फक्त हा 1 पदार्थ वापरा, कपड्यांचा रंग कधीच जाणार नाही, कपडे कायम दिसतील नव्यासारखे.!

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो, उन्हाळा म्हटलं की सगळ्यांनाच कॉटनचे सुती, सॉफ्ट असे कपडे घालायला आवडतात. कारण शरीर थंड ठेवण्यासाठी ते खूपच फायदेशीर ठरते. धुण्यामध्ये या कपड्यांचा रंग हा निघून जातो किंवा फिकट होतो. सुती कपडे फक्त घामच शोषून घेत नाही तर आपल उन्हापासून संरक्षण सुद्धा करतात. या कपड्यांचा रंग जाऊ नये म्हणूनच आज आपण हा उपाय पाहणार आहोत. आजच्या लेखात खूपच उपयुक्त अशा काही टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ज्यामुळे तुम्ही कितीही वेळा कपडे धुतले तरीही त्याचा रंग काही जाणार नाही.

अगदी हा रंग फिक्स होणार आहे. कॉटनचे कपडे धुतल्यानंतर त्याची कुठली खास अशी काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत. चला तर थोडाही उशीर न करता आजच्या या कॉटनच्या किवा सुती नवीन कपड्यांचा रंग जाऊ नये यासाठी आपल्याला काय करायच आहे आणि हा पदार्थ कोणता आहे हे जाणून घेऊ.

तर हा पदार्थ आहे तुरटी, ज्याला फिटकरी, अलम असही म्हटलं जातं. याच तुरटीचा वापर करून आपण आज कपड्यांचा रंग फिक्स करणार आहोत, ज्यामुळे आपले कपडे अजिबात फिके दिसणार नाहीत. कपड्यांचा रंग हा फिक्स व्हावा यासाठी किती प्रमाणात तुरटी आपल्याला घ्यायची आहे, किती पाणी घ्यायच आहे, याच योग्यप्रमाण या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तर पहा कुठल्याही ग्रोसरी शॉप मध्ये अगदी सहज आणि खूप कमी दरामध्ये ही तुरटी खड्यांच्या स्वरूपात आपल्याला मिळते.

तर सगळ्यात आधी याची बारीक अशी पावडर् आपल्याला करून घ्यायची आहे. पावडर नसेल करायची तर अगदी खडे सुद्धा तुम्ही असेच वापरू शकता पण ते विरघळायला जरा वेळ लागतो, त्यामुळे आपण याची पावडर करून घेतोय. अगदी बारीक अशी पावडर केल्यानंतर सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायच आहे, तर इथे आपल्याला पाणी फक्त एवढच घ्यायच आहे की ज्यामध्ये आपले कपडे हे पूर्णपणे भिजतील, जास्त सुद्धा पाणी घ्यायची गरज नाही.

तर आपण एक कॉटनचा ड्रेस मटेरियल आहे तो पूर्णपणे भिजेल इतपत दोन लिटर पाणी घ्यायचं आहे. आता या दोन लिटर पाण्यासाठी ही तुरटी ज्याची बारीक पावडर आपण के‌लेली आहे ती टाकायची आहे. तुरटीची पावडर जर करायची नसेल तर आहे तसा खडा सुद्धा तुम्ही अगदी एक ते दोन मिनिट या पाण्यामध्ये फिरवू शकता, तरी सुद्धा ही तुरटी पाण्यामध्ये छान विरघळली जाते. तर ही तुरटी पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे.

हे वाचा:   फक्त १ रुपयाचा शाम्पू करेल तुमचे काम अगदी सोप्पे; महिलांनो नक्की बघा.!

आता यानंतर आणखीन एक खूप महत्त्वाचा पदार्थ यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि तो म्हणजे मीठ. तर हे मीठ आपलं रोजच स्वयंपाकामधलच मीठ आहे. इथे तुम्ही खडे मीठ घेतल तरीही चालेल. तर दोन लिटर पाण्यासाठी इथे आम्ही 100 ग्राम स्वयंपाकातल हे मीठ घेतलय. तुरटी प्रमाणे हे मीठ सुद्धा व्यवस्थित पाण्यात विघळू द्यायच आहे. मीठ आणि तुरटी टाकल्यानंतर थोडासा पांढरट असा पाण्याचा हा रंग होतो. आता या पाण्यामध्ये आपल्याला जे कॉटनचे कपडे आहेत ते पूर्णपणे भिजत घालायचे आहेत.

आता एक एक करून जेवढे काही कॉटनचे सुती कपडे असतील ते पूर्णपणे उलगडून या पाण्यामध्ये आपल्याला भिजत घालायचे आहेत. ज्यावेळेस आपण मार्केटमधून कुठलाही नवीन कपडा आणतो तो कपडा घालण्यापूर्वी किंवा स्टिच वगैरे करण्यापूर्वी ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. जर तुम्ही आधीच हा कपडा साध्या पाण्याने किंवा साध्या प्रोसेसने जर् धुतला आणि नंतर ही प्रोसेस केली तर काहीही त्यावरती परिणाम होणार नाही. त्यामुळे कॉटनचा कुठूलाही कपडा ज्यावेळेस नवीन असेल, त्याच वेळेस ही प्रोसेस तुम्हाला करायची आहे. तरच तुम्हाला हवा तसा परिणाम याचा दिसणार आहे.

