एक उत्तम युक्ती शोधून काढली आहे. तर आता तुम्हाला काय करावे लागेल, तर तुम्हाला 2 रबर बँड घ्यायचे आहे. यानंतर तुम्हाला वाइप्सच्या दोन्ही बाजूंना रबर बँड लावावे लागतील आणि यानंतर, जेव्हा तुम्ही त्यातून वाइप काढाल तेव्हा एकावेळी एकच वाइप बाहेर पडेल. नक्की करून बघा.

पुढची टीप अशी की, मित्रांनो, जसे आपण पाहतोय की उष्णतेचे प्रमाण वाढत आहे आणि हळूहळू डासही येऊ लागले आहेत, मग काय करायचे? तर आपण उन्हाळ्यात डासांना घालवण्यासाठी कॉईल वापरतो, पण कधी जर कॉईल फुटली तर? अशाप्रकारे, तुटलेली कॉइल जळताना आपल्याला खूप त्रास होतो. ज्यामुळे आपण ते कोणत्या पद्धतीने उभे केले पाहिजे ते आपल्याला समजत नाही.

तर हा एक चांगला उपाय आहे, तुम्हाला काय करायचे की, तुम्हाला तुमच्या घरी ठेवलेला एक चिमटा घ्यायचा आहे, फक्त हे लक्षात ठेवा की हा चिमटा प्लास्टिकचा नसावा, तो लोखंडाचा किंवा स्टीलचा असावा. मग तुम्हाला काय करायचे आहे की तुमचा तुटलेला चिमटा आडव्या पद्धतीने ठेऊन त्यात तुटलेली कॉईल उभी करून जाळून टाका.

हे वाचा:   lED बल्ब फेकून देण्याची चुकी तुम्ही करू नका.! जुन्या पुराण्या LED बल्बचा वापर पुन्हा, केला जाऊ शकतो.!

पुढची टीप या प्रकारची आहे की आपण आपल्या तेलाचं भांड साफ करतो तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो. ते लवकर आणि व्यवस्थित साफ होत नाही. आपण ते जर नॉर्मल स्क्रबरने घासले तर स्क्रबर सुद्धा खराब होते आणि नंतर इतर सर्व भांडी देखील गुळगुळीत होतात. मात्र यासाठी आता आम्ही तुम्हाला एक अतिशय सोपी युक्ती सांगणार आहोत.

जर तुमच्याकडे पीठ चाळून त्याचा उरलेला भुसा पडलेला असेल तर तुम्ही ते घ्या आणि त्या डब्यात टाका. असे केल्याने तुमच्या डब्यातील सर्व तेल शोषून घेतले जाईल आणि तुम्ही तुमच्या हाताच्या मदतीने सर्व पीठ स्वच्छ करा. त्यांनतर तुम्हाला दिसेल की तुमचा डबा पिठाच्या मदतीने पूर्णपणे स्वच्छ होईल.

आता पुढची टीप म्हणजे मित्रांनो, आपण सर्वजण लसणाचा वापर करतो आणि त्याची साले कचऱ्यात फेकून देतो. आज आम्ही तुम्हाला त्यांचा इतका जबरदस्त उपयोग सांगणार आहोत की ते पाहिल्यानंतर तुम्ही कधीही लसणाची साल उचलून कचऱ्यात टाकणार नाही. यासाठी सगळ्यात आधी लसणाची सालं वेगळी करा. आता आपण ती साले कढईत किंवा कोणत्याही पॅनमध्ये ठेवू शकता. त्यांनतर आपल्याला ते थोडेसे तळायचे आहे जेणेकरून त्यांचे थोडा कच्चेपन बाहेर येईल आणि त्यांचा रंग देखील थोडा बदलेल.

हे वाचा:   घराच्या चारी कोपऱ्यात ही एक गोष्ट ठेवा एकही उंदीर घरात पाय सुद्धा ठेवणार नाही.! उंदरांना पळवण्याची सगळ्यात सोपी पद्धत.!

आत तुम्हाला त्यात 2, 3 लवंगा टाकायच्या आहेत. त्यांनतर ते व्यवस्थित बारीक करून ही पावडर एका बरणीत भरून ठेऊ शकता. मित्रांनो, ही पावडर बनवण्यासाठी लसणाची सुकलेली सालच घ्यायची आहे, ओली नाही. मित्रांनो आता ही पावडर वापरायची कशी? तर अनेक वेळा आपण काही पदार्थ बनवतो जसे की आपण पास्ता बनवतो किंवा आपल्याला कोणत्या गोष्टीला सीझलिंग करायचे असते, तेव्हा आपल्याला लसूण पावडर लागते, त्या वेळी आपण ही पावडर वापरू शकता. तसेच तुम्ही ती अनेक प्रकारे वापरू शकता.

जसे की चहा किंवा कधी कधी रायता बनवायचा असतो, तर तुम्ही त्यात टाकून ही पावडर वापरू शकता. तुम्ही मॅगी मधे पण ही पावडर वापरू शकता. आपण ही पावडर वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकतो. तर मित्रांनो, आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरली असेल. आमचा आजचा हा लेख आवडल्यास तुमच्या मित्र परिवारासोबत सामायिक करायला विसरू नका.