तर आता या सोलुशन मध्ये हे सगळे कॉटनचे कपडे आपण कमीत कमी दोन ते तीन तासासाठी भिजत घालायचे आहेत. बरेच वेळा आपण इतरांकडून ऐकतो की फक्त मिठाच्या पाण्यामध्ये एक 10-15 मिनिट कपडे भिजत घातले की त्याचा रंग फिक्स होतो तर अस अजिबात नाही. पाण्याच योग्य प्रमाण आणि त्यामध्ये तुरटीच आणि मिठाच योग्य प्रमाण आणि दोन ते तीन तास जर कपड़े तुम्ही व्यवस्थित या सोलुशन मध्ये भिजत घातले तरच या कपड्यांचा रंग हा फिक्स होणार आहे.

तर इथे दोन ते तीन तास आम्ही हे कपडे पाण्यात भिजत ठेवले आहेत. तीन तासानंतर या पाण्यातून हे कपडे सगळ्यात आधी आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत. ज्या भांड्यामध्ये आपण हे कपडे भिजत घातले होते त्याच पाण्यामध्ये जेवढा काही असेल तो रंग इथे निघणार आहे कपड्यांचा, पुढे अजिबात या कपड्यांचा रंग हा निघणार नाही.

हे वाचा:   गव्हाचा एक दाणा सुध्दा खराब होणार नाही.. नैसर्गिक पावरफुल उपाय.. एकदा नक्की करून बघा.!

आता या सोलुशन मधून हे कपडे तर आपण सेपरेट काढून घेतलेले आहेत. हे कपडे आता दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यातून आपल्याला निथळून काढायचे आहेत म्हणजे यामध्ये तुरटी आणि मीठ जे काही आपण टाकलं होतं, या कपड्यांमध्ये जे काही असेल ते व्यवस्थित धुऊन निघेल. यासाठी अगदी दोन ते तीन वेळा फक्त साध्या पाण्याने हे कपडे आपल्याला धुऊन काढायचे आहेत. इथे साबणाचा, डिटर्जेंट पावडरचा कसलाही उपयोग आपण केलेला नाही, फक्त साधं पाणी आपण घेऊन त्यामध्ये हे कपडे आपल्याला असे धुऊन काढायचे आहेत, त्यामुळे त्यावरच मीठ आणि तुरटी ही व्यवस्थित निघून जाईल.

तर पहिल्यांदा ज्यावेळेस या पाण्यामधून आपण हे कपडे धुऊन काढून त्यानंतर तुम्हाला अगदी थोडाफार रंग या पाण्यामध्ये दिसेल, मात्र पुन्हा दुसऱ्यांदा साध्या पाण्यामध्ये हे कपडे धुऊन घेतले तर त्यावेळेस तुम्ही बघाल की अजिबात सुद्धा कपड्यांचा रंग दुसऱ्यांदा इथे निघणार नाही, म्हणजेच कपड्यांचा रंग आपला आता फिक्स झालेला आहे.

बऱ्याचदा तुम्ही नोटिसही केल असेल की कॉटनचे सॉफ्ट, सुती कपडे एक ते दोन वेळा धुतल्यानंतर ते अगदीच कडक होतात जे आपल्या अंगावरती घातल्यानतर सुद्धा अगदी कडक कडक वाटू लागतात. सगळ्यात जास्त बेडशीट वगैरे. असा हा कपड्यांचा प्रकार असतो जो खूप कडक होतो, तर असे हे कपडे धुतल्यानंतर कड़क होऊ नये म्हणून ही नेक्स्ट स्टेप आपल्याला न विसरता करायची आहे. ती म्हणजे इथे आपल्याला एका बकेटमध्ये पाणी घ्यायचं आहे, या पाण्यामध्ये आपल्याला टाकायच आहे दोन चमचे व्हिनेगर, जे आपण चायनीज रेसिपीज मध्ये वापरतो.

तर अर्धा तास या विनेगर मध्ये हे कॉटनचे कपडे आपल्याला भिजत घालायचे आहेत. अर्धा तासानंतर याला साबण डिटर्जन वगैरे काहीही न लावता या पाण्यामधून हे कपडे काढून स्वच्छ हे पिळून घ्यायचे आहेत आणि हे कपडे आपल्याला सावलीमध्येच सुकत घालायचे आहेत. कॉटनचे कपडे कधीच उन्हात वाळत घालायचे नाही, त्यामुळे सुद्धा हे कपडे अगदी फिके पडू लागतात. तर मित्रांनो आजच्या ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा. तसच हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवाराला सुद्धा नक्की शेअर करा.